Posts

Showing posts from January, 2022

'अस्वस्थ दशकाची डायरी'चे स्टोरीटेलवर प्रकाशन !

प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यां च्या  ' अस्वस्थ दशकाची डायरी ' चे स्टोरीटेलच्या ऑडिओबुक्समध्ये प्रकाशन!   भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर ,  दक्षिण ,  पूर्व ,  पश्‍चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे ,  मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित ,  सतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन ,  तेथील अनुभव प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी  ‘ अस्वस्थ दशकाची डायरी ’ त लिहिले आहेत. मन अस्वस्थ करणारा हा अनुभव आता आपल्याला  ' स्टोरीटेल ' च्या  ' ऑडिओबुक्सद्वारे श्राव्यरूपात खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्याच आवाजात ऐकता येणार आहे.   अस्वस्थ दशकाची डायरी ’  हे पुस्तक लिहिणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा प्रवास माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा आहे. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले. स्वेच्छा निवृत्वृतीनंतर चाणक

चिखलोली स्थानकाचे भुसंपादन अंतिम टप्प्यात

भुसंपादनानंतर अडीच वर्षात स्थानक पूर्ण  करणार   ·         कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या प्रयत्नांना यश   मुंबईः अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या चिखलोली स्थानकाच्या भूसंपादनाच्या कामाला गती आली असून भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मध्य रेल्वेचे विभागीय  व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासोबत  पार पडलेल्या बैठकीनंतर डॉ. शिंदे यांनी ही  माहिती दिली. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अडीच वर्षात स्थानक पुर्णत्वास  जाणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे.   गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या चिखलोली स्थानकाच्या उभारणीत गेल्या तीन वर्षांपासून वेग आला असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार या स्थानकाच्या उभारणीसाठी आग्रही आहेत. नुकतीच खा. डॉ.  श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत चिखलोली स्थानकाच्या कामाचा आढावा  घेतला. अंबरनाथ आणि  बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चिखलोली स्थानकाची उभारणी केली जाते आहे. 2019 -2020 या वर्षात या कामाला सुर

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला गती !

Image
कल्याणच्या लोकग्राम पादचारी पुलाचीही निविदा जाहीर   ·          कल्याण लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत घेतला कामाचा आढावा   मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेवरील कल्याण या महत्त्वाच्या स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या कामासाठी आवश्यक जागेची उपलब्धता असल्याने रेल्वे प्रशासन प्रत्यक्ष काम सुरू करणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कल्याणच्या महत्त्वाकांक्षी अशा लोकग्राम पादचारी पुलाची ही निविदा जाहीर करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.   मध्य रेल्वेवरील कल्याण हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक पाहता येथील मार्गिका आणि फलाट कमी पडू लागले आहेत. त्यामुळे मुंबई नागरी वाहत

मराठा शौर्य दिन !

Image
*संक्रांत* आजपासून 261 वर्षांपूर्वी हरयाणातील पानिपतावर लाख सव्वालाख माणसं उपाशी बसलेली होती. महिन्याभरापासून त्यांची आबाळ सुरू होती. खायला पुरेसं अन्न नव्हतं की थंडीत ल्यायला पुरेसे कपडे नव्हते. तरीही अशा ह्या अर्धपोटी लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच एका प्रखर लढाईला सुरवात केली. त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या एका बलाढ्य शत्रूवर त्यांनी प्राणपणाने हल्ला चढवला. कोण होती ही लोकं? त्यांना मराठे म्हणायचे,  मराठे, अनेक जातीचे मराठे होते त्यांच्यात. पाटील होते, देशमुख होते, चित्पावन होते, धनगर होते, देशस्थ, कऱ्हाडे, कुणबी,  महार, माळी, तेली, कोळी, वंजारी सगळे होते. मुसलमानही होते. त्यांनाही मराठेच म्हणायचे. त्या संक्रांतीला महाराष्ट्र एकजूट होऊन मराठा म्हणून लढला. बरोबर मध्यप्रांतालाही घेतलं. बुरंडी घाटावर पडलेल्या दत्ताजी शिंद्याचा अपमान पुण्यात बसलेल्या नानासाहेब पेशव्याच्या मनाला झोम्बला. पेशव्याच्या नैतृत्वाखाली लढायला मल्हारबा होळकरांना वाईट वाटलं नाही. जरीपटक्याखाली जमलेल्या सैन्यात जाती पाळल्या जात नसतीलच असं नाही पण तरी त्या सैन्यात जातींच्या भिंती नव्हत्या. आयुष्य फार साधं

