Posts

Showing posts from November, 2021

निवडणुका लढविणाऱ्यांसाठीजात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

            महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल.             ग्रामपंचायत ,  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.             महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10 च्या पोट कलम (1क) आणि 30-1क आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 (क) ,  42 (6-क) ,  67 (7-क) मधील तरतुदीनुसार निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2022 किंवा त्यापूर्वीचा असेल.  मात्र ,  नामनिर्देशन भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु

राष्ट्रपती ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगड ला देणार भेट

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे निमंत्रण...   कोल्हापूर : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट देण्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निश्चित केले आहे. मंगळवार दि. ७ डिसेंबर रोजी राष्ट्रपती रायगडाला भेट देवून छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण स्वीकारून राष्ट्रपती कोविंद यांनी रायगड भेटीसाठीची ७ डिसेंबर तारीख निश्चित केली आहे. दरम्यान , राष्ट्रपतींच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सहकार्य लाभत आहे. यापूर्वी शिवछत्रपतींच्या जन्म शताब्दी सोहळ्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सन १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी

माऊली गडावर अवघ्या चार वर्षीय मुलीची यशस्वी चढाई

Image
ठाणे : पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडून पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीय व मुलांसाठी  शहापूर तालुक्यातील माहुलीगडावर चढाई आयोजित केली होती ही चढाई सकाळी 7.00वा वाजता सुरुवात झाली सदर चढाई मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अमोलकुमार होळकर त्यांच्या पत्नी सुनीता होळकर यांची छोटा मुलगी कुमारी राजेश्वरी अमोलकुमार होळकर वय चार वर्षे यांनी अगदी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या कन्येने एवढ्या लहान वयामध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या मुघलांना घाम फोडणार्‍या इंग्रजांना कापायला लागणाऱ्या अशा या अवघड अशा माऊली गडाची यशस्वीपणे चढाई करून तितक्याच उत्साहाने ती उतरण केली. त्याबद्दल अशा या छोट्या राजेश्वरीचे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व इतर ट्रॅक्टर्स पोलीस बांधवांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या तिच्या कामगिरीबद्दल तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे आहे. इतिहासामध्ये  शूर लोकांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे त्या शूर वीरांचे स्मरण म्हणून आपल्या कन्येने एवढी मोठी कामगिरी केल्याने तिचा सार्थ अभिम

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या फसवणुकीचा विषय मंत्रिमंडळात गाजला !

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी - राज्यमंत्री शंभुराज देसाई               मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.             राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले ,  सिंधुदुर्ग ,  अमरावती ,  सातारा ,  नाशिक ,  नवी मुंबई ,  नागपुर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून ,  ५१  लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

               मुंबई : क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,  महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन  2019-20  आणि सन  2020-21  या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरीता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे. जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन  2019-20  व सन  2020-21  या दोन वर्षाकरीता  2  युवक , 2  युवती आणि  2  संस्था असे एकुण  6  पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार पात्रांचे निकष खालीलप्रमाणे आहेत ( अ) युवक व युवती पुरस्कार -  (1)  पुरस्कार वर्षाच्या  1  एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय  13  वर्ष पूर्ण असावे तसेच  31  मार्च रोजी वय  35  वर्षाच्या आत असले पाहिजे.  (2)  अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग  5  वर्षे वास्तव्यात असला पाहिजे. (3)  अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतप

अनुसूचित जातीतील तरुणांनी केंद्र शासनाच्यास्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  ठाणे  : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील नवउद्योजक तरुणांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत कर्ज मिळणार आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीतिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. या योजनेमधून    महाराष्ट्र शासनाने   सामाजिक   न्याय   व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील तरुण नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येणार आहे. पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहायक आयुक्त ,   समाज कल्याण ,   ५ वा मजला ,   जिल्हाधिकारी कार्यालय ,   कार्ट नाका ,   ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावा ,  असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.  

मुंबई पोलीस राजू घुगरे यांच्या कामगीरीचे कौतूक !

Image
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील  महागाव गावचे सुपुत्र मुंबई पोलीस श्री.राजु नाना घुगरे यांनी आरोपी बाबत कोणताही ठावठिकाणा नसताना केवळ फिर्यादी वरून आरोपीला शोधून काढले याप्रशंसनीय कामगिरीबद्दल नुकताच  पोलीस सहआयुक्त  विश्वास नांगरे पाटील यांच्याहस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्धल त्यांना  शिवसह्याद्री प्रतिष्ठान या बिगर राजकीय सामाजिक  संघटनेने सुद्धा गौरव व्यक्त केला आहे. 

मुंबईसह पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

             मुंबई, : आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई ,  ठाणे ,  पुणे ,  नाशिक ,  रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या जिल्हा उपनियंत्रक ,  नागरी संरक्षण दल यांच्या कार्यालयाशी  संपर्क साधावा , असे आवाहन नागरी संरक्षण  संचालनालयाचे संचालक डॉ के व्यंकटेशन यांनी केले आहे.              नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई ,  ठाणे ,  पुणे ,  नाशिक ,  रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.              नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी ,  असेही आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.के व्यंक

खिडकाळी शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी निधी मंजूर...

Image
ठाणेः  कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ४३ कोटींचा भरघोस निधी प्राप्त करून घेतल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या प्रयत्नाने आता शिळफाट्यालगत देसाई गाव येथील खिडकाळी शिव मंदिर आणि परिसराचे सुशोभिकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. खिडकाळी येथील शिवमंदिराचा तीर्थ क्षेत्राच्या धर्तीवर विकास करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने खिडकाळीच्या शिवमंदिर  परिसराचे रूपडे पालटणार आहे.   ठाणे जिल्ह्यात स्वयंभू शिवलिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये अंबरनाथचे शिवमंदिर आणि देसाई गावाजवळील खिडकाळी शिवमंदिराचा उल्लेख सापडतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे मंदिरांच्या रूपाने मतदारसंघात असलेल्या  प्राचीन वारशाला टिकवून ठेवण्यासाठी कायम आग्रही असतात. त्यातूनच काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ येथील  प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४३ कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले. त्यामुळे लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर

दिवावासीयांना लवकरच पाणी दिलासा !

Image
·        पलावा (लोढा) येथे १००० मिलीमीटर पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे (प्रतिनिधी) १३ नोव्हे.: दिवा शहरात पिण्याच्या पण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे हि समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे मनपा आयुक्त आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून एकूण २२१ कोटीचा दिवा - मुंब्रा रिमॉडलिंग हा प्रकल्प सुरू आहे. त्यामधील दिवा शहरासाठी ५ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील अवघे १००० मीटर काम शिल्लक होते. यात पलावा (लोढा) मधील ७५० मीटर जलवाहिनीचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले होते. या जलवाहिनीचे काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता. त्यामुळे सदर ठिकाणी पाइपलाईन टाकण्याचे काम रखडले होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा दाखला नुकताच मिळाला.  त्यामुळे शनिवारी दिवा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पाप

ठाणे जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी

जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम   नव मतदारांना नाव नोंदणीसाठी साप्ताहिक सुट्टयांच्या दिवशी विशेष मोहिम   युवा-युवतींनी मोहिमेत सक्रीय सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन   ठाणे :  जिल्ह्यामध्ये दि.1 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम ‍राबविण्यात येत असून जे युवा युवती दि. 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यांना या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी दि. 13, 14, 27 आणि 28 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यातील युवा-युवतींना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात 2022 मध्ये  महापालिकांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार असून दि. 30 नोव्हेंबर

दिव्यातील आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा खासदार निधी

·          भुमीपुत्रांची संस्कृती ,  परंपरा ठसठशीतपणे दिसणार ,  दिवा बेतवडे गावात होणार आगरी-कोळी आणि वारकरी भवन   ठाणेः  कोकण पट्ट्यातील ठाणे जिल्ह्यात मुळचे भूमीपुत्र असलेल्या आगरी ,  कोळी समाजाची संस्कृती ,  परंपरा आणि ओळख पुढील पिढ्यांना व्हावी ,  या उद्देशाने आगरी भवन उभारण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा - बेतवडे गावात यासाठी असलेल्या सुविधा भूखंडावर  आता आगरी ,  कोळी आणि वारकरी भवन उभारले जाणार आहे. भवनाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने तब्बल १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आगरी-कोळी आणि वारकरी भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.   ठाणे जिल्ह्यात आगरी ,  कोळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आपल्या पारंपरिक कामांपासून दूर जात या समाजातील बांधवांनी गेल्या काही वर्षात इतर कामे स्विकारली आहेत. बहुभाषिक होत चाललेल्या शहरांमध्ये स्थानिक आगरी ,  कोळी समाजाची ओळख नव्याने ठसठशीतपणे होण्याची गरज आहे. आगरी ,  कोळी समाजाची संस्कृती जोपासली जावी. आगरी समाजातील बांधवांना आपली संस्कृती टिकवण्यासाठी ,  सांस्कृतिक

शिवसह्याद्री प्रतिष्ठाणमार्फत आदिवासी वस्त्यांवर दिवाळी उत्सव साजरा

Image
*एक करंजी... दुर्गम दारी* 21 व्या शतकात देखील अजून बरीच गावं आहेत, बऱ्याच वाड्या आहेत, बरेच आदिवासी पाडे आहेत जिथे अजूनही सोई सुविधा यांचा वनवास आहे. अशीच एक धनगरवाडा नामक वस्ती भुदरगड तालुक्यात देखील आहे. धनगरवाडा येथील लोक आजही दिवाळीचा फराळ गावोगावी फिरून मागून खातात. ऐन दिवाळीच्या दिवसात त्यांच्या मुलांच्या नजरा फक्त मागून आणणाऱ्या फराळाकडे लागलेल्या असतात. अगदी अशाच योग्य वेळी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रदेश सरचिटणीस संदीप मेंगाणे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीची दिवाळी फराळ भुदरगड तालुक्यातील धनगरवाडा येथे त्यांच्या घरपोच जाऊन दिला. बेडीव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम भोसले आणि सावतवाडी गावचे ग्रामपंचायत कर्मचारी मारुती गुरव यांच्या मदतीने व शिवाजी राजाराम पन्हाळे (बामणे) , प्रदेश अध्यक्ष सुनील बोरनाक, संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांच्या सहकार्याने अतिदुर्गम भागात जाऊन प्रतिष्ठानचे प्रदेश सरचिटणीस संदीप मेंगाणे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष विनायक इंदुलकर, आजरा प्रतिनिधी विनोद येसादे यांनी धनगरवाडा येथील लोकांना त्यांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ वाटप केला. त्यावेळी धन

कल्याणमध्ये आंबेडकर भवन निमित्ताने मराठा भवनच्या मागणीला जोर

ठाणे :- (बाबुराव खेडेकर) कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठापुराव्यामुळे कल्याण पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असला तरी या भागात मराठा भवन मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आग्रही झाला आहे. मराठा भवन साठी खासदारांचे वारंवार लक्ष वेधुनही हालचाली होत नसल्याने येत्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.         कल्याण पूर्व भागात ‘ ड ‘ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे या नागरिकांच्या मागणीची दखल घेत या स्मारकासाठी प्रयत्नशील राहून ५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करण्यात आला. परंतु प्रभाग समितीचे आरक्षण असल्याने या जागेवर स्मारक उभारणीत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. आरक्षण बदलण्यासाठी पुढाकार घेत अखेर काही महिन्यातच सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या जागेवरील १३०० चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक ४२३ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आल्याने आता येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा म

‘कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते’- राज्यपाल

Image
       ·           राजभवन येथे पहिले  ' कलाकार व लेखकांचे निवासी शिबिर ' संपन्न           ·           मुंबई विद्यापीठात  ' नृत्य विभाग सुरु करणार - डॉ. पेडणेकर           ·           राजभवन येथे क्रांतिकारकांचे दालन सुरु करण्यासाठी सहकार्य करणार - डॉ. विक्रम संपत                मुंबई, दि. 3 : मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम कृती असून मनुष्यमात्रांमध्ये देखील कलाकार व लेखक नवसृजनाचे दैवी कार्य करीत असतात. हे नवसृजन समाजाला समृद्ध करीत असते. साहित्य ,  संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच म्हणावी लागेल ,  असा संदर्भ देताना साहित्य ,  संगीत व कलेचा उपयोग उन्नत समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे ,  असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.             राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आयोजित पहिल्या एक आठवड्याच्या कलाकार व लेखकांच्या निवासी शिबिराची शनिवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. शिबिराची संकल्पना व नियोजन इतिहासकार व लेखक विक्रम संपत यांनी केले होते.             शिबिर समारोप कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे क

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

Image
नवी दिल्ली  ,  3   :  वर्ष 2021 साठीचे   राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी  रात्री जाहीर झाले. या पुरस्कारांचे वितरण 13 नोव्हेंबर 2021 रोजी एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.   दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी 12 खेळाडूंना  ‘ मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार ’  तर 35 खेळाडूंना  ‘ अर्जुन पुरस्कार ’  जाहीर झाले आहेत. यासह   ‘ द्रोणाचार्य ’  श्रेणीतील  ‘ जीवनगौरव पुरस्कार ’  आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार ’  असे एकूण 10  खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर झालेले आहेत. याशिवाय  ‘ ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार ’  देशातील 5 खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. 2 संस्थांना  ‘ राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार ’  आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला   ‘ मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी ’  ची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार क

साहित्यीक संदीप मेंगाने राज्यस्तरीय उडान समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Image
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मुंबईस्थित समाजसेवक संदीप दत्तात्रय मेंगाणे यांना उडान फाउंडेशन तर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यस्तरीय उडान  समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भूषण लाड, उर्वी वुमन फौंडेशनच्या अध्यक्षा सारिका पाटील, धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव नाईकवाडे , गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.           ग्रामीण कोल्हापुरातील बामणे गावचे सुपुत्र  कवी,लेखक,गीतकार समाजमाध्यमात शादपुत्र उमाकांत नावाने परिचित व गावात शाहीर या नावाने ओळख असलेले मेंगाने लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असल्याने अनेक मंडळे , प्रतिष्ठान व मित्रांच्या मदतीने मदत कार्यात अग्रेसर असतात.  आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबीर राबवणे, रक्तदान शिबीर राबवणे, काही शालेय उपक्रम जसे एक वही एक पेन जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी शैक्षणिक मदत मिळेल, ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे, गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप,दाल खिचडी वाटप,कोरोना काळात सेफ्टी मास्क, अर्सेनिक गोळया, सॅनिटायजर,कोविड किट वाटप, झोपडपट्टी एरि