एकाकी संघर्ष आत्मचरित्रातून....
            मला कपडे आणि भांडी धुणे ही  कंटाळवाण त्रासदायक अशी कामे वाटतात. मुलींना
चुल आणि मुल या सुत्रात अजुनही हि कामे सुटलेली नाहीत तर घरकामवाल्या बाईला तिच्या या सदर
कामांची योग्य ति श्रमप्रतिष्ठा मिळत नाही; या विचाराचा मी आहे.  डबा धुवायला लागतो म्हणुन मी अशी
खाणावळ शोधायचो जिथे जेवुन ताट पुढे करून पळता येईल. त्यामुळे जवळजवळ १२ घरचे पाणी
प्यायलेला मी माणुस आहे. कपडे धुताना काही आठवणी झराझर डोळयासमोर आजही येतात. स्व:ताची
कपडे स्व:ता धुण्याचा नियम आमच्या घरी पुर्वीपासुनच होता. माझ्याकडे संध्याकाळचा चहा, भात असा
स्वयपांक आणि तेवढयात पाणी आले तर पाणी भरण्याचेही काम असायचे. मला पाणी भरायला मदत
करणारी डव-याची ताई ही आज आठवते तर कपडे धुवायला मदत करणारी अबिता ताई सुद्धा आठवते. पुढे
आई जेव्हा अंथरूणावर खिळुन होती तेव्हा तिची कपडे विक्रम धुताना त्याला गल्लीतील बायकांनी जाम
विरोध केला होता. मलाही जवळ जाण्यास विरोध व्हायचा पण् मी एकले नाही. 
            घरचे जेवन करताना शेंगा आणि चिचोके भाजण्याचा तसेच भजी करून खाण्याचा कार्यक्रमही मी या वेळेत उरकुण घ्यायचो. या सर्वांवर  विक्रमदादाची करडी नजर त्यावेळी  असायची.  मित्रांसोबत चिक्की करताना ती बऱ्याचदा करपण्याचा अनुभव फार मजेशीर होता. आम्ही दुस-यांची शेती भागीदारीत  करायचो. आई दुस-यांच्या शेतात मजुरीसाठी जायची.तिची मजुरी मागुण आणण्याचा कार्यक्रम माझ्याकडेच असायचा. ब-याचवेळा आई कुणाच्या शेतात गेली हे माहीत असल्याने चार दिशांपैकी एकीकडील भागात मी मुद्दाम काहितरी काम काढुन किंवा सहा सातच्या दरम्यान सहज फिरत जायचो. कामावरून येणा-या आईला बघितले कि मन हर्षुण जायचे.  तिच्याकडील
बुट्टी, पिशवी मी घ्यायचो कधीतरी काहीतरी खायला मिळायचे. घरी आल्यानंतर मी गरम करत ठेवलेले
पाणी ती अंघोळीला घ्यायची तेव्हा मी बाहेर जायचो कारण वेगळी म्होरी हा प्रकार असण्या  इतपत मोठे घर
आमचे त्यावेळी नव्हते. झोपताणा दरवाजा पुढे ढकलला की पाय सोडायला जागा मिळे. 
            आठवीपर्यंत काही अपवादात्पक (वडिल असेपर्यंतचा)काळ वगळता आम्ही चुलीतील राख दात आणि भांडी  दोन्ही घासायला वापरायचो. सर्वांसाठी एकच साबण त्यापुढे कांहीं  नाही. खेडेकर गुरूजी आमचे पाहुणे, त्यावेळी
दिवाणमाळावर रहायचे ते, काही जुणी कपडे पाठवायचे ती आम्ही आनंदाने घालत असु. दादा पाठवत
असलेले पैसे आई औषधावर खर्च करायची व घर चालविण्यासाठी जिवापाड मेहनत घ्यायची. मी घरी
आल्यावर तिच्या सेवेत हजर असायचो पाय चेपायला, साडितील किसपाडे काढायचो. त्यावेळी दिवसाच्या
कामाचा आढावा मिळायचा .  दुपाारच्या जेवणाच्या वेळी एकमेकांना आपल्या डब्यातील जेवण देण्याची संस्कृती गावी आहे. पण् आई आजारी असल्याने तिच्याकडील कोण घ्यायला मागत नसे हे निदर्शणास आल्यावर तिणे सर्वांच्या नंतर जेवण्याचा मार्ग पत्करला होता. बाकिच्या बायका भांगलायचे काम असो वा पिके कापायचे भराभर आपली पात पुढे न्हेत पण् आजारी आई थोडेसे मागे राहत म्हणुन गावातील कांही  बायका आईला कामाला बोलवत नसत हे हि ति सांगायची. 
