Posts

Showing posts from August, 2023

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू...

            केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. 19 मे 2023 च्या पत्रानुसार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे.             प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. 5 पाच हजार देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात रु. 6 हजार लाभ देण्यात येणार आहे.             गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात रु.5 हजार तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात रु.6 हजार लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्य

मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक योजना

            कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या लेखातून...                 सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्या

🚩शिकागो येथिल सर्व धर्म परिषदेस प्रा नामदेवराव जाधव यांना निमंत्रण🙏

Image
संभाजीनगर :- जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्व धर्म परिषद या वर्षी दिनांक 14ऑगस्ट ते 18ऑगस्ट या कालावधीत शिकागो अमेरिका येथे संपन्न होत आहे. या सर्व धर्म परिषद साठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधत्व करण्यासाठीचे निमंत्रण नुकतेच प्रा. नामदेवराव जाधव ज्येष्ठ इतिहासकार प्रसिद्ध लेखक आणि जागतिक कीर्तीचे वक्ते यांना मिळाले आहे.           आपणा सर्वांना कल्पना आहेच की या पूर्वी जेव्हा शिकागो येथे 1893 साली जी सर्व धर्म परिषद झाली होती तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म आणि भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता तब्बल 130वर्षानंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळाला असून  हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसधी प्रा. नामदेवराव जाधव सर यांना मिळाली आहे. या कार्यक्रमासाठी चे तसे अधिकृत निमंत्रण त्यांना मिळाले असून शिकागो येथील सर्व धर्म परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. प्रा नामदेवराव जाधव शिकागो येथे हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नावर बोलणार असून हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार या स

मराठा तरुणांना 'सारथी’ अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम

         मुंबई - छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.  जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.           '  सारथी  '  च्या लक्षीत गटातील मराठा ,  कुणबी ,  मराठा-कुणबी व कुणबी मराठा या प्रवर्गाच्या एकूण २० , ००० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.             कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam. gov.in/users/sarthi   या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी.             या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्याम