Posts

Showing posts from 2022

भाजपतर्फे ख्रिसमस उत्सवाचे आयोजन

Image
भाजपतर्फे ख्रिसमस उत्सवाचे  आयोजन  नवी दिल्ली :-  आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोवा, महाराष्ट्र आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये ख्रिश्चन, विशेषत: कॅथलिक लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नेतृत्वाखालील भारतीय ख्रिश्चन मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला चालना देण्यासाठी समुदायासोबत पोहोचण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (CBCI) च्या मार अँड्र्यूज थाझाथ यांनी संसदेत मोदींची भेट घेतल्याच्या काही दिवसांनी हे घडले आहे. त्यांनी पोपला नवीन आमंत्रण देण्याबद्दल बोलले आहेत. नुकत्याच मेघालय हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमाविषयी बोलताना, भाजपचे प्रवक्ते टॉम वडाक्कन म्हणाले की हा समाजापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे आणि ते जोडले की हे व्यासपीठ प्रत्येकासाठी आहे.

डोंबिवलीतील शिधावाटप दुकानात मंत्रीमहोदयांच्या हस्ते संचाचे वाटप

Image
       ठाणे, - सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हायला हवी, आनंदात जावी, यासाठी राज्य शासनामार्फत दिवाळीच्या फराळासाठी लागणारे चार जिन्नसाचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब व अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सुमारे एक कोटी 62 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.             श्री. चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवली येथील कोपर चौकातील शिधावाटप दुकानात नागरिकांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप आज सकाळी करण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.             श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सामान्य कुटुंबांतील नागरिकांना दिवाळी सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून मदत करण्यासाठी अल्पदरात दिवाळी फराळासाठी लागणारे जिन्नस देण्याचा निर्णय घेतला.यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखऱ आणि तेल ही चार जिन्नस शंभर रुपयात देण्यात येत आहेत. या संचाचे वाटप करण्यात येत आहे.             शिधा

उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ लोकार्पणानिमित्त भाजपातर्फे राज्यातील 500 शिवालयांमध्ये कार्यक्रम

*भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आचार्य तुषार भोसले यांची माहिती* उज्जैन :-  येथे होणा-या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी राज्यात 500 शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार,आमदार आदी लोकप्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. ही माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि या कार्यक्रमाचे संयोजक मुरलीधर मोहोळ, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील महाकाल मंदिर भव्य कॉरिडॉरचे मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी लोकार्पण केले जात आहे. या कॉरिडॉरला ‘महाकाल लोक’ असे नाव देण्यात आले असून याचे काम दोन टप्प्यात केले जात असून 900 मीटर परिसरात हे काम करण्यात आले आहे. वाराणसी येथील काशीविश्वनाथ कॉरिडॉरच्या पाठोपाठ महाकाल कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानिमित्त प्रदेश भाजपातर्फे राज्यातील ज्योर्तिलिंग ठिकाणी तसेच शिवालयांमध्ये उज्

रिक्षाचा प्रवास महागला !

कल्याणमध्ये  ऑटोरिक्षा   व   टॅक्सीचे   नवीन   दर   लागू   ठाणे   :   मुंबई   महानगर   परिवहन   प्राधिकरणामार्फत   प्रवाशी   वाहतुकीच्या   ऑटोरिक्षा  , काळी   पिवळी   टॅक्सी   व   कुल   कॅब   यांचे    नवीन   दर   निश्चित   केले   असून  कल्याण शहरात  १   ऑक्टोबर   २०२२   पासून   हे   दर   लागू   झाले  असल्याची   माहिती   कल्याण चे   उप  प्रादेशिक   परिवहन   अधिकारी   (अतिरिक्त कार्यभार) विनोद साळवी  यांनी   कळविली  आहे .              या   पूर्वीचे   दर    दि . 01  मार्च  2021  रोजी    लागू   करण्यात   आले   होते .  परंतु   गतवर्षीच्या   तुलनेत   चालू   वर्षात   सी . एन . जी .  इंधनाच्या   दरात   वाढ   झालेली   अ सू न   सीएनजी   इंधनाचे   दर   रुपये   ४९ . ४०   वरुन   रुपये   ८० . ००   झालेले   आहेत .  खटुआ   समितीच्या   शिफारशीच्या   आधारे   सध्याचा   महागाई   निर्देशांक   व   वाढलेले   इंधनाचे   दर   तसेच   वाहनाची   सरासरी   किंमत   इतर   संबधित   बाबी   विचारत   घेऊन   त्याचप्रमाणे   ऑटोरिक्षा   व   टॅक्सी   चालक   मालक   व   प्रवास   करणाऱ्या   प्रवाशांच्या   हितास   प्राधान्य   देव

