Posts

Showing posts from June, 2021

शिवराज्याभिषेक सोहळा 2021

  “ या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा ,  मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ,  ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.... ” मध्ययुगीन हिंदूस्थानच्या अडीच हजार वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक. छत्रपती शिवरायांनी चालवलेले उद्योग केवळ  ‘ मराठ्यांचे बंड ’  नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे ,  राज्याभिषेकाने सिध्द केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. हजारो मावळ्यांच्या ,  सर्वसामान्य रयतेच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली. स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. दुर्गराज रायगडावर प्राचीन  ‘ राज्याभिषेका ’ च्या प्रथेला पुर्नजिवीत केले. ६ जून १६७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी ,  म्हणून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगडावर प्रतिवर्षी ५ व ६ जून रोजी भव्य प्