Posts

Showing posts from June, 2023

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

Image
लाखो वारकऱ्यांना मिळणार लाभ             मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.              यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.             वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उ

तलाठी पदभरतीसाठी मदत कक्ष

ठाणे ,  :   ठाणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या   अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन कर ण्यासाठी   मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात   आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविली   आहे.              महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती च्या   अनुषंगाने तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासन स्तरावर जा हि रात प्रसि द्धीस   देण्यात येणार आहे. तसेच तलाठी पदभरती अर्ज करणा ऱ्या   उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन कर ण्यासाठी   विभाग व जिल्हास्तरावर मदत कक्ष ( हेल्प   डेस्क) स्थापन करण्या च्या सूचना देण्यात आल्या आहेत.    त्या अनुषंगाने   ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे   तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा ऱ्या   उमेदवा रांच्या मदतीसाठी   मदतकक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.   या मदतकक्षात तहसीलदार   रेवण लेंभे   ( भ्रमणध्वनी क्रमांक 9766599651 )   व अव्वल कारकून महेंद्र खोडके   ( भ्रमणध्वनी क्रम

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा               मुंबई ,  दि. 2 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे,  अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.             छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.             उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ,  पालकमंत्री उदय सामंत ,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पा