Posts

Showing posts from November, 2017

Break in sakal !

Image

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

आनंदवृत्ती संतुलनाचा भावनेसमान आहे.  जेंव्हा जीवनाला आपल्या हृदयाचं गाणं गाणारा गायक मिळत नाही तेंव्हाच ते अशा एखाद्या दार्शनिकाला जन्म देते, जो त्याच्या मनातलं गुज सांगू शकेल.  प्रत्येक बीज एका इच्छेसमान आहे.  सत्याचा शोध घेण्याकरिता दोन माणसं हवीत,एक ते सांगणारा आणि दुसरा ते समजून घेणारा.  एक स्त्री आपल्या चेहऱ्यावरील भावनांना एका हलक्याशा स्मितहास्याच्या पडद्यानं झाकू शकते.  जो मनुष्य तुमची सेवा करतो, त्याच ऋण सुवर्णांपेक्षा मौल्यवान वस्तूने फेडणंही कठीण आहे. म्हणून एक तर त्याला आपलं हृदय द्या नाहीतर त्याची सेवा करा.  प्रत्येक साप एका पिल्लाला जन्म देतो,जो मोठा होऊन त्यालाच खाऊन टाकतो.  पृथ्वी ज्याला आकाशाच्या पानांवर लिहिते अशा कविता म्हणजे वृक्ष; पण आम्ही त्यांना तोडून त्यापासून कागद बनवतो, ज्यावर आम्ही आमचे पोकळ विचार लिहू शकू.   मृत्यूच यथार्थतेला कायम प्रकट करतो. महात्मासुद्धा शारीरिक गरजांपासून सुटका मिळवू शकत नाही.  आईच्या हृदयातल्या शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या बाळाच्या ओठांवर खेळतं.  बऱ्याचशा स्त्रिया पुरुषांचं मन मोहून घ