Posts

Showing posts from October, 2017

Non-Toxic Farming : Swami Ramdev | Kaneri Math, Kolhapur, Maharashtra | ...

Image

दिवाळीत किल्ला का बनवतात ? । Did You Know

Image
आवडीचे रूपांतर छंदात करा !

पुन्हा पत्रकारितेकडे .....

          मार्केटिंगच्या अनुभवामुळे इतर बरेच मार्ग माझ्यासाठी बंद झाले होते. मला आता शेवटचा एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे मराठी वृत्तपत्र. फार्मा कंपनीच्या पगाराच्या तुलनेत अर्ध्या पगारावर मी श्री. सतिश धारप यांच्या विश्‍वरूप या रायगडच्या जिल्हा वृत्तपत्रात पत्रकार म्हणुन दाखल झालो. सुनिल कर्णिक मॅडम यांचे लेख आणि सुनिल खवरे यांच्या कविता आता विश्‍वरूपमधुन प्रसिद्ध होवु लागल्या होत्या. सहा महिने  विश्‍वरूपमध्ये रूळल्यानंतर माझ्यातील पत्रकार नव्याने जागा झाला. ब-याच वेळाने लेखाणी पुन्हा हातात आली तसा शब्दांशी खेळ पुन्हा सुरू झाला. किती दिवस चालायचे, कसे चालायचे आनि कुठे पोहचायचे याचा थांगपत्ता पत्रकाराच्या आयुष्यात नसतो. तरीही तटस्थपने आणि त्रयस्थपनाने चांगल्या वाईटाचे गुनावगुन सांगणे. नविन कांहीतरी सुचवणे हे आलेच! प्रजासत्ताक मासिकाच्या आठवणीत रमताना माझ्या आयुष्यातील एका दिवास्वप्नासारखे भराभर दिवस डोळयासमोरून जातात आणि श्‍वासातील सुस्कारातुन प्रचंड कष्टाचे त्रासदायक दु:ख हवेत विरूण जाते. हा सगळा आयुष्याचा एकाकि संघर्ष पुस्तक रूपाने मांडावा हे ही स्वप्न मी पाहु लागलो. स्वप्न स्व

विज्ञानात संधी

Image
जीवनात कांही गोष्टी हया नियोजितच असतात. १२ वी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन    मी चुक केली असे वाटत होते. मात्र नेमक्या  या हालाखिच्यावेळी नोकरीची संधी आली ती वैद्यकिय कंपनीत मार्केटिंगसाठी. मोदी मुंडी फार्मा ही तशी नामांकित कंपनी! या कंपनीत एम. आर. म्हणुन माझा क्लासमेट सचिन पाटिल काम करत होता. त्याच्या रेफरन्सवर मी मुंबईतील तीन मुलाखतीच्या पाय-या पास केल्या. प्रश्‍न नवा निर्माण झाला तो ट्रेनिंगसाठी दिल्लीला जाण्याचा. मराठी माणसांना दिल्लीचे बरेच आकर्षण पण् माझ्या खिशात पैसे नसल्याने ताबडतोब कसे जायचे हा प्रश्‍न पडला. रनजित, अवि, खवरे यांनी वर्गणी काढुन मला पाठविले.            देशातल्या विविध ठिकानाहुन प्रशिक्षणासाठी आलेल्यांची सोय कंपनीने नेहरू प्लेस येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये केली होती. कडक शिस्तीत प्रशिक्षण होत होते. मेडिकलचे ज्ञान व मार्केटिंग कौशल्याचे बाळकडु पाजले जात होते. बिगबॉसच्या आखाडयासारखे अर्धे उमेदवार प्रशिक्षणातूनच  बाहेर काढले होते. मुंबईतुन गेलेल्या १६ जनांपैकी केवळ ५ जनांना संधी मिळाली त्यात माझा नंबर होता. कारण मला हि संधी सोडायचिच नव्हती. एका महिण

सृजनोत्सव !