विशाखापट्टणम येथे आदिवासी महोत्सव संपन्न

Image
 अराकू व्हॅली:- सनड्रीम्स डिजि. प्रा. लि.चे अध्यक्ष प्रताप नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाला दिलेला उदात्तीकरण पाहून प्रेरणा घेत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवात पुद्दुचेरी राज्य गृहमंत्री नमशिवयम, रेणुका सिंग,बीजेपी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ एम चुबा आओ आदी मान्यवर उपस्थित होते. नमशिवयम यांनी आपल्या संबोधनात मोदीजीनी अशा लोकांना संधी दिली ज्यांनी देशाची प्रामाणिकपणे सेवा केली असे सांगताना द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती निवडले, ज्यांनी कधीच विचार केला नव्हता असा दाखला दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पाँडेचेरीच्या जनतेला विकासासाठी चांगल्या योजना मिळत आहेत असेही ते म्हणाले.  या महोत्सवात रेणुका सिंह यांनी संबोधित करताना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार १.१५ लाख आदिवासी गावांच्या उन्नतीसाठी काम करत असल्याचा उल्लेख केला. आदिवासी म्हणून आपण आपल्या आदिवासी संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे. देशभरातील १९७ आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ भगवान बिरसा मुंडा या

‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’

Image
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देखावा सजावट स्पर्धेची घोषणा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ठाणे  - महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने  ' माझा गणेशोत्सव माझा मताधिकार '  या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष  असून  सार्वजनिक ग णेशो त्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.   गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी  31  ऑगस्ट  2022  ते  9  सप्टेंबर  202 2  या कालावधीत  https://forms.gle/ 6j7ifuUA4YSRZ6AU7  या गूगल  फॉर्ममध्ये  माहिती भरून आपले देखावा सजावटीचे  छायाचित्रे व ध्वनिचित्रफित  पाठवा वे व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.              दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक ग

पनवेलमध्ये उद्या भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

Image
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ८०० प्रतिनिधींची उपस्थिती  पनवेल : भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज (दि. २२ जुलै) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.          पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, युवा नेते विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, ओबीसी से

हनुमान तरुण मंडळ यंदा करणार केळींचा गणपती !

Image
कोल्हापूर : ग्रामीण कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावात गेली अनेक वर्षे एक गाव एक गणपती असून यंदाचा गणपती पूजनाचा मान गावातील हनुमान तरुण मंडळाला आहे. पंचक्रोशीतच न्हवे तर जिल्ह्यात चर्चा होणारी गणेश मूर्ती हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असते. यावर्षीचे प्रमुख आकर्षण असणार आहे केळांपासून बनवलेली मूर्ती.  याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे.   हनुमान मंडळाचा गणेशोस्तव या चालू वर्षी 25 वा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेली 2 वर्ष संपूर्ण जगावर कोरोनाचे आस्मानी संकट होते त्यामुळे गणेशोस्तवच काय कोणताच सण साजरा करता आला नाही. सध्या हे संकट टळले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.       आतापर्यंत हनुमान मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यासह गणेशोत्सवात  गणपती ची विविध रूपे म्हणजे नारळ,दोरी,मोती,शेती अवजारे, वारकरी मंडळीच साहित्य, ऊस, नाणी (रुपये)अश्या सर्व प्रकारचे गणपती तयार करून नाविन्यपूर्ण आविष्कार केला आहे.  या परंपरेला अनुसरून यावर्षी देखील केळी पासून बनवलेला गणपती तयार करण्यात येणार आहे. सोबतच सा

कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात पर्यटनास बंदी

31 जुलै 2022 पर्यंत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू अंबरनाथ : पर्यटनस्थळे ,  नदी किनारा ,  धबधबा येथे पावसाळ्यात होणारे दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यतील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत दि. 4 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 या काळात धबधबा परिसरात मद्यपान करणे ,  धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे ,  खोल/वाहत्या पाण्यात उतरणे व पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रसांती माने यांनी दिले आहेत. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचे मंदिर व धबधबे आहेत. त्याचबरोबर चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळयाच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खोल व वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी ,  तारवाडी ,  भोज ,  वऱ्हाडे ,  दहिवली ,  मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी ,  पिंपळोली ,  आस्नोली

योगदिनी उत्थानयोग ! सत्यमेव जयते फाउंडेशनचा उपक्रम...

Image
*उत्थान योग आणि सत्यमेव जयते फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिन साजरा*  (अंबरनाथ) येथील उत्थान योग आणि सत्यमेव जयते फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा  जागतिक योग दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर योग शिबिराला जमलेल्या साधकांनी योग प्रात्येक्षिकासहित सिंगिंग बाऊल ध्यान पद्धतीचा देखील अनुभव घेतला. योग एक असं शास्त्र आहे जे शारीरिक, मानसिक,आध्यात्मिक,सामाजिक ह्या सर्व स्तरावर अगदी प्रभावी काम करते. समाजातील सर्व वयोगटातील लोकांनी दिवसातील ठराविक वेळ राखून ठेऊन नियमित योगाभ्यास केला पाहिजे.  त्यामुळे सर्व साधकांच्याकडून योगशिक्षक अविनाश सर यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली व योगाचे फायदे सर्वांना समजावून सांगितले. तर योगशिक्षक जितेंद्र सरांनी सिंगिंग बाउल ध्यान पध्दती करून घेतली. उपस्थित सर्व साधकांनी मिळालेल्या योग माहिती बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी उत्थान योग व सत्यमेव जयते फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.  सदर कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाउंडेशनचे  अध्यक्ष संदीप मेंगाणे, संस्थापक सुनील बोरनाक, संत साहित्य अभ्यासक मुक्त पत

*अखेर तारापूर प्रकल्पग्रस्तांचे तोंड उघडले :-*

Image
गेल्या 30 ते 35 वर्षात हे ना ते कारण सांगून तारापूर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणा-या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भांडे उघडे झाले आहे. दोन गावांचे पुनर्वसन हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारासाठी नसून केंद्र सरकारच्या INRP प्रकल्पासाठी असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हे पोफरण व अक्करपट्टी या दोन गावाच्या मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. येथील घरांच्या निकृष्ठ बांधकामामुळे शेकडो घरांची पडझड झाली असल्यामुळे व कमी आकाराचा भूखंड मोठ्या कुटुंबांना दिले असल्यामुळे कौटुंबिक वादामुळे व अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहसाठी पर्याय नसल्यामुळे अनेक कुटुंबे 17 वर्षानंतरही नवीन गावात राहण्यासाठी आली नाहीत, तसेच नवी पोफरण गाव समुद्रापासून 8 किमी अंतरावर असल्यामुळे  मच्छिमार समाजाची किमान 450 कुटुंबे समुद्रापासून 8 किमी अंतरावर जावून करणार काय? असा प्रश्न मच्छिमार कुटुंबियांना बेळसावत आहे. गेल्या 35 वर्षात प्रकल्पाने फक्त 72 प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपी नोकरी दिली आहे. याआधी प्रकल्पाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कायम स्वरूपी  नोकरी देण्याचे आश्वसीत केले अस

संताजी घोरपडे यांचा खून व गद्दार माने ...

