Posts

Showing posts from 2021

आधी महागाई आणि बेरोजगारी या व्हायरसचा बंदोबस्त करा :- सुहास खंडागळे

*कठोर निर्बंध लादण्या आधी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी हे दोन व्हायरस सामान्य लोकांच्या मानगुटीवर बसले आहेत याचा विचार सरकारने करावा- सुहास खंडागळे* यांना पुन्हा परदेशातून नव्या कोरोनाचे(ओमॅयक्रोन) संक्रमण वाढतंय हे माहीत होतं...मागच्या वेळी चुका केल्या त्यातून हे काहीच शिकले नाहीत.परदेश वाऱ्या करणाऱ्यांना कंट्रोल करण्या ऐवजी सामान्य माणसांवर वारंवार निर्बंध लावण्याची भूमिका सरकार घेणार असेल तर सरकारने आधी लोकांच्या रोजी रोटीची व्यवस्था करावी!कोणतेही कठोर नियम लादण्या आधी कोरोना प्रमाणेच महागाई आणि बेरोजगारी हे भयंकर व्हायरस लोकांना जेरीस आणतायत याचं भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावं...! बाकी नवीन व्हेरियन्ट बाबत नागरिक स्वतः काळजी घेत आहेत.लोक बेफिकीर आहेत असं जे बिंबवले जात आहे ते चूक आहे.दोन वर्षांच्या त्रासातून लोकं बरच काही शिकले आहेत...लोकं लोकांचं काम करत आहेत,सरकार आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का?हे त्यांनी तपासून पहावं! कोरोनाचे नवे व्हेरियन्त हे परदेशातून आला असेल तर याला देशात प्रामाणिक पणे रांगा लावून दोन दोन डोस घेणारी जनता दोषी कशी? बाहेरून येणाऱ्या लोकांचे नियोजन तुम्हाल

उत्थान योग केंद्र बदलापूरमध्ये साउंड थेरपी

Image
ही थेरपी नाही चमत्कार आहे ! हे जग स्पंदनांचेच तर आहे याची प्रचिती आज खूप प्रभावीपणे मला आज झाली.  आपल्या पाच ज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त सहावी जाणीव सुद्धा किती महत्वपूर्ण काम करते हे सुद्धा या थेरपीत समजते. निद्रानाश, अर्धशिशी किंवा पूर्णशिशी तसेच तनावमुक्तीसह एकाग्रता वाढविणे, मनाची शांतता अनुभवणे आणि ध्यानधारणासाठी तयारी करणे यासाठी मला वाटते साउंड थेरपी खूपच उपयोगी पडेल.       आचार्य विनोबा भावे म्हणत हिंदू  धर्म हा अनुभवण्याचा धर्म आहे तसे ही थेरपी अनुभवण्याचा विषय आहे. पंचधातूंचे भांडे खूपच प्रभावी व गुणकारी आहे. मी या थेरपीच्या प्रेमात पडलो असून किमान महिन्यातून एकदा हा अनुभव घेतल्यास शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील असा माझा ठाम विश्वास बनलाय !  थेरपी दरम्यान मी शून्यात गेलो होतो व थेरपीच्या शेवटच्या टप्यात मला पुन्हा थेरपीच्या आवाजामुळेच जाग आली व शेवटी पंचधातुच्या भांड्याची  अफलातून कंपने अनुभवताना मी थक्कच झालो..  खरच हा गहन विषय आहे ! कोल्हापूरच्या भाषेत हार्ड विषय आहे ! नाद खुळा थेरपी ! पुन्हा पुन्हा यायलाच लागतंय.... ! शेवटी येथील योग

उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी पावले उचला- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Image
·        नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना    मुंबई, दि. 21 : उल्हास नदीच्या काठावरील मोहने आणि म्हारळ येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीत प्रदूषणमुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.             उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.             जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण निश्चित करावी. अशा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी. ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने कार्यवाही करण्यात यावी. उल्हास नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा 25 डिसेंबरपर्यंत