प्रजासत्ताक मासिकाला आज एक वर्षे पुर्ण झाले. वास्तविक प्रजासत्ताक तिमिरातुनी तेजाकडे असे म्हणायला हवे कारण मासिकाच्या हेतुमागे दाखवायचे वेगळे दात कधीच नव्हते. कदाचित म्हणुनच प्रजासत्ताकच्या वाचकांनी वास्तवात राहुनच वाचण करावे अशी अपेक्षा सफल ठरली.....सुरूवातीच्या काळात १५-२० लोकांसोबत गगणाला गवसणी घालण्याच्या आणि संपुर्ण परिवर्तणाच्या विचाराने (सर्वच क्षेत्रात उ दा. नाटक, राजकारण, समाजकारण) दखलपात्र अशी सुरूवात झाली. अर्थातच त्यात नियोजनाचा अभाव असल्याने वेळेचा आणि पैशाचा अपव्यय झाला. प्रजासत्ताकच्या ठिणगीत सत्याची, आत्मसन्मानाची,सृजनाची, उद्रेकाची आग होती - आहे आणि राहणारच कारण प्रेरणास्थानी असणारी प्रमाण आणि लवचिक अशी राज्यघटना हाच एक महायज्ञ आहे.              जाणुन बुझुन आपल्या विचारांवर, आचरणावर जी जळमटे आहेत आणि कोणितरी हेतुपुर्वक कांही गोष्टी घडवुन आणत आहेत त्यांचे बुरखे टराटरा फाडुन लक्तरे करावित या भावणेने तर कधी कधी आक्रमक पवित्राही घेतला. ज्यांनी आपला पैसा प्रजासत्ताकसाठी लावला ते सर्व आजमितिला आमच्या सोबतच आहेत पण हळुहळु कांही  लोक जे फक्त ग्लँमरसाठी पत्रकारिता

सृजनांची चळवळ...

       अहिंसा, सत्य, अस्तेय अशी मुल्ये आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी पुस्तकी तत्वे यांचा प्रत्यक्ष समाजजीवणाशी सबंध विसंगत वाटु लागतो तेंव्हा परिस्थितीच्या अंधारातुन सर्वशक्तीनीशी प्रकाशाकडे जाण्याचा प्रवाह तयार करावा लागतो. हाच मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्रजासत्ताक गणराज्य हि अशीच सर्वसमावेशक आदर्श संकल्पना आहे.  शिवाय ती लवचिकही आहे. हा यज्ञ असाच अखंडपणे सतर्क राहुन तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पत्रकारिता हे निमित्त मात्र माध्यम असले तरी यासाठी प्रभावीपणे वापरत आहोत. आज पत्रकारिता आणि संघटणा हि सत्तास्थाने बनली आहेत मात्र आम्ही शाळेची पायरी चढताना राजकारण करणार नाही! आजी माजी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपिठ मिळावे या उद्देशाने  साने गुरूजींच्या विचार विश्‍वात पुन्हा शाळेकडे परत येण्याचा आमचा माणस आहे कारण परिवर्तणाचा मार्ग शाळेतुनच जातो!        दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवुन कांही गुणी विद्यार्थी कमावण्याचा आमचा मानस आहे             उगाच पाय न ओढता प्रोत्साहण देणारे आमच्या गावचे लोक असल्याने कुणाचाही विरोध न होता प्रोत्साहनासाठी संघटणेच्या फलकांच्या अ

प्रजासत्ताक ची सुरूवात

Image
                स्पर्धा परिक्षेचा स्ट्रगलर कँन्डीडेट असल्यामुळे प्रशासनाविषयी प्रचंड आत्मियता, आकर्षण आणि प्रशासनातिल दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध चिड असणारा मी पत्रकारीता हे समाजप्रबोधनाचे प्रभावि माध्यम माझ्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी वापरत होतो. प्रदिप शिंदे हा ही माझ्यासारखाच १२ वी विज्ञानशाखा मग बिए मराठी नंतर एम ए असा प्रवास करत स्पर्धा परिक्षांमध्ये सरकारी नोकरीसाठी गटांगळया खात होता. आम्ही दोघांनिही इंडियानेट कंपनीमध्ये   मार्केट सर्वेचे काम  करत होतो. मुंबईतल्या बहुतेक  गल्या मी  पायी पिंजुन काढल्या होत्या.             नवशक्तीसाठी दादरसारखा आशिया खंडातील सर्वात मोठा वृत्तपत्र डेपो सांभाळताना पत्रकारिता व्यवसायात उडि टाकण्याचा विचार माझ्या मनात आला.नवशक्ती दैनिकात काम करताना ७००० पगार मिळायचा त्यातील दरमहिना ३००० वाचायचे.निकम सरांचे शिक्षणासाठी घेतलेले ७००० परत केल्यानंतर कांही महिण्यांनी पोळ वकिलांचेही पैसे देण्यासाठी गेले असता त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. 'मी पैसे परत देण्यासाठी मदत केली नव्हती मात्र तुला दयायचेच असतील तर ते निकम सरांच्या ट्रस्ट ला दे

पत्रकारितेची खडतर सुरूवात !

