Posts

Showing posts from July, 2023

ती’लाही हवीय समान वागणूक...

Image
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या बाबत विचार करण्यासाठी नुकतीच मुंबईत एक परिषद झाली. या परिषदेत या महिलांच्या समस्याबाबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेचा आढावा घेणारा लेख...  “पतीच्या निधनानंतर दिराने एक लाखाला विकले….मुले पदरात आहेत. वय वाढल्याने आता अर्थार्जनही कमी आहे…म्हातारपणी कसे जगावे कुणाचाच आधार नाही…” ही वेदनादायक कथा ती महिला हूंदके देत सांगत होती.  एकीने “सरकारी रूग्णालयातही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ओळखपत्र आणा असे सांगतात…” असे सांगितले. तर, “….बच्चो को पढाना है लेकीन आधार कार्ड लेके आओ…पिता का नाम क्या है..?” असे विचारत असल्याचे तीची सखी सांगत होती. बाजूच्या महिला त्यांना आधार देत होत्या. देह विक्री व्यवसायात असलेल्या या महिलाचं एकमेकींचा आधार असतात.  मुलांचे ओळखपत्र तयार करताना आईचे नाव लिहू शकतो... याबद्दल त्यांनाच काय, अनेक संस्थांमधील नोकरवर्गाला माहित नसल्याने त्यांच्याकडून वडीलांचे नाव, दाखला अशी कागदपत्रे मागवली जातात. ती सादर न केल्यास त्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही. पुरूष प्रधान संस्कृती बदलत असली तरीही, आई सुद्धा मुलांच्या आयुष्य

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन   ठाणे :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था/लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने भारत निवडणूक आयोगाव्दारे दि. ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सर्व घटकातील पात्र मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.               ठाणे जिल्ह्यात ३ लोकसभा मतदारसंघ व १८ विधानसभा मतदार संघ असून दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यात ६२,१४,५१७ इतके एकूण मतदार असून यामध्ये ३३,६७,१२० पुरुष मतदार आणि २८,४६,३१९ महिला मतदार आणि १०७८ तृतीयपंथीय मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ६३९१ मतदान केंद्रे असून ५४०२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. दिनांक ०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार