Posts

Showing posts from April, 2023

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Image
*पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी* *समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली*  *- केंद्रीय मंत्री अमित शहा* नवी मुंबई, दि. 16 (विमाका) - वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले  राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी

Image
  सर्वांनी मिळून ‘ महाराष्ट्र भूषण ’  पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करु                                               -उद्योगमंत्री  उदय सामंत नवी मुंबई दि. १२ :-महाराष्ट्र भूषण पुरस्कार  2022  च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी सुरु असून, सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खारघर येथे केले.  सन  २०२२ या वर्षासाठीच्या  महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना  दि. १६ एप्रिल, २०२३  रोजी देण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली,  त्यावेळी ते बोलत होते.           या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,    नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.