Posts

Showing posts from September, 2017

दैनिक रामप्रहर,पुढारीने घेतली दखल !

Image

आणि मी माळकरी झालो!

         नको त्या आठवणी असे मनाला कितीतरी म्हटले तरी कुणीतरी न चुकता तुम्ही माळ कधी घातली ? असे विचारतेच. मग आठवणी उगळवण्याशिवाय मला पर्याय नसतो म्हणुन लेखनी धरली आहे. आमच्या गावच्या साने गुरुजी वाचनालयात बसलो होतो. बरेच बालमित्र जमल्याने मजा मस्ती जोरात सुरू होती. प्रत्येक पाच मिनिटांनी पुन्हा शांतता पसरे कारण वाचणालयातील गोंगाटाची तक्रार अध्यक्षांपर्यत गेली होती व जात असे. त्यात माझा परममित्र आणि वकतृत्व स्पर्धेतला प्रतिस्पर्धी पंकज तोडकर वाचनालयात आला कि एखादया विषयावर आमचा वादविवाद चांगलाच रंगत असे.             त्यावेळी गावात सप्ताह सुरू होता. आठ वाजले आणि मला महाराज लोकांना फराळ मिळणार याची आठवण झाली. आजचा अल्पोपहार सुताराच्या घरात या निश्‍चयाने मी मारूतीच्या देवळाजवळ पोहचलो. देवळासमोर प्रचंड गर्दि पाहुन  उत्सुकतेणे मी आत डोकावुन पाहिले. देवळामध्ये माळ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. बाहेर माळकरी चर्चा करित होते, ''कुणाला माळ घालायची असेल तर घाला कारण आजच्या सारखा मुहुर्त कधीही येणार नाही. शिवाय सार्वेडकर महाराज म्हणजे किती चांगले व्यक्तीमत्व!' वगैरे..  मी क्ष

कातरवेळ

Image
वरळिचा समुद्राकिणारा माझ्या अनेक सुख-दुखांचा साक्षिदार आहे. गावी गेलो कि धरण आणि मुंबईत आलो कि वरळि समुद्रावर मी फिरकतोच. या चौपाटिला नेहमीच चांगला विविध पातळिवर बहर येतो.इथला 'सनसेट' कित्येकांच्या मनाला भुरळ घालतो. राजमार्ग खेटून असल्याने इथला परिसर शांत नसला तरी समुद्रकाठी वसलेल्या बिल्डींग, चकाचक परिसर, गारवारा आणि समोरचे नयनरस्य दृष्य पाहुन प्रत्येक वाटसरू भारावून जातो! आर के लक्ष्मण यांचा आम आदमी सुद्धा या सर्वांची मजा घेत उभा आहे. एकदा मी माझे परममित्र सुहास खंडागळेसोबत गेलो असता त्याला म्हटले, 'आपल्यासारखे कित्येकजन शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आरोग्यसेवेसाठी मुंबईला येतात तशा या एकामागुन एक येणा-यां लाटांना पाहुन मला वाटते!'  किणा-यावर पोहचताच प्रत्येक पुढच्या लाटेवर मागची लाट वर्चस्व निर्माण करतेच हया सुहासच्या चलाख, अनपेक्षित आणि मार्मिक उत्तराने प्रत्येक क्षेत्रात चालणारे सिनिअर्स, ज्युनिअर्स असे गट पटकण डोळयासमोर आले!                समुद्र म्हणजे माझा 'वीक पॉइंन्ट' माझ्यासारख्या रसिकाला समुद्राच्या पाण्याजवळ जाण्यापासुन रोखता येणं शक्यच नव्हत. मी एक

