कातरवेळ


वरळिचा समुद्राकिणारा माझ्या अनेक सुख-दुखांचा साक्षिदार आहे. गावी गेलो कि धरण आणि मुंबईत आलो कि वरळि समुद्रावर मी फिरकतोच. या चौपाटिला नेहमीच चांगला विविध पातळिवर बहर येतो.इथला 'सनसेट' कित्येकांच्या मनाला भुरळ घालतो. राजमार्ग खेटून असल्याने इथला परिसर शांत नसला तरी समुद्रकाठी वसलेल्या बिल्डींग, चकाचक परिसर, गारवारा आणि समोरचे नयनरस्य दृष्य पाहुन प्रत्येक वाटसरू भारावून जातो! आर के लक्ष्मण यांचा आम आदमी सुद्धा या सर्वांची मजा घेत उभा आहे. एकदा मी माझे परममित्र सुहास खंडागळेसोबत गेलो असता त्याला म्हटले, 'आपल्यासारखे कित्येकजन शिक्षणासाठी, नोकरीसाठी, आरोग्यसेवेसाठी मुंबईला येतात तशा या एकामागुन एक येणा-यां लाटांना पाहुन मला वाटते!'  किणा-यावर पोहचताच प्रत्येक पुढच्या लाटेवर मागची लाट वर्चस्व निर्माण करतेच हया सुहासच्या चलाख, अनपेक्षित आणि मार्मिक उत्तराने प्रत्येक क्षेत्रात चालणारे सिनिअर्स, ज्युनिअर्स असे गट पटकण डोळयासमोर आले!
               समुद्र म्हणजे माझा 'वीक पॉइंन्ट' माझ्यासारख्या रसिकाला समुद्राच्या पाण्याजवळ जाण्यापासुन रोखता येणं शक्यच नव्हत. मी एकटाच समोरील दगडावर उडी मारून चालु लागलो. गावाच्या धरण्यावरून चालण्याचा अनुभव मला इथे मिळतो! मी पााण्याजवळ पोहचलो सुर्य अगदी शेवटच्या टोकावर होता. पाण्यावर लाल रंगाची झालर तयार झाली होती. पाण्याला स्पर्श करताच त्या दिवसाची आठवण आली. ५ स्पटेंबर, कॉलेजच्या शिक्षण दिन होता व मी मुख्याध्यापक बनलेलो. ती साडी नेसुन आलेली आणि मी मुख्याध्यपकांच्या अधिकारवाणीने तिचा  मराठीचा तास हिरावून घेत मी तो तास घेणार असल्याचे तिला सांगितलं.मित्राने केलेल्या कवितेचं वाचन आणि त्याच्या प्रेम प्रकरणात मदत म्हणुन आणि माझीही एखादी कविता वाचुन दाखवण्याची संधी म्हणुन मीच स्व:ता तो तास घेण्याचे ठरविले होते. ती मात्र वर्गात निराश होऊन बसली. तास न घेता आल्याने तिच्या जगावेगळया अवताराकडे सगळा वर्ग टक लावुन बघत होता आणि मी प्रेम कवितांचा सपाटा लावलेला! तिची माझ्याविषयी असलेली थोडिशी आपुलकी संपली होती. माझ्या वागण्याने ती खुपच चिडली आणि आमच्यातील वातावरण बिघडलं.
                संध्याकाळी सहानंतर प्रत्येकजन आपल्या घरी जायला निघाला. ती बस स्थानकाच्या दिशेने पुढे वेगाने, रागाने जात होती आणि मी वेडयासारखा तिची  समजुत काढण्यासाठी तिच्यामागे जात होतो. 'सॉरी' शब्दाचीही धार गेल्यासारखे वाटत होते. मित्रांना वाटलं हे प्रकरण नविन सुरू झाले कि काय? आज समुद्रावर बसल्यावर तिची आठवण येतं होती. आमच्याकडे मुलींची लग्न लवकर होतात. त्यामुळे समवयस्क प्रेमप्रकरणे विरळच. मैत्रीनी नंतर
भेटतच नाहीत. भेटल्याच तरी अशी प्रकरणे असतील.तर बोलणार तरी कुठे आणि कसे? असो, अशा मनाला भुरळ घालणा-या आणि भावनाविवश  करणा-या कातरवेळेचे  वर्णन मी खालीलप्रमाणे करतो.
अशीच असते कातरवेळ,
सावल्यांचा जणु पोरखेळ;
थोडयांचीच असते ती आवडती,
असते त्यांच्या मधुर आठवणींची!
थोडेजण कातरवेळी बावरतात,
आठवायला आठवणी घाबरतात!
क्रमशः .... 


Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income