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा 25 डिसेंबरपर्यंत           मुंबई ,  दि. 21 : कौशल्य विकास ,  रोजगार व  उद्योजकता आयुक्तालय यांचे मार्फत बेरोजगार उमेदवारांकरीता 12 ते 17 डिसेंबर ,  2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची मुदत आता 20 ते 25 डिसेंबर ,  2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे ,  अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.             मुंबई शहर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.             लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय/उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्बळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील नामांकित उद्योजक/आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारपणे 10 वी ,  12 वी ,  आयटीआय ,  डिप्लोमा ,  पदवीधर तसेच बीई व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेद

मराठेशाहीतील चिमाजी आप्पा यांची समुद्रदुर्गांवरील मोहीम

  🚩 चिमाजीआप्पा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र                             अभिवादन 🚩               चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र.चिमाजीआप्पांचे मुळ नाव अंताजी पण पुढे ते चिमाजीआप्पा या नावाने प्रसिद्ध झाले. चिमाजी अप्पा लहानपणापासूनच आपले भाऊ बाजीराव यांच्या बरोबर राहून राजकारणाचे ,युद्धकौशल्याचे धडे गिरवीत होते. वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी शाहू महाराजांनी बाजीराव यांच्यावर सोपवली होती. बाजीराव हे तापट, बेधडक स्वभावाचे होते, तर चिमाजी आप्पा शांत, धोरणी व दरबारी कामात कुशल होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.                     थोरले बंधु बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठी राहिले. या जोडीला ‘राम-लक्ष्मण, सुद्धा म्हणले जाते, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते हेच खरे आणि तसेच च

कल्याणचा राज काळे एनडीएची परीक्षा पास

Image
भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, ता- कल्याणच्या कु राज प्रशांत काळे याचे एन . डी . ए . परिक्षेत मिळवले घवघवीत यश !  कल्याण - (बाबुराव खेडेकर) युपीएससी  द्वारे घेण्यात येणाऱ्या  एन . डी .ए . 'परिक्षा - २०२१ ' या   देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येणाऱ्या  अत्यंत कठीण अशा लेखी-परीक्षेत कु. राज माधुरी- प्रशांत काळे याने  घवघवीत यश संपादन केले आहे. युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन डी ए ची परिक्षा - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला, पुणे मार्फत देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येतात .अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या लेखी-परीक्षेत कु. राज प्रशांत काळे याने हे यश संपादन केले आहे . स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे संस्थांपित आणि शिवनिकेतन ट्रस्ट संचालित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय , कल्याण तालुक्यातील खडवली, जि. ठाणे  येथे शैक्षणीक वर्ष २०२१ - २२ मध्ये इयत्ता १२ वी. सायंन्स मध्ये शिक्षण घेत असलेला कु. राज काळे याच्या या घवघवीत यशासाठी पुणे येथील अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी चे संचालक तथा गण

सामाजिक न्याय विभागाची आघाडी

अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक न्यायाची आघाडी   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच या शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. या दोन वर्षाच्या काळात अनेक क्षेत्रात दमदार कामगिरी करून केवळ जनसेवा म्हणूनच या राज्याला अग्रेसर करण्याचे अनेक निर्णय घेतले आहेत. कोकण विभागात सामाजिक न्याय विभागातही खूप मोठे कार्य उभे राहीले आहे. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामाचे संनियंत्रण सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले. या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक १४ एप्रिल २०२४ पूर्वी पूर्ण उभारण्यात येणार आहे.या स्मारकाचे काम प्रगतीत आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या शहरापासून महाविद्यालयाचे अंतर ५ कि.मी.वरून वाढवून १० कि.मी. पर्यंत करण्याचा निर्णय, त्याचबरोबर आता तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार आहे. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात बदल करून आता वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचादेखील विचार केला जात आहे. प्रथमच योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण. फा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख हरवले : छत्रपती संभाजीराजे

Image
छत्रपती संभाजीराजे यांनी वाहिली जनरल रावत यांना श्रद्धांजली : फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना दिला उजाळा... चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत ,  श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले ,  हे मनाला अजूनही पटत नाही. २०१७ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते ,  तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा ,  यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची

