Posts

Showing posts from May, 2017

भाजपचा एकात्म मानवतावाद

          हिंदुस्थानातल्या गुलामगिरीला कांही अंतच नाही. काळे गोऱ्यांचे गुलाम आहेत, स्त्रिया पुरुषांच्या गुलाम आहेत, अस्पृश्य स्पृश्यांचे गुलाम आहेत,खेडी शहरांची गुलाम आहेत,जनावरं माणसांची गुलाम आहेत.... हि यादी हवी तितकी वाढवता येईल असे सेवाव्रती विनोबा भावे यांनी म्हटले आहे.या परिस्थितीचा परामर्श घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतात जिथे धर्माला समृद्धी,कल्याण आणि मोक्ष मानले जाते तोच धर्म म्हणजे व्यक्ती,समाज,सृष्टी आणि परमेश्वर यांच्या एकात्मतेचा विचार मांडला. भारतीय जनता पार्टीने एकात्म मानवतावाद हा एतद्देशीय विचार पक्षाचे तत्वज्ञान म्हणून स्वीकारले आहे.              एकात्मता संपूर्णतेत समाविष्ट असते. संपूर्णतेच्या अभावात मनुष्य अपूर्ण दृष्टीच्या प्रभावाखाली जातो. जशी ब्रह्मांडात संपूर्णता असते तशीच ती व्यक्तीतही असते. व्यक्ती म्हणजे केवळ शरीर न्हवे तर त्याच्याजवळ मन ,बुद्धी आणि आत्माही आहे याचा विचार आहे. या चारपैकी एकाकडे जरी दुर्लक्ष केले तरी मनुष्य विकलांग होईल अशी धारणा एकात्म मानवतावादाची आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतींचा विकास व्हावा आणि एक असा मानवधर्म

सेवाव्रती विनोबा भावे यांचे मला भावलेले विचार

 ज्या कार्यकर्त्याला लोकसंग्रह करावा असं वाटतं त्यानं अंगी वेधकता,कोधकता,शोधकता,उत्कटता आणि निरंतर तन्मयता हे गुण अंगी बाणवायला हवेत.  आपलं स्वतःचं घर सांभाळणे म्हणजे स्वराज्य आणि आपलंच घर उत्तम प्रकारे सांभाळणे म्हणजे सुराज्य ! ''मुखी नाम आणि हाती काम'' हे सूत्र टकळीच्या साहाय्यानं राष्ट्राच्या अंगवळणी सहजपणानं पडण्यासारखं आहे.  शिक्षणाची माझी छोटी व्याख्या आहे सत्संगती आणि मोठी व्याख्या आहे आत्मज्ञान  ज्वारी जोरदार उगवली तर तिला कणसं धरत नाहीत. त्याचप्रमाणे बळवंतांना स्ववंशवृद्धीची लालसा नसते. अशी लालसा कमजोरांना असते.  मनुष्य काय करू शकला हे देव पाहत नाही. तो पाहतो कि, मनुष्याला काय करायची इच्छा होती आणि तो काय करू शकला नाही ! आहाराचं धोरण असं असावं कि,देहावर जुलूमही करायचा नाही आणि देहाची आसक्तीही ठेवायची नाही.  हिंदुस्थानातल्या गुलामगिरीला कांही अंतच नाही. काळे गोऱ्यांचे गुलाम आहेत, स्त्रिया पुरुषांच्या गुलाम आहेत, अस्पृश्य स्पृश्यांचे गुलाम आहेत,खेडी शहरांची गुलाम आहेत,जनावरं माणसांची गुलाम आहेत.... हि यादी हवी तितकी वाढवता येईल. 

प्रचार गीत- बोल बीजेपी बोल

Image

Majha Prabhag Majha Agenda - Prabhag No.17

Image

कार्यसम्राट आ. प्रशांत ठाकूर यांची शैली

Image
कार्यसम्राट आ. प्रशांत ठाकूर यांची शैली : कॉफी विथ सकाळ मध्ये रंगला संवाद  पनवेल :-  बाबुराव खेडेकर                रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे रायगड जिल्हयातील ''युथ आयकॉन'' आहेत. त्यांची कार्यशैली राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक अशीच आहे. त्यांच्या कार्यशैलीचे विविध पैलू  ''कॉफी विथ सकाळ'' या दैनिक सकाळच्या विशेष उपक्रमामध्ये पहायला मिळाले. शेकापमधून काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजप असा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला ? त्यामागील अपरिहार्यता काय होती ? आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठीचे त्यांचे स्वप्न साकारताना कसा संघर्ष करावा लागला याचे सविस्तर विवेचन या मुलाखतीमध्ये त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षाबद्धल द्वेषभावनेचा लवलेश या मुलाखतीमध्ये दिसला नाही.हीच त्यांची खास शैली जनतेला आपलेसे करणारी आहे.            पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी सकाळने ''कॉफी पे चर्चा'' असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.सोमवारी (दिनांक १ मे ) रोजी आमदार प्रशांत ठाकूर