Posts

Showing posts from March, 2022

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रविवारी विरार - अर्नाळ्यात!

Image
·       ' नूतन गुळगुळे फाउंडेशन '  निर्मित दिव्यांग मुलांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी राज्यपाल अर्नाळ्यात! ·       कोविड-१९ मध्ये पालक गमावलेल्या  ‘ दिव्यांग मुल आणि त्याचे एकल पालक यांच्याकरिता वसतिगृहाची ’  निर्मिती! ·       १७ वर्षाखालील संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातल्या  ' दिव्यांग मुलांना संपूर्ण आयुष्यभर निवास - उपचाराची व्यवस्था! ·            स्वावलंबन प्रशिक्षणासाठी विशेष केंद्राचीही निर्मिती कोरोनामुळे पालक गमावलेल्या  ‘ दिव्यांग ’  बालकांकरिता विरार ,  अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात  येणार  असून  येत्या ३ एप्रिल २०२२  रोजी , सकाळी ११:२२ वाजता, श्री स्वामी कृपा ,  प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार येथे    महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल  महामहीम  भगतसिंग कोश्यारी यांच्या  शुभ  हस्ते  ‘स्वानंद सेवा सदन’  वास्तूचे  भूमिपूजन संपन्न होणार आहे . या वसतिगृहाची निर्मिती  ‘ नूतन गु ळ गु ळे  फाऊंडेशनद्वारे करण्यात  येणार  आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या  ‘ दिव्यांग कल्याण आयुक्तालया ’ ने या उ

*3 वर्षांच्या चिमुकलीसाठी माणुसकी धावली !

Image
 आजही आरोहीच्या मागे लोकांनी उभं राहण्याची गरज* रत्नागिरी तालुक्यातील कु.आरोही सचिन घुमे या 3 वर्षाच्या चिमुकलीचे नुकतेच वाडिया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. तिला डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. तातडीने ऑपरेशन होणे गरजेचे होते. खासगी रुग्णालयात सुमारे 15 लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र या मुलीसाठी विविध मान्यवर वेळीच धावून आले आणि तिचे ऑपरेशन अगदी मोफत झाले. माणुसकी या चिमुकली साठी धावून आली. त्यावेळी तिच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  साहेब यांनी  तातडीने उपचार मिळण्यासाठी मोठे सहकार्य केले. गाव विकास समितीचे सुकांत पाडाळकर यांनीही आरोही च्या कुटूंबियांना योग्य वेळी मार्गदर्शन केले. गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी मित्र व भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांना या मुलीला मदत व्हावी यासाठी शब्द टाकला होता. निलेश चव्हाण यांनी त्यांचे मित्र व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना सदर मुलीच्या उपचारासाठी वाडिया रुग्णालयात तातडीची मदत हवी असल्याचे कळवले.

स्थलांतराविरोधात गाविस'चे धरणे आंदोलन

Image
*कोकणातील तरुणांचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करावी-सुहास खंडागळे* ⭕ *गाव विकास समितीचे देवरुख येथे गावागावातील बेरोजगारी व वाढते स्थलांतर कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन.* देवरुख:-कोकणातील तरुणांमध्ये टॅलेंट आहे,मात्र कोकणात रोजगार संधी उपलब्ध नसल्याने येथील तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली सारख्या शहरात स्थलांतरित होतो.हे स्थलांतर थांबवण्यासाठी व तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र उद्योग प्राधिकरण स्थापन करावे अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे एकदिवसीय धरणे आंदोलनात मांडली. कोकणातील बेरोजगारी व गावागावातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्या संगमेश्वर विभागामार्फत देवरुख तहसील कार्यालय येथे बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलनाला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस

'सारथी'ने मागवल्यात आपल्या सूचना !

‘मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे ‘सारथी’चे आवाहन               मुंबई ,  दि. 4 : "मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" (लक्षित गट) या समाजातील महिला ,  विद्यार्थी ,  तरुण ,  शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत ,  याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत.             छत्रपती शाहू महाराज संशोधन ,  प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ,  पुणे  या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा ( Vision Document) -  २०३० हा सर्वसमावेशक व व्यापक होण्यासाठी ,  सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत याबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत सूचना लेखी स्वरुपात  पाठवाव्यात असे आवाहन  सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.                "मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.यास्तव या घटकां

आर.टी.ई प्रवेश नोंदणीसाठी १० मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

ठाणे दि.४ (जि.प):    शासनाने दिलेल्या सुचनेनुसार १० मार्च २०२२ पर्यंत आर.टी.ई  प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज विहित मुदतीत भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.   जिल्हात आर.टी.ई प्रवेशास उत्तम प्रतिसाद मिळत असून आजअखेर एकूण २७४५५ बालकांचे प्रवेशासाठी अर्ज आले आहेत. त्यापैकी २०२५६ अर्जांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून ७१९९ अर्जांची नोंदणी विविध कारणानी अद्याप अपूर्ण आहे. आर.टी.ई प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित तसेच सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी शासनाने वयोमर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये प्ले ग्रुपसाठी ४ वर्ष ५ महिने ३० दिवस, ज्युनियर केजीसाठी ५ वर्ष ५ महिने ३० दिवस, सिनियर केजीसाठी 6 वर्ष ५ महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी ७ वर्ष ५ महिने ३० दिवस अशी कमाल वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण  648  शाळा पात्र असून इयत्ता १ ली साठी   11469   व    पूर्व प्राथमिकसाठी  798  जागा उपलब्ध