भाजप नेता होमनारायन वर्माजी द्वारा शासकीय योजना कार्ड कॅम्पका आयोजन

Image
कल्याण : उल्हासनगर भारतीय जनता पार्टीके सरचिटणीस होमनारायन वर्मा इनकी तरफ से सुभाष नगर की उनकी जनसंपर्क कार्यालय मे ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड और युनिव्हर्सल कार्ड बनाने का कॅम्प चल रहा है। परिसर के शेकडो नागरिकोने मंगलवारसे चल रहे इस कार्ड कॅम्पका लाभ लिया है। यह कार्य 15 दिन चलेगा तो सभी नागरिक इस कॅम्प का लाभ उठाये ऐसा आवाहन होमनारायन वर्मा इन्होंने किया है।

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी

*कोकणचा विकास व विद्यार्थ्यांमधून कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची स्थापना करा!* *गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी* *रत्नागिरी:-* कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि कोकणातील विद्यार्थ्यांना त्याच भागात उच्च शिक्षण मिळावे,उच्च शिक्षित तरुणांनी स्थानिक भागात रोजगार निर्मिती करावी या हेतूने रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात खंडागळे यांनी म्हटले आहे की,कोकणात आधीच उच्च शिक्षणाच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.रोजगारा प्रमाणेच बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी 10 वी 12 वी नंतर अन्य जिल्हात स्थलांतर करतात. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती,तेथे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगार संधी याला सुसंगत अभ्यासक्रम आजही कोकणात उपलब्ध नाहीत. कोकणचे विद्यार्थी हे अभ्यासात हुशार आहेत.दर वर्ष

कोरोना: उपाययोजना आणि दक्षता

कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. यामुळे मोठे आर्थिक-सामाजिक बदल घडले. मात्र शासनाने सावधगिरीने उपाययोजना केल्या आणि जगजीवन पूर्वरत होऊ लागले. शासनाच्या विशेष प्रयत्नातून मोठयाप्रमाणात होणारे नुकसान टाळता आले.  “जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते, तेव्हा आम्हाला प्रचंड काळजी वाटते. तर जेव्हा संख्या कमी होऊ लागते, तेव्हा आम्ही निश्चिंत होतो. ही मानसिकता बदलावी लागेल” असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात सांगतात. “गाफील राहू नका, कोरोना अद्याप संपलेला नाही. दरवर्षी कोरोनाचे नवनवीन उत्परिवर्तन तयार होत आहेत. यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेणे हा एकमेव उपाय आहे.” हे त्यांचे वाक्य आजही खरे वाटते आहे. कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. यामुळे साऱ्यांची काळजी वाढली आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका प्रांतामध्ये

पमपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने स्वच्छता दूतांसाठी आरोग्य शिबिर

Image
*नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने व सुमनकांता चाईल्ड क्लिनकच्या सहकार्याने स्वच्छता दूत यांच्यासाठी मोफत धनुर्वात (टी टी) इंजेक्शन सुविधा* ! पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं.४ च्या कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभागातील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छता दूत यांना डॉ रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व ऍडल्ट किलीनिक यांच्या वतीने आज आज मोफत धनुर्वात (टी टी ) इंजेक्शन देण्यात आले.  सदर वेळी बोलताना नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूत यांनी आपला परिसर तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. ते आपल्या स्वतःची काळजी न करता शहरातील राहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छता करत असतात. अश्या वेळी कुठेतरी त्यांच्या देखील शरीर स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले व तीच बाब लक्षात घेता एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील ती जबाबदारी असल्याचे सांगत आज प्रभागातील सर्व स्वच्छता दूत यांना धनुर्वातचे इंजेक्शन मोफत देण्या

पशुपालकांसाठी शासनाच्या विविध योजना

Image
www.ah.maharshtra.gov.in   या संकेतस्थळावरून -------------------------------------- ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (  NATIONAL LIVESTOCK MISSION  )  राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पशुपालक ,  शेतकरी समूह गट ,  महिला बचत गट व उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांना ५० % अनुदानावर विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी  www.ah.maharshtra.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार डॉ.रुपाली सातपुते यांनी केले आहे. तसेच पशुधन व कुकूट वंश सुधारणा ,  पशुखाद्य व वैरण विकास  , आणि नावीन्य पूर्ण संशोधन व विस्तार हे तीन उप अभियान देखील जिल्हात राबविले जात असून लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून या योजनांचाही लाभ घेता येणार आहे.   पशुधन व कुकूट वंश सुधारणा उप अभियान या  उप अभियानातर्गत कुकूटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करण्यासाठी पशुपालकांना ५० % अनुदानावर कमीत कमी १००० देशी पक्षी संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्