Posts

Showing posts from August, 2021

भारतात पैसा गुंतवला ही चूक ? :- केतन कक्कड

अनिवासी भारतीय केतन कक्कड यांनी  अमेरिकन  न्यूज पोर्टलला    दिलेल्या मुलाखतीचा गोषवारा  मुंबई : (बाबुराव खेडेकर) अमेरिकेत 28 वर्षे व्यवसाय करून बेस्ट इंडियन ज्वेलर्सचा सन्मान मिळविलेले केतन कक्कड सध्या गेली 7 वर्षांपासून मायदेशी परतले आहेत. मात्र त्यांच्या उतारवयात हॅपी इंडिंग न होता  पनवेल मधील वृंदावन फार्म या हॉर्टिकल्चर सोसायटीमध्ये जमीन खरेदीसाठी गुंतवलेली आयुष्यभराची जमापुंजी सलमान खानच्या भाईगिरीमुळे अडचणीत आली आहे; त्यामुळे प्रशासन, न्यायालय आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे ते दाद मागता आहेत मात्र देशातील बाबूशाही आणि भ्रष्टाचार याला कंटाळून त्यांनी उद्विग्न होत भारतात पैसा गुंतवला ही चूक झाली का ? असा प्रश्न अमेरिकन न्यूज पोर्टल वरून कपूर शोमध्ये उपस्थित केला आहे. सदर पोर्टलवर लाखो अनिवासी भारतीय असून हजारो एनआरआयची     प्रत्यक्ष शोमध्ये उपस्थिती होती. सध्या सोशल मीडियावर हा शो व्हायरल होत आहे. सदर मुलाखतीत कक्कड यांनी अनिवासी भारतीयांना एकत्र येन्याचे आवाहन केले आहे. जवळपास 2 करोड अनिवासी भारतीयांचे प्रतिनीधीत्व सत्तेत नसल्याने त्यांना कोणी वाली नाही , केवळ त्यांची गुंतवणूक सरकारल

गणपती बाप्पांची पनवेल वाजापूरच्या डोंगरावर प्रतिष्ठापना व्हावी :- साध्वी सरस्वतीजी

 गणपती बाप्पांची पनवेल वाजापूरच्या डोंगरावर प्रतिष्ठापना व्हावी :- साध्वी सरस्वतीजी  मुंबई: (बाबुराव खेडेकर)  इतिहासात पहिल्यांदाच हिंदू शेरणी साध्वी सरस्वतीजी यांनी पनवेल मधील एका खाजगी जागेच्या अनुषंघाने सुरू असलेल्या वादात उडी घेत जाहीर आवाहन केले आहे.  साध्वी सारस्वतीजी मुंबईच्या प्रवासावर आहेत. त्यांच्या 51000 श्री यंत्र अनुष्ठान संकल्पाला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी नुकत्याच शुभेच्छा दिल्या. मुंबईत त्यांनी अनिवासी भारतीय केतन कक्कड यांची भेट घेतली. कक्कड हे गेली अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान च्या अर्पिता फार्महाऊसच्या वरील बाजूस असलेल्या त्यांच्या अडीज एकर जागेबाबत लढा देत आहेत. हा लढा न्यायालयीन आहेच शिवाय येथे सलमान खान द्वारा अनधिकृत गेट बनवून त्यांच्या जागेवर जाण्याचा रस्ता अडवण्यात आला आहे तसेच प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून सदर जागेवर वीज पुरवठा देण्यासाठी मज्जाव कऱण्यात येत आहे .  सदर जागेवर गणपती बाप्पांचे म्युझिअम बांधणार असल्याचा संकल्प कक्कड यांनी सोडल्यामुळे साध्वी सरस्वतीजी यांनी सलमान खान यांना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदि आणि भारत वासीयांना आवाहन करत गणेशोत

खासदार छत्रपती संभाजी राजे यांची घटनादुरुस्ती बाबत सूचना

काल राज्यसभेत १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक चर्चेसाठी आले असताना या विधेयकावर बोलण्याची संधी मागितली होती. मात्र , मला या विधेयकावर बोलण्याची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्व खासदारांनी या विधेयकावरील माझे मत ऐकण्याची इच्छा असल्याचे एकमुखाने व्यक्त केले व यासाठी आवाज उठवला. त्यानुसार या विधेयकावर राज्यसभेत पुढीलप्रमाणे मत मांडले... " मी सरकारचे मनापासून आभार मानतो , की त्यांनी १०२ व्या घटना दुरुस्तीत योग्य सुधारणा करून राज्यांना अधिकार बहाल करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. प्रथमतः मला अभिमानाने सांगायचे आहे , की माझे पणजोबा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापूर राज्यात १९०२ साली बहुजनांना आरक्षण दिले. त्यात एससी , एसटी , ओबीसी आणि मराठ्यांनादेखील आरक्षण देऊन सर्वांना एका छताखाली आणले होते. नंतर हेच धोरण भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केले. मी ह्या समाजाचा एक घटक म्हणून , राज्याला पुन्हा अधिकार बहाल करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. स्वागत करीत असताना मी नमुद करू इच्छितो कि केवळ राज्याला अधिकार दिल्याने समाजाला आरक्षण मिळाले , असे होत नाही. मला चिंत

सलमान खानची पनवेलमध्ये लँड माफियागिरी

   *अनेक एकर जमीन बळकावली* *अनिवासी भारतीय नागरिकाची होतेय अडवणूक* पनवेल: (बाबुराव खेडेकर)   बॉलिवूडचे भाई सलमान खान यांनी शासकीय; प्रशासकीय यंत्रणेवर दबावतंत्र वापरून  पनवेल येथील त्याचा बहुचर्चित अर्पिता फार्महाउस इको-सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत बांधला आहे; याशिवाय याच बांधकाम प्रतिबंधित जागेवर अनधिकृतपणे नऊ नवीन कथित बांधकामे झाली आहेत. या कथित भूखंड घोटाळ्यात अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी असल्याची पक्की माहिती आमच्या हाती लागली आहे. त्यातील महत्वाचे धक्कादायक खुलासे आम्ही करत राहणार आहोत.   अभिनेता सलमान खान ज्याने वन अधिकार्‍यांच्या संगनमताने पनवेलमधील अनेक एकर जमीन बळकावली आहे त्याने येथील  त्याच्या फार्महाऊसच्या वरील भागातील गणेश मंदिराच्या रस्त्यावर गेट उभारून सदर प्लॉट मालकाचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग अडवला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,   सलमान खानच्या "अर्पिता फार्म" वरील डोंगरावर 2.1/2 एकर जमिनीचे मालक केतन कक्कड आहेत.  सलमान एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना कक्कडच्या छोट्या घरात तसेच गणेश मंदिराला वीजपुरवठा करण्यापासून रोखत असल्याचा आरोप कक्कड करतात. कारण शासकीय निय