रायगड भेट माझ्यासाठी तीर्थयात्राच:- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Image
अलिबाग :-  रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.       यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे,  खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती महोदयांची कन्या स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.        राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद आपल्या भाषणात पुढे म्हण

ओबीसी आरक्षणसाठी पहिली ठिणगी

Image
ठाणे :  कल्याण पश्चिम येथील, दामोदर हॉल मध्ये , मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी चिंतन शिबिराचे  रविवार दिनांक  5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता  आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल झाल्यानंतर सदर चिंतन शिबीर ही पहिली ठिणगी ऐतिहासिक कल्याणमध्ये पडणार आहे.       मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे! यासाठी सर्व संघटना मध्ये व्यापक सहमती, आणि एकवाक्यता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कल्याणमधील मराठा समाज एकवटला आहे.  मराठ्यांना आरक्षण हे संविधानाने नाकारले नाही तर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने नाकारले आहे अशी भावना समाजात तयार झाली आहे. त्यामुळे यापुढे संविधान संमत ओबीसी आरक्षण मराठ्यांना मिळवून घेण्यासाठी कल्याण येथे मराठा समाज धडकणार आहे.          या शिबीरास राज्यातल्या सर्व मराठा संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी, तसेच मराठा समन्वयकांनी उपस्थित रहावे . यासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचं आहे . संघटनांच्या संपर्कात असणार्या मराठा बांधवांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि उपस्थिती साठी आणि कायमस्वरूपी 5

निवडणुका लढविणाऱ्यांसाठीजात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

            महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल.             ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.             महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10 च्या पोट कलम (1क) आणि 30-1क आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 (क) ,  42 (6-क) ,  67 (7-क) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल.  मात्र ,  नामनिर्देशन भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु

राष्ट्रपती ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगड ला देणार भेट

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे निमंत्रण...   कोल्हापूर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट देण्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निश्चित केले आहे. मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण स्वीकारून राष्ट्रपती कोविंद यांनी रायगड भेटीसाठीची ७ डिसेंबर तारीख निश्चित केली आहे. दरम्यान , राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सहकार्य लाभत आहे. यापूर्वी शिवछत्रपतींच्या जन्म शताब्दी सोहळ्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सन १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी

माऊली गडावर अवघ्या चार वर्षीय मुलीची यशस्वी चढाई

Image
ठाणे : पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडून पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीय व मुलांसाठी  शहापूर तालुक्यातील माहुलीगडावर चढाई आयोजित केली होती ही चढाई सकाळी 7.00वा वाजता सुरुवात झाली सदर चढाई मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अमोलकुमार होळकर त्यांच्या पत्नी सुनीता होळकर यांची छोटा मुलगी कुमारी राजेश्वरी अमोलकुमार होळकर वय चार वर्षे यांनी अगदी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या कन्येने एवढ्या लहान वयामध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या मुघलांना घाम फोडणार्‍या इंग्रजांना कापायला लागणाऱ्या अशा या अवघड अशा माऊली गडाची यशस्वीपणे चढाई करून तितक्याच उत्साहाने ती उतरण केली. त्याबद्दल अशा या छोट्या राजेश्वरीचे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व इतर ट्रॅक्टर्स पोलीस बांधवांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या तिच्या कामगिरीबद्दल तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे आहे. इतिहासामध्ये  शूर लोकांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे त्या शूर वीरांचे स्मरण म्हणून आपल्या कन्येने एवढी मोठी कामगिरी केल्याने तिचा सार्थ अभिम

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या फसवणुकीचा विषय मंत्रिमंडळात गाजला !

