Posts

Showing posts from March, 2023

कल्याणमध्ये नवतेजस्विनी ग्रामोत्सव सप्ताह

नागरिकांना सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन  ठाणे :-  आज राज्यातच नव्हे तर देशभरात महिला बचत गटाचा बोलबाला होत आहे. या बचत गटांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबांतील महिला भगिनी सक्षम होत असून स्वतःच्या पायावर उभे राहत आहे. बचत गटाच्या विविध उत्पादनातून आर्थिक घडामोडीला चालना मिळत आहे. राज्यातही महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविमच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये दि. 29 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव साजरा होणार आहे. या ग्रामोत्सवाच्या निमित्ताने महिला आर्थिक विकास महामंडळ व बचत गटांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा....   महिला   आर्थिक   विकास   महामंडळ  ( मा विम )  हा   महाराष्ट्र   शासनाचा   अं गीकृत   उपक्रम   आहे .  आंतराष्ट्रीय महिला  वर्षाच्या   निमित्ताने   २४   फेब्रुवारी   १९७५   रोजी   या   महामं डळाची   स्थापना   कंपनी   कायदा  

प्रा. हरी नरके उद्या ठाण्यात !

प्रा. हरी नरके यांचे ठाण्यात व्याख्यान ठाणे महापालिकेचा उपक्रम ठाणे -  जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीदिन यांचे औचित्य साधून ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  ' ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री '  या विषयावर प्रा. नरके संबोधित करणार आहेत. शुक्रवार ,  १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने ,  ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते ,  त्यांचे कार्य व माहिती कळावी ,  त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. त्यानुसार ,  महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. क