 पत्रकारीतेच्या वर्गातील धडे गिरवताना मला हायकोर्टातील क्लार्कच्या नोकरीत आपले भविष्य नसल्याचा पक्का निर्धार झाला होता. माझा जिवलग मित्र रनजित हातकर योगायोगाने काम शोधत होता. त्याला पोळ लिगल ज्युरीस मध्ये चिकटवुन मी तेथुन काढता पाय घेतला. आतापर्यंतच्या प्रत्येक जुण्या कामाच्या ठिकाणी आपली निशाणी मी सोडलेलीच होती तशी इथेही ठेवली. आज रनजित वकिल आहे. मला पहिला धक्का बसला जेव्हा मी तुटपुंज्या माणधनावर मुंबई मेट्रो या पोळ साहेबांच्या अशिलांच्या हिंदी साप्ताहिकात पत्रकारीतेची सुरूवात केली तेव्हा. साप्ताहिक महिणाभरात एकदाही निघाले नाही.  पण् तेथील ऑफिस सहाय्यक  असणा-या विवाहित मुस्लीम मुलीला माझा स्वभाव फार आवडला. एकदा तर तिने लाइट बंद करून किस ची ऑफर दिली पण् मी मनातुन इच्छा असतानाही घाबरून गेलो होतो. कारण आमच्या मंडळाच्या(बैठकीच्या) खोलीत लफडयाची नुसती बातमी पोहचली तरी बोजा बिस्तारा बाहेर पडेल म्हणुन! शिवाय निति, संस्कृतीच्या असंख्य बधनांनी मला चारी बाजुंनी बेडया घातल्याने त्या ऑफरला मी प्रतिसाद दिला नाही.  दुस-या महिण्यांत कंपनीने न निघणा-या साप्ताहिकलातोटयात जावु न देता आम्हा दो

शेवटी काम भेटले !

          माझ्या अवती भोवती काय आहे किंवा काय चाललय हे न बघता माझ्या मनात काय सुरू आहे हे शोधा! असे मी म्हणायचो ते एवढयाच साठी कि माझ्या प्रत्येक नव्या उपक्रमाला, कल्पनेला, प्रयत्नांना माझ्या अवती भोवतीचे लोग टाईमपास म्हणुन बघत. मदत करण्यापेक्षा किंवा उभारी देण्यापेक्षा पाय कसा खेचता येईल आणि माझे खच्चीकरण कसे होईल अश्याकडे या मंडळींचा ओढा असायचा. अर्थात याला काही अपवाद होतेच! माझ्यापेक्षा जास्त शिकलेली, पैसा असणारी, ओळख असणारी मंडळी असतील ही पण् मी माझ्यात कमीपणा न मानता मोठ मोठी स्वप्ने बघत असु. सकाळी ५:३० ला उठुन मी पेपर टाकायला जायचो. प्रभाकर सलामवाडे उर्फ (भाऊ) हयांच्याकडे मी पेपर लाईन टाकायला कामाला होतो. हे हिडदुगी या गडिंग्लज तालुक्यातील गावचे. लोअरपरेल रेल्वे वर्कशॉपची  पेपरलाईन मी टाकायचो. त्यांच्या घरचा पत्ता मी विविध ठिकाणी   पत्रव्यवहारासाठी बरीच वर्षे दिला होता. त्यांचा भाऊ सुधाकर हा माझा चांगला मित्र आहे. १२ वी विज्ञानशाखेत नापस झाल्यामुळे त्याचे पुढील शिक्षण बंद झाले. तो ही वृत्तपत्रविक्रेत्याचे काम जोमाणे करत होता. विभागात रूबाबात फिरायची सवय मला इथ

नावात काय आहे ?

