Posts

Showing posts from February, 2020

म्हणे, स्वतःची संपत्ती विकून ठेवीदारांचे पैसे देणार.... ! मग स्वतःचे घर सोयऱ्याना विकून त्याच घरात भाड्याने का राहता ?

Image
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका दैनिक रामप्रहरने सुरु केली आहे. सदर वृत्तमालिकेत सविस्तरपणे पुराव्यानिशी या घोटाळ्याची पोलखोल केली आहे.  कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देताना कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांसारख्या सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला देणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील या सार्वजनिक संस्था स्वत:ची जहागिर समज