लक्षवेधी स्पर्धा

 स्पर्धा  स्पर्धा एक पण; आपली संपुर्ण साधना व शक्ती त्या एका पणाला लावण्याचा क्षण. मला स्पर्धेची नेहमीच आपुलकी वाटते. आपण श्रेष्ठ आहोत हे सिध्द करण्याची संधी स्पर्धा देते. आता तुमचा अनुभव मोठा असेल तर तुमचे मन आतरराष्ट्रीय स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धा वगैरे त्यांचे नियोजन आणि घोटाळे इकडे पळत असेल पण मी गल्लीबोळातील, शाळा-कॉलेजमधील आणि फार फार तर तालुका-जिल्हा स्तरीय स्पर्धांपुरता माझा प्रवास आहे.कारण माझ्या मराठी मिश्रीत हिंदी भाषेमुळे राष्ट्रीय युवा महोत्सवात मी २००६ साली सपशेल हार खाल्लीय , शिवाय इंग्रजी आमच्या बा ला पण जमली नाही. आज फक्त कारण मिळाले की पुरे ; स्पर्धेवर स्पर्धा आणि बक्षिसांचा पाऊस! आता तर लोक असे म्हणायला लागलेत की, दोनशे ते पाचशे रूपयांचे बक्षिस मिळेल दुसरे काय ?             आमच्या गावी तर लोक म्हणायचे, 'तुमच्या मंडळाच्या स्पर्धेमुळे मुलांच्या शैक्षिणीक अभ्यासावर परीणाम होतोय!'  मुंबईत गणेशोत्सवात एका स्पर्धेठिकाणी केवळ स्पर्धकच उपस्थित होते; प्रेक्षक कोणीच नाही! शिवाय, कोणीही वाद-विवाद स्पर्धेसाठी नाव न दिल्याने तिन्ही गटातील ही स्पर्धा रद्द करण्यात

'एकाकी संघर्ष'....

                आजचे  हे लिखाण करण्यासाठी प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसुन चव ना रव असलेले  खाणावळीचे जेवण आहे. जेवणाशी निगडित खुप आठवणि आज उफाळुन आल्या आहेत. माझी वहिणी  खुप चांगले जेवण करते तिला वेळोवेळी मी आइच्या जेवणाची आठवण करूण देत असतो. पुर्वी गावी  मळणी काढली की ज्याची मळणी त्याच्या घरी जेवण होणारच. आमच्या भाताची मळणी असतानाचे  ते  जेवण आई अप्रतिम बनवायची. जोंधळण्याची भाकरी आणि बांगडयाची चटणी आठवली कि बस्स ..... !  आता माझ्या  जिभेला पाणी येणार नाही कारण मी माळ घातली ना !  तो किस्साही पुढे येईलच. वटाण्याची आमटी तर  मला आजपर्यंत कुणी आई करायची तशी  केलेली आढळली नाही. तिच गत सांडग्याच्या आमटीची..              माझा मधला  भाऊ विक्रम कुक आहे त्याच्या हाताला येणारी चव हि आईच्या हाताचीच असणार असे मला वाटते! आमचा  दादा दहावीत पास व्हावा म्हणुन आईने गणपतीकडे नवस केले होते. त्यानुसार  तिने सत्यनारायनाची पुजा घालुन  जेवणाचा कार्यक्रमही ठेवला होता. ते ही जेवण उत्तम होते पण् माझा मित्र श्रीकांत पावले उशिरा आला तेव्हा  जेवण संपले म्हणुन मी आईवर केवढाचा रागवलो होतो. त्याचे तिने आठवडा

पनवेलच्या पाट्या

Image
सूचनावजा दम देणारया या पनवेलच्या पाट्या पहा ! तसेच कुत्र्यांना खराब कुत्रे संबोधणारी आणि पार्किंग व गाड्या धुण्यास मज्जाव सांगणारी पाटी पहा !
Image
एकाकी संघर्ष आत्मचरित्रातून....             मला कपडे आणि भांडी धुणे ही  कंटाळवाण त्रासदायक अशी कामे वाटतात. मुलींना चुल आणि मुल या सुत्रात अजुनही हि कामे सुटलेली नाहीत तर घरकामवाल्या बाईला तिच्या या सदर कामांची योग्य ति श्रमप्रतिष्ठा मिळत नाही; या विचाराचा मी आहे.  डबा धुवायला लागतो म्हणुन मी अशी खाणावळ शोधायचो जिथे जेवुन ताट पुढे करून पळता येईल. त्यामुळे जवळजवळ १२ घरचे पाणी प्यायलेला मी माणुस आहे. कपडे धुताना काही आठवणी झराझर डोळयासमोर आजही येतात. स्व:ताची कपडे स्व:ता धुण्याचा नियम आमच्या घरी पुर्वीपासुनच होता. माझ्याकडे संध्याकाळचा चहा, भात असा स्वयपांक आणि तेवढयात पाणी आले तर पाणी भरण्याचेही काम असायचे. मला पाणी भरायला मदत करणारी डव-याची ताई ही आज आठवते तर कपडे धुवायला मदत करणारी अबिता ताई सुद्धा आठवते. पुढे आई जेव्हा अंथरूणावर खिळुन होती तेव्हा तिची कपडे विक्रम धुताना त्याला गल्लीतील बायकांनी जाम विरोध केला होता. मलाही जवळ जाण्यास विरोध व्हायचा पण् मी एकले नाही.              घरचे जेवन करताना शेंगा  आणि चिचोके भाजण्याचा तसेच भजी करून खाण्याचा कार्यक्रमही मी य