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी - राज्यमंत्री शंभुराज देसाई               मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.             राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले ,  सिंधुदुर्ग ,  अमरावती ,  सातारा ,  नाशिक ,  नवी मुंबई ,  नागपुर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून ,  ५१  लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

               मुंबई : क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,  महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन  2019-20  आणि सन  2020-21  या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरीता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  2019-20  व सन  2020-21  या दोन वर्षाकरीता  2  युवक , 2  युवती आणि  2  संस्था असे एकुण  6  पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत ( अ) युवक व युवती पुरस्कार -  (1)  पुरस्कार वर्षाच्या  1  एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय  13  वर्ष पूर्ण असावे तसेच  31  मार्च रोजी वय  35  वर्षाच्या आत असले पाहिजे.  (2)  अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग  5  वर्षे वास्तव्यात असला पाहिजे. (3)  अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतप

अनुसूचित जातीतील तरुणांनी केंद्र शासनाच्यास्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  ठाणे  : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील नवउद्योजक तरुणांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत कर्ज मिळणार आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीतिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. या योजनेमधून    महाराष्ट्र शासनाने   सामाजिक   न्याय   व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील तरुण नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येणार आहे. पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहायक आयुक्त ,   समाज कल्याण ,   ५ वा मजला ,   जिल्हाधिकारी कार्यालय ,   कार्ट नाका ,   ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा ,  असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.  

मुंबई पोलीस राजू घुगरे यांच्या कामगीरीचे कौतूक !

Image
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील  महागाव गावचे सुपुत्र मुंबई पोलीस श्री.राजु नाना घुगरे यांनी आरोपी बाबत कोणताही ठावठिकाणा नसताना केवळ फिर्यादी वरून आरोपीला शोधून काढले याप्रशंसनीय कामगिरीबद्दल नुकताच  पोलीस सहआयुक्त  विश्वास नांगरे पाटील यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्धल त्यांना  शिवसह्याद्री प्रतिष्ठान या बिगर राजकीय सामाजिक  संघटनेने सुद्धा गौरव व्यक्त केला आहे. 

मुंबईसह पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

             मुंबई, : आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई ,  ठाणे ,  पुणे ,  नाशिक ,  रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या जिल्हा उपनियंत्रक ,  नागरी संरक्षण दल यांच्या कार्यालयाशी  संपर्क साधावा , असे आवाहन नागरी संरक्षण  संचालनालयाचे संचालक डॉ के व्यंकटेशन यांनी केले आहे.              नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई ,  ठाणे ,  पुणे ,  नाशिक ,  रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.              नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी ,  असेही आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.के व्यंक

खिडकाळी शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधी मंजूर...

Image
ठाणेः  कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ४३ कोटींचा भरघोस निधी प्राप्त करून घेतल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या प्रयत्नाने आता शिळफाट्यालगत देसाई गाव येथील खिडकाळी शिव मंदिर आणि परिसराचे सुशोभिकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. खिडकाळी येथील शिवमंदिराचा तीर्थ क्षेत्राच्या धर्तीवर विकास करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने खिडकाळीच्या शिवमंदिर  परिसराचे रूपडे पालटणार आहे.   ठाणे जिल्ह्यात स्वयंभू शिवलिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये अंबरनाथचे शिवमंदिर आणि देसाई गावाजवळील खिडकाळी शिवमंदिराचा उल्लेख सापडतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे मंदिरांच्या रूपाने मतदारसंघात असलेल्या  प्राचीन वारशाला टिकवून ठेवण्यासाठी कायम आग्रही असतात. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ येथील  प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४३ कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले. त्यामुळे लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर

दिवावासीयांना लवकरच पाणी दिलासा !

Image
·        पलावा (लोढा) येथे १००० मिलीमीटर पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे (प्रतिनिधी) १३ नोव्हे.: दिवा शहरात पिण्याच्या पण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे हि समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे मनपा आयुक्त आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून एकूण २२१ कोटीचा दिवा - मुंब्रा रिमॉडलिंग हा प्रकल्प सुरू आहे. त्यामधील दिवा शहरासाठी ५ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील अवघे १००० मीटर काम शिल्लक होते. यात पलावा (लोढा) मधील ७५० मीटर जलवाहिनीचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले होते. या जलवाहिनीचे काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता. त्यामुळे सदर ठिकाणी पाइपलाईन टाकण्याचे काम रखडले होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा दाखला नुकताच मिळाला.  त्यामुळे शनिवारी दिवा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पाप