Image
          मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती        संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन,सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या खालील वर्णनातून दिसून येते..   " समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे."  युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत.      याशिवाय इतकेच काय पण बादशहाच्या छावणीत घुसून तंबूचे कळस कापून आणणारे, आपल्या वेगवान आणि अनोख्या युद्धनितीने मोगलांना सळो की

अग्निपथ’ योजनेद्वारे लष्करात तरुणांना संधी मिळणार

भाजप प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन    मुंबई :- मोदी सरकारने मंजुरी दिलेल्या अग्निपथ योजनेमुळे तरुणांना लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. प्रसिद्धी पत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर, संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या २५ टक्क्यांपर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल.सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजन

शुद्ध हवेचे ध्येय गाठणे ही सामूहिक जबाबदारी : आ. प्रशांत ठाकूर

Image
  पनवेलच्या शुद्ध हवेसाठी स्थानिक नागरिक व सर्व पक्ष एकवटले ! पनवेल: शुद्ध हवेचे धेय्य गाठणे हि  स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची सामुहिक जबाबदारी आहे. वायू प्रदूषण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची आहे.  पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी सामुहिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच मांडले.  हवेची गुणवत्ता सुधारणे हि केवळ प्रशासनाची किंवा कोण्या एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून त्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. क्लीन एअर फॉर पनवेल या परिसंवादात ते बोलत होते. पनवेल परीसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार

सत्यमेव जयते चा बामणे येथे शेतकरी मेळावा

Image
कोल्हापूर:  सत्यमेव जयते फाऊंडेशन ने विठ्ठल रखुमाई मंदिर बामणे ता. भुदरगड येथे भव्य शेतकरी मेळावा सोमवार दि.16 मे 2022 रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाऊंडेशन अंतर्गत निवृत्त मेजर तुकाराम परसू खवरे यांनी पामोसा ऍग्री सायन्स कंपनी पूणे येथील डायमंड कृषी तज्ञ सोलापूरे , चंद्रकांत लष्करे व सुरेश सावंत यांना बोलावले होते. कृषी तज्ञ सोलापूरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेती कशी करावी, कोणती बी बियाणे वापरावीत, तणनाशक औषधे कोणती व कशी वापरावीत , माती परीक्षण, रासायनिक खतांचे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती दिली. बहुसंख्य लोकांनी आपल्या शंका विचारून शंका निरसन करून घेतले. या संपूर्ण शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी निवृत्त मेजर तुकाराम परसु खवरे, त्यांचा मुलगा जय खवरे, फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप मेंगाणे यांनी पार पाडली. किरण खवरे सरांनी आलेल्या तज्ञांचे आणि पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानले. कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्याला उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले व पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकरी, प्रतिष्ठित

उद्या कोल्हापूर होणार स्तब्ध !

६ मे १९२२ या दिवशी राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.आणि या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. येत्या ६ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता सारे कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध होणार आहे. ही स्तब्धता म्हणजे, राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार १०० सेकंद थांबून रस्त्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत.  या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आहे. त्याचे स्मरण केले जावे. त्यांच्या या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी हा यामागचा उद्देश आहे. १ मे पासून स्तब्धते बाबत दररोज एफएम, रेडिओ, सर्ववृत्तवाहिन्या, चॅनलवरून सतत प्रसिद्धी दिली जाणार आहे. ६ मे सकाळी १० वाजता १०० सेकंदासाठी स्तब्

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात मिळणार 15 लाखांची वर्कऑर्डर

नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन सहभागासाठी अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन                        ·          विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर   मुंबई ,   : राज्य शासनाच्या कौशल्य ,  रोजगार ,  उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी   www.msins.in/ startup-week   या संकेतस्थळाला भेट द्यावी ,  असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.             स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून    प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अ

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करा : आ. प्रशांत ठाकूर

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा -  भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी  पनवेल(प्रतिनिधी) राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट'  कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.            महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल , डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे . मात्र या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, असे  आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले आहे. केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रविवारी विरार - अर्नाळ्यात!

