Posts

Showing posts from May, 2013

झुलपेवाडीला मिळाली नवी ओळख

नवीन आव्हाने पेलण्यासाठी झुलपेवाडी  सज्ज !       फक्त १५०० लोकसंख्या असणारया  चिकोत्रा धरणामुळे कालपर्यंत ओलाखल्याजानारया झुलपेवाडीच्या शिरपेचात साने गुरुजी वाचनालाय या बिगर राजकीय संस्थेने आणखी एक मानाचा तुरा रोवलाय!       १९ ९६ साली ज्ञान मनोरंजन आणि विकास हे ब्रीद उराशी बाळगून वाचनालयाची स्थापना झाली ग़ेलि १७ वर्षे वाचनालयाने अतिशय खडतर प्रवासातून विविध समाजउपयोगी उपक्रम तोट्यात जावून सुद्धा राबविणाऱ्या या वाचनालयास २०११ चा आदर्श ग्रंथालय पुरस्कार भेटला शिवाय ब वर्गात आजरा तालुक्यातील कांही वाचनालये आहेत त्यात संस्थेचे नाव आहे ! या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. दोन मजलि सुसज्य इमारत आज गावात दिमाखात उभी असून तिचे उदघाटन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा हस्ते झाले. नूतन इमारतीसाठी १६ लाख खर्च आला असून आजही वाचनालयाचे अध्यक्ष पावले गुरुजी यांच्यावर ६ लाख रुपयांचे कर्ज आहे. पाटील साहेबांनी २ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले असून एक आव्हान केले आहे  कि, 'आपल्या मोफत स्पर्धापरीक्ष्या विभागात  IAS आणि  IPS ऑफिसर निर्माण झाले तर मी ५ लाख