Posts

Showing posts from 2016

धीयो यो न: प्रचोदयात !

Image
         तिन्ही लोक दीप्तिमान करणाऱ्या सूर्यासारखी आमची बुद्धी तेजस्वी व्हावी ही आपली आद्य प्रार्थना आहे ! अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आशाच भारतीय संस्कृती आणि आध्यात्मामध्ये पदोपदी प्रतीत होते. ज्ञानाधिष्ठित समाज हे भारतीयांच्या सुप्त इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. परलोकाचे वेध लागलेल्या भारतीय समाजाला 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा विचार मान्य नसून आपल्या अधिभौतिक प्रगतीचे वेड लागले आहे. सम्रुद्र पार करून नवनवी यशोमंदिरे पार करणारे  भारतीय खऱ्या अर्थाने 'हे विश्वची माझे घर' हा वैश्विक विचार खरा करत आहेत. बुद्धिनिष्ठ,विवेकनिष्ठ,तर्कनि ष्ठ,विज्ञाननिष्ठ असे शब्दप्रयोग हल्ली वारंवार वापरले जातात.  आपली बुद्धी मिळविलेल्या माहितीवर कौशल्याच्या बळावर प्रयोग करून नवनवीन अनुभव घेत असते.अनुभवाचे आंतरिकरण झाल्यावर आपल्याला अनुभूती मिळत असते.याच अनुभूतीतून आपल्या बुद्धीला ज्ञानाचे दर्शन घडते.ज्ञानाच्या शहाणपनातून प्रतिभेच्या साथीने बुद्धी नवनवीन शोध लावते.मौलिक विचाराच्या शिडीवर चढून बुद्धी प्रज्ञावान होते.ह्या प्रज्ञेचे विद्युल्लतेसारखे चपळ रूप म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा ! छत्रपती

विकासयात्रेवर सैराट पनवेल !

Image
बदलते पनवेल बहरते पनवेल                         मुंबईवरील वाढता नागरी ताण कमी करण्यासाठी नवीमुंबईची  निर्मिती राज्यशासनाने केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील  पनवेल  तालुक्याती ल बराचसा भाग शामिल असल्याने नागरीकरणाचे लोन पनवेलमध्ये झपाट्याने पसरले. राज्यातील पहिली नगरपालिका असलेल्या पनवेल नगरपालिकेला नागरी जीवन कांही नवीन नसले तरी कोकणातील शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या पायुभूत सेवासुविधांच्या समस्या या शहराला भेडसावत होत्या. पनवेल म्हटले कि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मागोमाग लोकनेत्ते रामशेठ ठाकूर यांचे नाव घेतले जाते. स्थानिक भूमिपुत्रांनी अनेक वर्षे ठाकूर कुटुंबियांच्याकडे विश्वासाने पनवेलची सत्ता दिली आहे. मा. खा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या बहुआयामी  लोकसेवेचा वसा समर्थपणे पेलणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे त्यांचे सुपुत्र आ. प्रशांत ठाकूर. त्यांच्याच दूरदृष्टीतून १ ऑक्टोबर २०१६ पासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली  आहे.महापालिकेला आधी विरोध करणारे अचानक  समर्थन करू लागले. दुसरीकडे महानगरपालिका आ. प्रशांत ठाकूर यांनी स्वतः च्या राजकीय फायदयासाठी केली असल्याची वावडी उ

रविवार १३ नोव्हेंबर २०१६ @ रामप्रहर

Image

भारताचे लाडके राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा आवडलेला संदेश

      केवळ आपली राजकीय व्यवस्थाच शेतकरी,वैज्ञानिक,अभियंते,डॉक्टर,वकील व अन्य व्यावसायिक यांना आवश्यक पाठिंबा देऊन आपली राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करू शकते. हरित क्रांती,धवल क्रांती,अंतराळ मोहिमा,संरक्षण मोहिमा,विज्ञान तंत्रज्ञानातील मोहिमा आणि विकासासाठी पायाभूत रचना हे सारे आपण सध्या करू शकतो. आपण जे कांही आहोत ते आपल्या राजकीय व्यवस्थेमुळे आहोत. म्हणून देशातील युवकांनी राजकारणापासून दूर राहता कामा नये.\एवढेच न्हवे तर स्फूर्तीसाठी,मार्गदर्शनासाठी  आणि नेतृत्वासाठी राजकारणाच्या सर्वच क्षेत्रात उतरावे.           तरुणांची पेटलेली मने "मी करू शकतो " या उत्साहाने व "भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल" यावरच्या त्यांच्या विश्वासाने भारली आहेत. जर तुम्हाला आपण हे सर्व करू शकतो असे वाटत असेल तर भारतात सर्वच क्षेत्रात नवे सर्जनशील नेतृत्व विकसित होईल ! यातूनच ग्रामीण भारतालाही शाश्वत विकासाची दिशा मिळेल. मला असे ठामपणे वाटते की, माझ्या देशातील युवकवर्ग हा राजकारणात प्रवेश करून आपल्या देशावरील निष्टेचे एक आगळे दर्शन घडवेल. तसेच प्रामाणिकपणा,मूल्यांकनपद्धत,धैर्य,निर

सैराट झाल जी....