Image
·       ' नूतन गुळगुळे फाउंडेशन '  निर्मित दिव्यांग मुलांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी राज्यपाल अर्नाळ्यात! ·       कोविड-१९ मध्ये पालक गमावलेल्या  ‘ दिव्यांग मुल आणि त्याचे एकल पालक यांच्याकरिता वसतिगृहाची ’  निर्मिती! ·       १७ वर्षाखालील संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातल्या  ' दिव्यांग मुलांना संपूर्ण आयुष्यभर निवास - उपचाराची व्यवस्था! ·            स्वावलंबन प्रशिक्षणासाठी विशेष केंद्राचीही निर्मिती कोरोनामुळे पालक गमावलेल्या  ‘ दिव्यांग ’  बालकांकरिता विरार ,  अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात  येणार  असून  येत्या ३ एप्रिल २०२२  रोजी , सकाळी ११:२२ वाजता, श्री स्वामी कृपा ,  प्रभात कॉलनी, अर्नाळा, विरार येथे    महाराष्ट्र राज्याचे  राज्यपाल  महामहीम  भगतसिंग कोश्यारी यांच्या  शुभ  हस्ते  ‘स्वानंद सेवा सदन’  वास्तूचे  भूमिपूजन संपन्न होणार आहे . या वसतिगृहाची निर्मिती  ‘ नूतन गु ळ गु ळे  फाऊंडेशनद्वारे करण्यात  येणार  आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या  ‘ दिव्यांग कल्याण आयुक्तालया ’ ने या उ

*3 वर्षांच्या चिमुकलीसाठी माणुसकी धावली !

Image
 आजही आरोहीच्या मागे लोकांनी उभं राहण्याची गरज* रत्नागिरी तालुक्यातील कु.आरोही सचिन घुमे या 3 वर्षाच्या चिमुकलीचे नुकतेच वाडिया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. तिला डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. तातडीने ऑपरेशन होणे गरजेचे होते. खासगी रुग्णालयात सुमारे 15 लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र या मुलीसाठी विविध मान्यवर वेळीच धावून आले आणि तिचे ऑपरेशन अगदी मोफत झाले. माणुसकी या चिमुकली साठी धावून आली. त्यावेळी तिच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  साहेब यांनी  तातडीने उपचार मिळण्यासाठी मोठे सहकार्य केले. गाव विकास समितीचे सुकांत पाडाळकर यांनीही आरोही च्या कुटूंबियांना योग्य वेळी मार्गदर्शन केले. गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी मित्र व भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांना या मुलीला मदत व्हावी यासाठी शब्द टाकला होता. निलेश चव्हाण यांनी त्यांचे मित्र व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना सदर मुलीच्या उपचारासाठी वाडिया रुग्णालयात तातडीची मदत हवी असल्याचे कळवले.

स्थलांतराविरोधात गाविस'चे धरणे आंदोलन

Image
*कोकणातील तरुणांचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करावी-सुहास खंडागळे* ⭕ *गाव विकास समितीचे देवरुख येथे गावागावातील बेरोजगारी व वाढते स्थलांतर कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन.* देवरुख:-कोकणातील तरुणांमध्ये टॅलेंट आहे,मात्र कोकणात रोजगार संधी उपलब्ध नसल्याने येथील तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली सारख्या शहरात स्थलांतरित होतो.हे स्थलांतर थांबवण्यासाठी व तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र उद्योग प्राधिकरण स्थापन करावे अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे एकदिवसीय धरणे आंदोलनात मांडली. कोकणातील बेरोजगारी व गावागावातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्या संगमेश्वर विभागामार्फत देवरुख तहसील कार्यालय येथे बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलनाला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस

'सारथी'ने मागवल्यात आपल्या सूचना !

‘मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी’ समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे ‘सारथी’चे आवाहन               मुंबई ,  दि. 4 : "मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" (लक्षित गट) या समाजातील महिला ,  विद्यार्थी ,  तरुण ,  शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत ,  याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत.             छत्रपती शाहू महाराज संशोधन ,  प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ,  पुणे  या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा आराखडा ( Vision Document) -  २०३० हा सर्वसमावेशक व व्यापक होण्यासाठी ,  सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत याबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत सूचना लेखी स्वरुपात  पाठवाव्यात असे आवाहन  सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.                "मराठा ,  कुणबी ,  कुणबी-मराठा व मराठा-कुणबी" या समाजातील बहुसंख्य लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.यास्तव या घटकां