गाव विकास चळवळीचा झेंडा

Image
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या आपल्या जिल्ह्यातील तरुणांच्या संघटनेने गाव विकासा च्या चळवळीचा झेंडा प्रसिद्ध केला आहे.शेती,आधुनिक तंत्रज्ञान आणि आजच्या 21 व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान याची सांगड घालून गाव विकासाचा नवा संकल्प या संघटनेने मांडला आहे.गाव विकास ही एक चळवळ झाली पाहिजे.गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे...विकासाच्या भूमिकेला चळवळीचे रूप प्राप्त झाले तरच शासनाचे लक्ष गावांच्या विकासाकडे जाईल, नाहीतर नेते आपला विकास करत बसतील,तेव्हा जागे व्हा...गाव विकास समिती ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही मात्र गावांच्या विकासाची भूमिका ठोस आहे...संघटनेकडे विकासाचे व्हिजन आहे...आणि म्हणूनच आपण तरुणांनी या संघटनेचे विचार गावा गावात पोहोचवायला हवेत...चला तर गाव विकास एक चळवळ करूया...सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी उभारलेली चळवळ...

बैठकी

           मी बैठकित राहणारा. कॉलेजमध्ये कुणी विचारले कुठे राहतो? तर हॉस्टेलमध्ये असे सांगायचो. त्यावर मीत्र  बॅचलर्स का? असे विचारायचे. मुळात बायकामुले गावी ठेवुन आलेल्या इथल्या मंडळींना बॅचलर्स कसे  म्हणणार? शिवाय हॉस्टेल हा प्रकार ही त्यांच्यासाठी नवा होता! मला शेवटपर्यंत बैठकी शब्दाचा अर्थ मिळाला  नाही. कदाचित बैठकी म्हणजे केवळ बसण्यापुरती खोली; असे असावे ! १८० चौरस फुटाच्या  खोलीत  बाथरूम टॉयलेटचीही सोय! खोलीच्या मधोमध लाकडी बाकडे होते. एक बॅग ठेवायला जागा, एक खिळा  कपडे अडकवायला आणि ३ बाय ७ चा बिछाणा असा साचेबद्ध आवाका खोलीतील २० लोकांच्या  वाटयाला होता.                महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातुन आलेले लोग इथे राहत होते. प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद  इथे जन्माला येत. बळी तो काण पिळी असा इथला न्याय होता. रांगेणे टॅायलेटला जाणे, रांगेणे  अंघोळ करणे, शेवटी उठेल त्याने झाडु मारणे आणि शेवटी अंघोळ करील त्याने लादी साफ करणे अशी  नियमावली काटेकोर होती. हा लादी आणि झाडु मारण्याचा नंबर माझा फिक्स होता! पार्टनरशिपमध्ये  खोलीचे मालकी हक्क असल्याने एक मालक दारूसाठी पैसे जबरदस्ती भाड

पनवेलच्या पाट्या

Image
पनवेलच्या पाट्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विनोद जरी नाही झाला तरी वैचारिक संदेश देण्याची भावना असते. फडके नाट्यगृहाशेजारील हा भित्तिसंदेश हेच सांगत आहे !

