Posts

Showing posts from June, 2017

पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे

Image
 सा.बां. विभागाचे  अक्षम्य दुर्लक्ष ! पनवेल :- {  बाबुराव खेडेकर  }              शहरातील जुना ठाणा नाका रोडवरील शासकीय वसाहतीच्या इमारती धोकादायक स्थितीत असून दररोज घरांमध्ये स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. येथे स्ट्रीटलाईटची व्यवस्था नाहीच जिन्यावर सुद्धा विजेची व्यवस्था नाही. परिसरातील अस्वच्छता वाढलेले गवत त्यातून डुकरांचा खुलेआम वावर; त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्लू सारख्या आजाराची भीती,धोकादायक इमारती आणि पाण्याच्या टाक्या,संरक्षण भिंतीचा थांगपत्ता नाही,ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही ,पाणी व्यवस्थापनातही गोंधळ या नरकयातना रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या  शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रोज  भोगत आहेत.  कळंबोलीतील सेक्टर ४ ई येथील  शासकीय वसाहतीची अवस्थाही अशीच असल्याने  पनवेलमधील शासकीय वसाहती रामभरोसे असून   येथील रहिवाश्यांची अवस्था ”तोंड दाबून बुक्यांचा मार ” अशीच होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.             पनवेल येथील जुना ठाणा रोडवर असलेल्या शासकीय वसाहतीमधील नागरिक रामभरोसे अशाच परिस्थितीत राहत

नवी मुंबईत 'हेमा' कडक चहा, ५० वर्षे पूर्ण

नवी मुंबईत 'हेमा' कडक चहा, ५० वर्षे पूर्ण : //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

ति'च्या हाती विळी

Image
पनवेल :- {  बाबुराव खेडेकर  }               लोणच्याचे आंबे फोडणे हे पुरुषांचे काम पनवेलमध्ये महिला करत आहेत. या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या हाती कुटुंब उद्धारासाठी विळी आली असून वयाची साठी ओलांडत असेलल्या या स्त्रिया समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी काम करीत आहेत.                 वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी स्त्रियांनी मोडून काढली आहे. अगदी रिक्षा टॅक्सी चालविण्यापासून सैनिकी विमान चालविण्यापर्यंत स्त्रियांची मजल पोहोचलेली आहे. स्त्रिया कधीच ''चूल आणि मुल'' या संकल्पनेतून बाहेर पडून कुटुंबासाठी आर्थिक भांडवल उभे करीत आहे. याचेच कांही नमुने पनवेलमध्ये पाहायला मिळतात. पनवेल रोज बाजार आणि महानगरपालिकेच्या भाजी मार्केटमध्ये तीन वृद्ध स्त्रिया पूर्वापारपणे लोणच्याचे आंबे फोडून देताना दिसतात.                 सुमन नारायण कोळी (वय ६०) राहणार आकुर्ली या वयाच्या १२ वर्षांपासून त्यांच्या आई सोबत बाजारात आंबे विकायला यायच्या. तेंव्हापासून त्यांनी आंबे फोडून विकण्याच्या कामाला सुरवात केलेली असून विळी त्यांच्या

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

Image
वाफाळत्या चहाला ग्लॅमर  पनवेल {बाबुराव खेडेकर}           वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणारे शौकीन सर्वत्र आढळतात. मात्र पनवेलमध्ये चहाच्या विविध प्रकारांना बॉलिवूडचे ग्लॅमर लाभले आहे. त्यामुळे चहाचा प्रत्येक चस्का घेताना चहाशौकिनांचा आनंद द्विगुणित होतो.त्यातूनच माधुरी आणि हेमा या चहाची लोकप्रियता पनवेल परिसरात वाढली आहे.            पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके रस्त्यावर असलेल्या गणपती टी हाऊस मध्ये गेल्यावर एक माधुरी,बे माधुरी असे शब्द कानावर पडतात. तर पनवेल उपहार गृहामध्ये एक हेमा दोन हेमा असे ऐकावयास मिळते. जुन्या जाणत्या ग्राहकांच्या हे शब्द अंगवळणी पडले आहेत. परंतु नव्या ग्राहकाला माधुरी हेमा हे काय प्रकार आहेत याची उत्सुकता वाढते. त्यामुळे नवा ग्राहकही या चहाच्या  प्रकाराचा आस्वाद घेण्यासाठी सरसावतो.           गणपती टी हाऊस माधुरी चहासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी रजवाडी,टमटम,बादशाही हे चहाचे प्रकारही मिळतात. परंतु धकधक गर्ल माधुरीच्या नावाने असलेल्या चहाला ग्राहकांची सर्वाधिक मागणी असल्याचे येथील चहाचा कारागीर नंदू याचे म्हणणे आहे. नेहमीचा ग्राहक लांबून दिसताच नंदू माधु

रामप्रहरवृत्त १५ जून २०१७

Image

Donald Trump on India vs Pakistan Match | Champions Trophy 2017 | Khaas ...

Image

पनवेल तक्का दर्ग्यावरील अलौकिक वृक्ष

Image
 गोरख चिंच/ वावबाब  वृक्ष  पनवेलमध्ये...             एका कुटुंबाला पोटात सामावून घेईल एवढे मोठे नैसर्गिकरित्या  पोकळ असलेले झाड पनवेल मधील तक्का दर्ग्यावर आहे. देवाचे झाड अशी श्रद्धा ठेवणारे लोक येथे असून अनेक साधू संत आणि फकीर या झाडामध्ये ध्यान करण्यासाठी येत असतात. हा  दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी लोकांची मात्र फार ये जा नसल्यामुळे महापालिकेला या वृक्षाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देता येवू शकतो.             आपल्या आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी नीट  पाहिल्यावर अनेक ऐतिहासिक गोष्टी आढळतात. पनवेल मधील वृक्षप्रेमींना एका दुर्मिळ झाडाचे दर्शन कुठल्याही अडथळ्याविना विनामूल्य पाहण्यास उपलब्ध आहे. तलावांचे शहर,भाताचे कोठार अशी इतिहासातील पनवेलची ओळख आता सिमेंटचे जंगल अशी होत आहे. मात्र शहरातील तक्का परिसरातील दर्ग्यामध्ये काटेसवर जातीचा ४५ वर्षाचा  वृक्ष आहे. त्याच्या वैशिष्टयानुसार या वृक्षाची वाढ होताना खोडामध्ये पोकळी निर्माण होत गेली. या झाडाच्या नैसर्गिक गुहेबाबत येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. येथील फकीर मुजावर जावेद इब्राहिम यांनी सांगितले कि हा देवाचाच वृक्ष

पनवेल बंदर विकासाच्या प्रतीक्षेत (दैनिक रामप्रहर वृत्त ९ जून २०१७ )

Image

27 may 2017 @ Daily Ramprahar Panvel

Image