           गावात तिच्याच आग्रहास्तव मी मुळयाची भाजी विकली. मुळयाची भाजी गावात कोणी विकत नसत. पण् मुंबईकर आईला हे ठावुक होते. वडिला सोबत कांहीकाळ आई मुंबईला राहिली होती. गावात
पोळीभाजी, इडली, वडे विकायचे सुरु केले तर चालतील का?असा तिचा प्रश्‍न असायचा आणि मी 'छे , फुकट खातील लोक!' असे म्हणुन गोष्ट बंद पाडायचा. आज रस्त्यावर लघुउद्योग करणारे कोणी दिसले कि आईच्या हया
आठवणींना मी आवरू शकत नाही. मुंबईत माझ्या खोपडा या कवितेला फारच प्रतिसाद मिळाला. मुंबईतील घरे म्हणजे कबुतराच्या खुराडयासारखी या विचाराशी मिळते जुळते तसेच भाऊबंदकिमुळे गावच्या घरांची तुकडे  पडल्याचे
वास्तववादी चित्रण त्यात मी मांडले.
खोपडा
होते एक चिमणीचे घरटे,
डोके झाकेल एवढयाच पुरते;
विचारही तितकाच तोकडा,
कारण, मिळाला होता एक खोपडा!
त्यातच त्यांचा वावर,
बनविला त्याचाच राजमहल;
स्वप्नांच्या वृक्षावर म्हणतात,
नक्किच येईल त्याला फळ!
खुप काही करायचे,
आराम घेत बंगल्यात बसायचे;
पुन्हा होतील दोणाचे चार,
चिंता पडली त्यांना आताच फार!
महल मग पडेल तोकडा,
भुखंडाचा मागतील तुकडा,
म्हणतील दोघे स्वप्न उघडुन,
बरा होता पुर्वीचाच खोपडा!
आम्हाला हा खोपडासुध्दा जेव्हा दादाने गावच्या दत्त नागरी पतसंस्थेचे (आज संस्था बंद आहे) आजोबांचे कर्ज फेडले तेव्हा भाऊबंधांनी दिला होता. भाडयाच्या घरात ७ वी पर्यंतचा माझा प्रवास झाला होता.
भाऊबंदकिमुळे आमच्या घरात जो भांडणाचा सपाटा चालायचा तो गाववाल्यांना मोफत नाटकाचा
कार्यक्रम होता.  घरात पप्पांनीच नळ आणला पण् आम्हाला  सरकारी नळावर पाणी भरावे लागे.घरात लाईट पप्पांनिच आणली पण् आम्हालाच विज नव्हती. शेजारील भाऊबंद वाकोजी अन्नांनी आपल्या घरातुन एक बल्ब दिला होता तोहि दोन महिण्यात काढुन न्हेला. त्यामुळे दिवा हाच माझ्या अभ्यासाला आधार होता. त्यामुळे बिना लोडशेडिंग मुंबईतील विज तसेच रस्त्यावरील विज हि माझ्यासाठी मायानगरीच ठरत होती. मंडळाच्या खोली समोरील वठणात (फ्लोअरवर ) जिथे माझी झोपायची जागा होती (बैठकीत उशीर झाला कि इथेच झोपावे लागायचे) तिथे रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो. मला प्रकर्षाणे दिव्याखालचा अभ्यास शब्दांकित
करावेसे वाटले. 
दिव्याखालचा अभ्यास

अधुनमधुन चमकत होती
मीनमीनत होती दिव्याची वात
विज घेण्याइतपत कुवत नव्हती
कोण देणार गरीबांना साथ?
भोवतीची पाखरं सतत मण खात
पण् विरोध करण्याइतपत कुवत नव्हती
संपणा-या तेलावर करूण मात्
मुलं काही नंबरात येत नव्हती!
तात्काळ सर्वकाही विसरून जात
उदयाचा आनंदाचाच हव्यास
दिव्याखालचा अभ्यास!
असा हा, दिव्याखालचा अभ्यास!

क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income