Posts

Showing posts from June, 2016

भारताचे लाडके राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा आवडलेला संदेश

      केवळ आपली राजकीय व्यवस्थाच शेतकरी,वैज्ञानिक,अभियंते,डॉक्टर,वकील व अन्य व्यावसायिक यांना आवश्यक पाठिंबा देऊन आपली राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करू शकते. हरित क्रांती,धवल क्रांती,अंतराळ मोहिमा,संरक्षण मोहिमा,विज्ञान तंत्रज्ञानातील मोहिमा आणि विकासासाठी पायाभूत रचना हे सारे आपण सध्या करू शकतो. आपण जे कांही आहोत ते आपल्या राजकीय व्यवस्थेमुळे आहोत. म्हणून देशातील युवकांनी राजकारणापासून दूर राहता कामा नये.\एवढेच न्हवे तर स्फूर्तीसाठी,मार्गदर्शनासाठी  आणि नेतृत्वासाठी राजकारणाच्या सर्वच क्षेत्रात उतरावे.           तरुणांची पेटलेली मने "मी करू शकतो " या उत्साहाने व "भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल" यावरच्या त्यांच्या विश्वासाने भारली आहेत. जर तुम्हाला आपण हे सर्व करू शकतो असे वाटत असेल तर भारतात सर्वच क्षेत्रात नवे सर्जनशील नेतृत्व विकसित होईल ! यातूनच ग्रामीण भारतालाही शाश्वत विकासाची दिशा मिळेल. मला असे ठामपणे वाटते की, माझ्या देशातील युवकवर्ग हा राजकारणात प्रवेश करून आपल्या देशावरील निष्टेचे एक आगळे दर्शन घडवेल. तसेच प्रामाणिकपणा,मूल्यांकनपद्धत,धैर्य,निर