Posts

Showing posts from January, 2023

”जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" महाराष्ट्राचे राज्यगीत

*सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मान्यता*    मुंबई, :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने या गीतास राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.             महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत अधिकृत असे राज्यगीत नव्हते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फुर्तीदायक व प्रेरणादेणारे तसेच महाराष्ट्राचे शौर्याचे वर्णन करणारे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा याचे गीतकार कविवर्य राजा निळकंठ बढे, संगीतकार श्रीनिवास खळे असून हे गाणं शाहीर कृष्णराव साबळे या