Posts

Showing posts from February, 2021

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार :- ना. शिंदे यांची ग्वाही

Image
उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही   ठाणे दि. 27- ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून, नदीचे पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली नजीक उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते. श्री. शिंदे यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आ

प्रताप नायडू ग्लोबल चेंजमेकर पुरस्काराने सन्मानित

Image
मुंबई :- आंध्रप्रदेश मध्ये शेती क्षेत्राशी निगडीत योजनांचा लाभ शेकडो शेतकरी गटांना मिळवून दिल्याबद्दल प्रगतिशील शेतकरी प्रताप नायडू यांना प्रोजेक्ट हंड्रेड आणि मानिनी फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ग्लोबल चेंजमेकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील हॉटेल योगी मिडटाऊन येथे शनिवारी दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमात पद्मश्री गिरिष प्रभूने आणि पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा तसेच आयएफएस ऑफिसर रंगनाथ नायकवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या निवडक समाजसेवींचा यावेळी सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय नागरिकांचा विकास विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे प्रताप नायडू यांनी यावेळी सांगितले.

शिवसह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी

Image
कल्याण :- शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून कोणाच्या सावटात सुद्धा बाईक रॅली काढत शिवसह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.           छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीमध्ये शुक्रवारी 19 फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या शिव मावळ्यांनी संपूर्ण शहरांमध्ये बाईक रॅली काढत सोशल डिस्टंसिंग चां संदेश देत शिवजयंती साजरी केली. सकाळी आठ वाजता चिंचपाडा गाव येथून काटेमानिवली मार्गे चक्की नाका तसेच  पत्री पूल मार्गे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर सर्वानंद चौकमार्गे दुर्गाडी किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.     रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे  अध्यक्ष सतीश पेडणेकर, मार्गदर्शक भागोजी पाटील, महेश भोसले, प्रदेश अध्यक्ष सुनील बोरणाक, प्रवक्ते बाबुराव खेडेकर, संतोष इंगळे, नारायण गोते, भूषण ठाकरे, रमेश पाटील, कौस्तुभ यादगिर, आनंदा कांबळे, सागर दोरुगडे, धनंजय दोरुगडे, प्रशांत साळुंखे, पांडुरंग चौगले  यांच्यासह अनेक शिवभक्तांनी सहभाग

खारघर तळोजा भाजपतर्फे टाळा ठोको आंदोलन आणि हल्लाबोल

Image
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी,विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर सतत अन्याय होत आहे असा आक्रोश करत भाजपतर्फे राज्यभर सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन शुक्रवारी 5 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले. खारघर तळोजा मंडळतर्फे सुद्धा असेच आंदोलन करण्यात आले. कोरोंना काळात सर्वसामान्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर याच कालावधीत भरमसाठ वीज दरवाढ करण्यात आली. दुपटी तीनपटीपेक्षा जास्त बिल यायला सुरुवात झाली आहे. वातावरण थंड होण्यासाठी वीज बिल दरवाढ कमी करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात बिल कमी न करता सेक्शन ६६ अंतर्गत अनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे. महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे .याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर-तळोजा मंडलाकडून  महावितरणाविरोधात _टाळा ठोको व हल्लाबोल_ आंदोलन व निषेध करण्यात आला.   याप्रसंगी मंडलातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या निषेध मोर्च्यांत सामील झाले. यामध्ये ख

योगिधाम महाफेडरेशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

Image
कल्याण :-  परिसरातील बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित योगीधाम परिसरात प्रथमच ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आनंद सोहळा सार्वजनिक रित्या स्थानिक नगरसेवक दयानंद गायकवाड यांच्या प्रयत्नांतून साजरा करण्यात आला. योगीधाम महा फेडरेशनचे अध्यक्ष  सुभाष  तानवडे यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सुनील जाधव आणि विमल झा यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.           या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे सर्व पक्षीय नेत्याची मांदियाळी तसेच योगीधाम परिसरातील सर्व को. ऑप. हौ. सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक माजी आ. नरेंद्र पवार, माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  संदीप देसाई साहेब, बी. जी. पी. शहर अध्यक्ष  प्रेमनाथ म्हात्रे , करुणा शंकर मिश्रा, भाजपा जिल्हा चिटणीस करुणा रत्नपारखी, कल्पना पिल्लई, अनिल शुक्ला,तर्केश शुक्ला, योगेश बाविस्कर, विनीत परमार, ललित रामचंदानी, ज्ञान प्रकाश, रूमा बनर्जी, आर एस गाडे, त्रीलोक सिंग, सोनकर, बलराम बुनकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येन

कल्याण पूर्व मध्ये कचऱ्याचे साम्राज्य सुनिल बोरनाक यांचे प्रशासनाला लेखी निवेदन

 कल्याण पूर्व मध्ये कचऱ्याचे साम्राज्य सुनिल बोरनाक यांचे प्रशासनाला लेखी निवेदन कल्याण:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा सरचिटणीस सुनील बोरनाक यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय वॉर्ड प्रभाग अधिकारी यांना शुक्रवारी (दि.5 फेब्रुवारी) रोजी लेखी निवेदनाद्वारे कल्याण पूर्व परिसरातील नागरी वस्तीमध्ये उघड्यावर टाकलेला कचरा उचलून तेथे कलर कोटिंग डब्बे बसवणे बाबत निवेदन केले आहे.      कल्याण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोबतच नव्याने समाविष्ट होत असलेल्या 18 गावांची स्वच्छता आणि आरोग्याची जबाबदारी कंडोमपाचीच आहे. त्यामुळे चिंचपाडा गाव, लक्ष्मी नगर, माणेरे गाव, अडवली, नांदिवली, पिसवली, आशेळे, द्वारली पाडा येथे प्रमुख रस्त्यांवर चर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न गहन बनत आहे. म्हणून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील कचरा उचलून तेथे वृक्षारोपण तसेच कलर कोडींग डब्बे अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा सरचिटणीस सुनील बोरनाक यांनी केली आहे. त्यांच्यासोबत भागोजी पाटील आणि नयना भंगे हे सुद्धा उपस्थित होते.