Posts

Showing posts from February, 2022

शिवसेना नेते आझाद मैदानात संभाजीराजेंच्या भेटीला

Image
आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी मराठा तरुण आक्रमक मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायाल्यात प्रलंबीत असल्याने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. शनिवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावरून हटणार नाही, असा पवित्रा संभाजी राजेंनी घेतला आहे. त्यामुळे आज त्यांना भेट देण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते आले होते. यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सर्वांना सामोरे जावे लागले. उपोषणासाठी बसलेल्या खासदार संभाजी राजेंची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते आझाद मैदानात आले होते. सुरपातीस खासदार राहूल शेवाळे यांनी येवून संभाजीराजेंची चौकशी केली. तर त्यानंतर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत हे आझाद मैदानावर आले. यावेळी आझाद मैदानात बसलेल्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संभाजी राजेंनी स्वतः उभं राहून कार्यकर्त्यांना शांत केलं. ''माझ्यासमोर असा उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य न

उल्हासनगरमध्ये स्वच्छ हवा संमेलनाचे आयोजन

कल्याण : (दि.25 फेब्रुवारी) येथील सिंधू युथ सर्कल हॉलमध्ये सोमवारी दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी स्वच्छ हवा संमेलनाचे आयोजन वातावरण या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे. शहरातील पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने या बैठकीत उपस्थित राहून आपले विचार मांडावेत असे आवाहन उल्हासनगर मधील वातावरण मित्र बाबुराव खेडेकर आणि विनोद सेवलानी यांनी केले आहे.          गेली तीन महिन्यापासून उल्हासनगर शहरात वातावरण या एनजीओ मार्फत हवा प्रदूषण या विषयावर अभ्यास सुरू आहे. त्यासाठी शहरातील हवेचे नमुने घेण्यासाठी तीन ठिकाणी मॉनिटर बसवण्यात आले आहेत. या मॉनिटर द्वारे मिळणाऱ्या अचूक परिमानांचे निरीक्षण करन्यासोबत शहरातील लोकप्रतिनिधी,  प्रशासन, समाजसेवक, विचारवंत, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत हवाप्रदूषण याबाबत मतमतांतरे जाणून घेतली आहेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटीवर व सामूहिक मिटिंगसाठी मर्यादा आल्या होत्या मात्र सध्या थोडे नियम शिथिल झाल्यामुळे हवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. सदर बैठकीत हवा प्रदूषणाची कारणे त्

कोपरखैरणेतील 150 घरे जबरदस्तीने बेदखल

Image
नवी मुंबई :( ३ फेब्रुवारी २०२२) येथील डॉ. आंबेडकर नगर, बालाजी नगर कोपरखैरणे स्टेशनजवळ. गेल्या 20 वर्षांपासून येथे लोक राहतात. त्यापैकी बहुतांश पारधी समाजातील (भटक्या जमाती) आहेत. हजाराहून अधिक पोलीस, अधिकारी, सिडको कर्मचारी, एनएमएमसी कर्मचाऱ्यांनी ही अमानुष कारवाई केली आहे. 16 मे 2018 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा ठराव मंजूर होऊनही ही कारवाई करण्यात आली आहे. 150 कुटुंबांना कोणतीही सूचना न देता बेदखल करण्यात आले आहे आणि त्यांच्याकडे SRA योजनेनुसार 2000 पूर्वीची आणि 2011 पूर्वीची कागदपत्रे आहेत, त्यांच्या उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. डॉ.आंबेडकर नगर, कोपरखैरणे स्टेशन जवळ, बालाजी नगर येथे गेले 20 वर्षा पासुन पारधी समाजातील लोक या ठिकाणी राहतात त्यांच्यापैकी काही लोकांच्या कडे पात्र झोपडीधारक म्हणुन पुरावे असतानाही व माननीय उच्च न्यायालयामध्ये केस चालू असताना सुद्धा कोणाचीही न ऐकता ही तोडक कार्यवाही हजारो पोलीस, नगर पालिका कर्मचारी, अधिकारी, CIDCO कर्मचारी यांनी ही अमानुषपणे कार्यवाही केली आहे व शासनाचे कायदे आणि न्यायालयाला न जुमानता ही कार्यवाही झाली आहे. याचा