Posts

Showing posts from May, 2015

मुख्यमंत्री मासिकाचे कार्यकारी संपादक या नात्याने मी मे महिन्याच्या अंकासाठी लिहिलेले विचार…

'अवघाची संसार सुखाचा करीन ' या प्रतिज्ञेने हि लेखणी हाती धरली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय ज्ञानाची सोप्या भाषेत रुपांतरे करून पाठविण्याचा; भारतीय इतिहासातील थोरांची रसरशीत चरित्रे आणि जगातील इतिहासाचे थोडक्यात सार लिहून पाठवायचे आहे. संघटनेची सूत्रे,शिक्षणाचे महत्व आणि विशाल भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचा मानस आहे. हा अंक ज्याचे हाती पडेल ते प्रयत्नशील पुरुषार्थासाठी उठून मृतप्राय पडलेल्या समाजास संजीवनी देतील व समाज खडबडून उठेल असे चैतन्य प्रसार करण्याचे ध्येय ठेवून भूतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची उत्कटता प्रसवायची आहे. जन्मभूमीचे सुपुत्र दारू पिऊन बरबाद होत असताना,सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला असताना,सुशिक्षित तरुण शहराकडे विस्थापित होत असताना,महागाईने जनता त्रस्त झाली असता,परिवहन आणि आरोग्य व्यवस्था निपचित पडली असताना कोणा सॠदय व्यक्तीस सुखाची लालसा,विलासांची आसक्ती आणि भोगाची रुची सुचेल? ज्या राष्ट्रात योग्य स्वाभिमान नाही,स्वधर्म,स्वभाष आणि स्व:इतिहास याबद्धल भक्ती व पुज्यभाव दिसत नाही ते राष्ट्र स्वातंत्र सुखाच्या स्वर्गीय फळांचा आस्व