पनवेलच्या पाट्यांच्या चळवळीत सहभागी व्हा !

पनवेलमध्येही आहेत पाट्या !
नमस्कार मंडळी ,
मोजक्याच शब्दात खोचकपणे मात्र आशय असलेली टिप्पणी करणे हि पुणेकरांची खासियत आहे. त्यातूनच पुणेरी पाट्यांचा जन्म झाला. पुणेरी पाट्या कधी सुरु झाल्या कोणी सुरु केल्या आणि का सुरु केल्या हा संशोधनाचा विषय आहे. पुणे पाठोपाठ कोल्हापूरनेही कोल्हापुरी पाट्या जन्माला घातल्या. मात्र आपले पनवेल यात मागे कसे राहील ? पनवेलची आगरी कोळी बांधवांची भूमी; यात उद्योग व्यवसायानिमित्त देशभरातून लोक स्थायिक झाले आहेत आणि ते हि पनवेलचेच झाले आहेत. या मंडळींनी पनवेलच्या रूढी परंपरा आणि  संस्कृती स्वीकारली आहे. व्यवहारात वावरताना पनवेलच्या व्यक्तीची एक शैली निर्माण झाली आहे आणि तिचा प्रत्यय त्याच्या बोलण्यातून आणि व्यवसायातूनही दिसून येतो. त्यातूनच जन्माला आल्या आहेत पनवेलच्या पाट्या !
              तसे पहिले तर पनवेलच्या दुकानांवरील पाट्यांची मुहूर्तमेढ दिवंगत आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनीच केली आहे. तसा उल्लेख त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत केला आहे. 
           प्रबोधनकारांच्या पाट्या आज पनवेलमध्ये दिसणार नाहीत. मात्र बाजारपेठेत भटकंती करताना पनवेलकरांनी चिमटा घेतलेल्या किंवा अनवधानाने विनोद झालेल्या पाट्या जागोजागी दिसतात. त्यातूनच पनवेलच्या पाट्यांची संकल्पना पुढे आली आहे आणि ती क्रमशः एक एक पाटी पोस्ट करून आपल्या प्रतिक्रियेसाठी पाठवत आहे. आपल्याला अशा कांही पाट्या आढळल्या तर येथे  जरूर पाठवा . आणि पनवेलच्या पाट्यांच्या चळवळीत सहभागी व्हा !
चला तर मग पाहुयात पनवेलच्या पाट्या .... 
पहिली पाटी ... 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income