पनवेलच्या पाट्या

Image
या दोन पनवेलच्या पाट्या पहा ! पहिल्या पाटीमधील मराठी पहा ! आणि दुसऱ्या पाटीमध्ये चहाविक्रीचा विषय असला तरी ते दुकान कसले आहे ते पहा ! ह्या पाट्या आपण कोठे पहिल्या सांगा !
Image
नमस्कार मंडळी  पुणेरी पाट्या आपल्या सर्वाना परिचित आहेत. निखळ विनोदी,माहितीपूर्ण,खोचक अशा या पाट्या म्हणजे मराठी माणसांच्या विनोदी स्वभावाचा नमुनाच जणू. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल; आपल्या पनवेलमध्येही अशा पाट्या आहेत. आम्ही शोधून काढल्या आहेत अशाच कांही पनवेलच्या पाट्या ! चला तर मग पाहुयात पनवेलच्या पाट्या ....  आणखी एक  पाटी ... (आपण कुठे पहिली हि पाटी आठवते का ?)  (टीप :- आपल्याला अशा कांही पाट्या आढळल्या तर येथे  जरूर पाठवा.) 
Image
सोशल कट्यावरील मित्र आणि मैत्रिणींनो सहज सुचलं म्हणून पनवेलच्या पाट्या निदर्शनास आल्या आणि पहिली पाटी पोस्ट करताच सोशल कट्यावरील विविध ग्रुप्स,फेसबुक,व्हॉट्सअप,ट्विटर,गुगल प्लस,ब्लॉग्स   यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. सर्वानी या उपक्रमाचे स्वागत केले त्यामुळे आता आणखी कांही पाट्या पोस्ट करीत आहे. आपल्या प्रतिक्रिया कळू द्या ! अहो आपण पनवेलकर !

पनवेलच्या पाट्यांच्या चळवळीत सहभागी व्हा !

Image
पनवेलमध्येही आहेत पाट्या ! नमस्कार मंडळी , मोजक्याच शब्दात खोचकपणे मात्र आशय असलेली टिप्पणी करणे हि पुणेकरांची खासियत आहे. त्यातूनच पुणेरी पाट्यांचा जन्म झाला. पुणेरी पाट्या कधी सुरु झाल्या कोणी सुरु केल्या आणि का सुरु केल्या हा संशोधनाचा विषय आहे. पुणे पाठोपाठ कोल्हापूरनेही कोल्हापुरी पाट्या जन्माला घातल्या. मात्र आपले पनवेल यात मागे कसे राहील ? पनवेलची आगरी कोळी बांधवांची भूमी; यात उद्योग व्यवसायानिमित्त देशभरातून लोक स्थायिक झाले आहेत आणि ते हि पनवेलचेच झाले आहेत. या मंडळींनी पनवेलच्या रूढी परंपरा आणि  संस्कृती स्वीकारली आहे. व्यवहारात वावरताना पनवेलच्या व्यक्तीची एक शैली निर्माण झाली आहे आणि तिचा प्रत्यय त्याच्या बोलण्यातून आणि व्यवसायातूनही दिसून येतो.  त्यातूनच जन्माला आल्या आहेत पनवेलच्या पाट्या !               तसे पहिले तर पनवेलच्या दुकानांवरील पाट्यांची मुहूर्तमेढ दिवंगत आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनीच केली आहे. तसा उल्लेख त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत केला आहे.             प्रबोधनकारांच्या पाट्या आज पनवेलमध्ये दिसणार नाहीत. मात्र बाजारपेठेत भटकंती करताना पनवेलकरांनी चिम

मुंबईत आगमन

                ८ जुन २००६ ला मी दादासोबत मुंबईला महालक्ष्मी एकस्प्रेसच्या जनरल डब्यातुन पोहचलो. पत्ता  पाठच होता. खोली नंबर ९९ शाहु सदन, करी रोड, मुंबई ४०००१३.   पप्पांना या पत्यावर शंभरभर पत्रे  पाठविली असतील . काही काळ दादालाही पत्र पाठविली ती सुद्धा  याच पत्यावर. आमच्या घरात दोनच  सुशिक्षित माणसे एक पत्रे लिहिणारा मी आणि ती वाचनारे पप्पा! जोपर्यंत पप्पा होते तोपर्यंत दादा  पडदयामागच्या कलाकारासारखे होते. मला आठवतेय आमच्या घरात पत्रासाठी एक तार अडकविलेली होती.  त्यात पंचविस तीस पत्रे नेहमी अडकलेली असायची. महत्वाची बिले व पत्रे ठेवायला ही हक्कांची जागा !  घर सारवायला काढले कि प्रथम या तारेची सोय सुरक्षित ठिकाणी केली जायची. जशी पत्रे बंद झाली तशी  तिर्थरूप, तिर्थस्वरूप आणि साष्टांग नमस्कार विनंती विशेष त्याचबरोबर पत्र लिहिण्यास कारण की अशी  भाषाही बंद झालेली दिसतेय. एक विशेष पत्र मला आठवतय दादाने आईला पाठवलेले; त्यामध्ये  वडिलांविषयी नाराज होवुन  आपल्यावर अन्याय झालाय वगैरे...  अशा आशयाचे ते पत्र होते. वास्तविक ब-याच मुलांना असेच वाटते कि  आपल्याला पालकांनी कमी दिले वगैरे सदर पत्रात

झुलपेवाडी

गावची वेस भराभरा मागे जात होती. तशी मनात भिती वाटत होती ती पुन्हा लवकर येणे होणार नाही याची! ही वेळच मागे वळुन पाहायची होती की कुणास ठाऊक काही केल्या गाव डोक्यातुन जाईना. झुलपेवाडी, महाराष्ट्राच्या नकाशावर गोवा, बेळगाव प्रांतानजीकचा भाग; पानझडी वृक्षांमुळे, आजरा तालुका असला तरी भुदरगड, गडहिंग्लजशीच जास्त जवळीक! कदाचित म्हणुनच विधानसभा मतदारसंघ पुर्वी गडहिंग्लजच होता. पण आता त्याची नाळ कागलशी जोडलीय! मुळात भुदरगड या घाट प्रांताला कोकणशी जोडणा-या पायवाटेवरील हे गाव; आपण कल्पनाही करणार नाही इतक्या दुरवर इथली लोकं चालत गेल्याच्या आठवणी इथले बुजुर्ग सांगतात. पूवी चिमणे हे एकच नाव चिमणे आणि झुलपेवाडी गावांना होते. दोघांसाठी चिकोत्रा हि एकच नदी आणि भावेश्‍वरी हे एकच ग्रामदैवत. आहोत भाग्यवंत आम्ही, ज्यांसी आई लाभली; भावास भुकेली भावेश्‍वरी सहयाद्री पर्वत पाठीशी चरणी चिकोत्रा नदी लक्ष तिचे सर्वांवर, आशिर्वाद ही पाठी!   अशीही लोककथा प्रसिध्द् आहे कि, भुदरगडच्या तोफा डागल्यावर चिकोत्रा नदीपर्यंत पोहचत त्यामुळे दोन्ही गावे विभागली. दोन्ही दिशांना फांगली. कालांत

निरोप

बारावीचा निकाल लागला. मला ५१%मिळाली.  विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणुन डी.एड्.ला प्रवेश मिळाला असता ! कारण तीच वाट मला माहित होती. पण दादानंआणि गावातील इतर लोकांनी  डी.एड्.ची सुद्धा  आशा सोडली  होती. म्हणुन मी ही हातपाय गाळुन बसलो होतो. आता मला समजले होते, की मी विज्ञानशाखेसाठी योग्य नसुन  मला कला शाखेत प्रवेश घ्यायला हवा होता. आमच्या दहावीच्या बॅचचा निकाल आणि आताचा बारावीचा निकाल यात जमीन आसमानचा फरक दिसत होता. फारच उलथा-पालथ झाली होती. मी साने गुरूजी वाचनालयाचा दत्तकपुत्र म्हणजे माझ्या या निकालावर सर्व गावचा रोश! तो त्यांचा अधिकारच होता म्हणा ! शिवाय मला चांगले वाईट म्हणणारे दुसरे होते तरी कोण? मी करीत असलेले अमर मेडिकलमधील काम सोडले ; तशी गावात राहुन  बी. एस.सी वगैरे करण्याची आशाही सोडली. एकदा उत्तुरला जाताना मनात कविता रेंगाळत होती. आणि  त्याचवेळी मी रस्ता ओलांडत होतो. त्या दिवशी अपघातात मरता-मरता वाचलो होतो. हा प्रकार नामुमामाला कळाला होता. दादाला त्यांनी माझ्यासमोर सांगितले., 'हे बघ, याला पण घेऊन जा मुंबईला. इथं ते येडयागत कराय लागलयं!  असं म्हणत त्यांनी मलाही