उत्कृष्ट कलाकृती पाहिली कि प्रतिक्रिया दिल्याशिवाय मन मोकळे होत नाही.     मला वाटते प्रत्येकजन कधिकरी कशासाठीतरी सैराटलेला असतो मात्र जगरहाटीची वस्तुस्थिती लक्षात येइप्रयंत खुप उशिर झालेला असतो.   महाराष्ट्र जातिबाह्य लग्न केले म्हनुन विवाहितास मारन्यामध्ये देशात खुप मागे आहे हे लक्षात घ्या... कदाचित म्हनुन तर एवढी कळकळ बर्याच दिवसांपासुन व्यक्त होत आहे.   असो, स्त्रिप्रधान कलाकार असनारा मराठीतिल पहिला चित्रपट असावा !      वास्तविक दुख: विसरन्यावर परदेशात एक उपचार पद्धती आहे ति म्हनजे सॅड ड्रामा पहायचा मग आपले दुख: कमी होते. मात्र सैराटचा फॉर्म नविन आहे त्यात कॉमेडी आनि मेलोडि एकत्र आहे ! हॅपी एंडिंगच्या कल्पनेला छेद देत अंतर्मुख व्हायला लावनारा सैराट खरा संपत नाही तर सुरु होतो कारन रोजच्या धकाधकिच्या जीवनात परश्या व आर्ची सतत कुटुंब उद्धारासाठी एकाकि संघर्ष करत असतात सोबत पुर्वग्रह/अंधश्रद्धा/अद्न्यान आणि बरेचकाहि घेवुन.....     शेवटी रडत बसेल तो मराठी मानुस कसला; उत्कट जगने हा स्थाइभाव ठेवुन वाजवा झिंग झिंग झिंगाट.... बाबुराव खेडेकर

शब्द

संत तुकारामानी सहज लिहित लीहिता किती छान लिहून ठेवलेय बघा.... घासावा शब्द | तासावा शब्द| तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी|| शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग, खमके | ठेवावे भान | देश ,काळ, पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे || कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग | जातपात धर्म | काढूच नये || थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे| मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान ,कर्म ,भक्ती | स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द || शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल | शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं || जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता | पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये ||
Image

प्रासंगिक

संविधानावरील/कायद्याच्या राज्यावरील  श्रद्धा अढळ ठेवा !          जे एन यु प्रकरण असेल किंवा रोहित वेमुलाचे उदात्तीकरण (आरक्षणवादी ?पटेल पण आठवा !) अभिव्यक्ती स्वातंत्र या मुद्यावरून नागरिक ज्या आतताई पद्धतीने वागत आहेत त्यामुळे समाजमन कसे आहे हे कळते. या समाजमनाला नियोजित वाटेवर घेवून जाण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारा प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचे एकवेळ ठीक आहे पण ज्यांनी समाज्याला मार्गदर्शन करायचे असा बुद्धिवादी वर्ग सुद्धा या विचारधारांचा बळी ठरावा हे दुर्दैव !राजधानी दिल्लीत नेहरू विद्यापीठातील काही वादांमुळे  न्यायालयातील वकीलही कायदा हाती घेऊ लागले आहेत आणि त्यांनी देशद्रोही घोषणा देणार्‍यांना चोपण्यापर्यंत मजल मारली आहे.दिल्लीत कायदे विशारदांचा हा पवित्रा येऊ घातलेल्या धोक्याचा इशारा आहे. सामान्य माणूस कायद्याविषयी अनभिज्ञ असतो. पण कायद्याचा विद्यार्थी मानला जाणारा वकील, कायद्याचे पावित्र्य जपायला कटीबद्ध असतो. तीच गोष्ठ भारतीय पत्रकारितेची आहे. पत्रकारितेमध्येसुद्धा डावे उजवे असा भेद सरळ दिसू लागला आहे. सर्वांनी जनतेला गृहीतच धारले असावे ! माझा या लोकशाहीच्या

शिवजयंती विशेष

                शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिले आणि अनंत अडचणींना सामोरे जात पूर्ण ही केलं. कधी कधी माघारही घ्यावी लागली पण त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न केले. सातत्याने ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष केला. सगेसोयरे विरोधात गेले तरी त्यांनी हाती घेतलेले कार्य तडीस नेले.               ✅  ध्येय निश्चित करा. ✅  नियोजन करा ✅  कष्ट घ्या. ✅  सातत्याने प्रयत्न करा. ✅  तुम्हाला मदतीसाठी लोक हात पुढे करतील. ✅  छोट्या पराभवाने निराश होऊ नका.       चांगल्या गोष्टी संघर्षाशिवाय मिळत नाहीत. शिवाजी महाराजांचे काही गुण जरी अंगिकारले तरीही तुमची स्वप्ने पूर्ण होतील. आजच्या दिवशी प्रतिज्ञा करा की मी माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करेन. हर हर महादेव ... 🚩 जय शिवाजी, जय भवानी