झुलपेवाडी


गावची वेस भराभरा मागे जात होती. तशी मनात भिती वाटत होती ती पुन्हा लवकर येणे होणार
नाही याची! ही वेळच मागे वळुन पाहायची होती की कुणास ठाