Posts

Showing posts from September, 2020

मराठेशाहीसाठी चिपळूणच्या लढाईत शहीद झालेल्या गोळे घराण्याच्या बलिदानाचे स्मरण..

#चिपळूणच्या_गोविंदगडावरची #चित्तथरारक_ऐतिहासिक_घनघोर_लढाई सर्व दुर्ग मित्रांना, दुर्ग अभ्यासकांना, दुर्ग भटक्यांना नमस्कार मित्रांनो इतिहासाची पाने जेवढी उलगडून पहिली जातात, वाचली जातात तेवढा इतिहास हा जगासमोर आणता येतो, इतिहासाचा अभ्यास करत असताना, नवनवीन संशोधन करताना कधी कधी आपल्याच घराण्याचे जर मूळ पत्र सापडले तर जो आनंद मिळतो त्याला जोड नाही, इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, यांनी जवळपास 350 साडेतीनशे गड, दुर्ग स्वराज्यत समाविष्ट केले, काही नवीन बांधले, अन त्याच गडांमुळे नंतरच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य हे अटकेपार झेंडा लावण्यात यशस्वी झाले, प्रत्येक गडावर रणसंग्राम झाला आहे, प्रत्येक दुर्गावर घनघोर युद्ध झाले आहे, अन प्रत्येक लढाईत आपला मराठा मावळा सरदार हा निकराने झुंज देऊन गडावर भगवा झेंडा फडकवला आहे, अशीच एक घनघोर, चित्तथरारक लढाई रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट गिरिदुर्ग वर झाली, साधारण पणे इसवी सन 1660 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवळकोट व अंजनवेल हे दोन किनारी दुर्ग स्वराज्यात समाविष्ट केले त्यांची नावे अनुक्रमे गोविंदगड अन गोपाळगड अशी ठेवली पुढे छत्रप