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु धर्मातील जातीभेदापासुन कायमची मुक्ती मिळविण्यासाठी धमांतराचा मार्ग अवलंबिला. हे धर्मांतर त्यांच्या संपुर्ण समाजाचे झाले नाही.  शिवाय वेगवेगळया कारणांवरून धर्मांतरे झाल्यावर हिंदु धर्मांत शिल्लक राहणार तरी कोण! असो, आरक्षणाचा मेवा खात आपली आर्थिक परिस्थीती सुधरली तरी सामाजिक दर्जा/मान सन्मान आजही म्हणावा तितका मिळत नसल्याने माझ्या अनेक मित्रांनी  नाव  बदलण्याचा (गॅजेट) संविधानिक मार्ग अवलंबिलाय. त्यांना नावे हवी आहेत पण आडनावे नकोत कारण काळाबरोबर नावे बदलतात आडनावे तशीच राहतात. आडनावांतल्या बदलाचे उदाहरण पहा, माझे पुर्वज आमच्या आजरा तालुक्याजवळील खेड गावाचे पाटील त्यांनी ते गाव सोडुन झुलपेवाडीत आल्यानंतर झाले खेडेकर. तेही विदाऊट गॅझेट! आडनावाच्या आदानाची ही प्रक्रिया संख्याबळ किंवा अनुकरणातुन होत असुन काहीना तर चकक अमराठी नावे, आडनावे हवीत.        मला माझ्या नावाबाबत घडलेले ठळक प्रसंग आठवतात. बाबुराव खेडेकर हे माझे अस्सल मराठी, ग्रामीण, कोल्हापुरी नाव पण ज्या ज्या मुंबईतल्या कॉलेजच्या मित्रांना माझे नाव समजत तेव्हा ९५ टक्के मित्र ना

ramprahar news @ 10/10/2017

Image

उपवास

          माळकरी म्हटल्यावर एकादशीचा उपवास धरणे आलेच.इथे  मला हे कबुल करावे लागेल कि हे उपवासाचे व्रत अखंडपणे न चालता खंडित स्वरूपात मी चालवतोय. कामाच्या व्यापात हे उपवास कधी येवुन जातात कळत नाही तर कधी सवयीप्रमाणे काहितरी उपवासाला न चालणारी वस्तु खावुन पश्‍च्यातापात उपवास मध्येच सुटतो. आहारात बदल किंवा भक्तीभावाने देवाजवळ असणे वगैरे ठिक आहे पण् हे उपवास माझ्यासाठी अग्नी दिव्यच आहे! मुंबईत खानावळिला या उपवासादिवशी डब्बा नको सांगणे म्हणजे उपाशी राहणे होते.  कारण खिशात पैसेच नसायचे ना! अन्नाविना उपाशी राहणारे किती पुण्यवान? हा स्वामिंचा खोचक प्रश्‍न मला यावेळी उपवासाविषयी आठवायचा.  तशाही  ब-याच रात्री मी उपाशी झोपलोय. पुढे जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा याच एकादशीला मी 'एकादशी आणि दुप्पट खाशी! 'असे वर्तण केल्याचेही आठवते.         उपपवासाच्या दिवशी ब-याच विचारांचे काहोर माझ्या मनात माजलेले असते. भुतकाळातील सनावारांना माझ्या घराशी कांही संबध नसायचा हे आवर्जुन आठवायचे. दिवाळीच्या पणत्या दुस-याच्या दारातुन उचलुन मी माझ्या दारात आणुन ठेवायचो. कित्येक दसरे गोड शि-यावर आई भागवाय

श्रमसंस्कार

       माझी दिवसातुन दोन ठिकाणी शाळा भरायची एक शेतात आणि दुसरी गावच्या शाळेत. कितीही थंडी असली तरी सकाळी ६ वाजता मला व विक्रमला उठुण शेण्या बनविण्यासाठी डोकिवर बुट्टी घेऊन शेण पकडायला जावे लागे. विक्रमदाचा माझ्यासाठी विक्रम झाला होता कारण नववीपर्यंत परिक्षेत मीच त्याला माझी त्तरपत्रिका दाखवुन खेचत आणला होता. ५ वी पासुन माझ्याच वर्गात तो होता. खेळात तालुकास्तरारावर विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेला तो अभ्यासात मार खायचा.दोघांनाही पसंत नसलेले हे काम आईच्या धाकाखातर आणि पर्याय नसल्याने करावे लागे. एकाने बुट्टी डोक्यावर घेतली तर दुस-याने शेताच्या  वाटेवरील म्हैस आणि बैलाचे शेण उचलुन बुट्टीत टाकायचे असा नित्यनियम! याच वाटेवर पुर्वी लोक शौचालयास बसत आता गाव हागंदरीमुक्त आहे. पुर्वी अगदी पहाटे जनावारांना चरायला व पाण्याला सोडत आज ती वेळही बदललीय. शेण गोळा करण्यालाही त्यावेळी आम्हाला स्पर्धक होते. आमच्या परडयात गोळा केलेल्या शेणाचे शेणी लावण्याचे काम आई आठवडयाच्या शेवटी करत असे त्यावेळी पाणि आणायचे व कोंडा मिसळायचे कामही माझ्याकडेच होते.              शेणाची खेप आली कि (हे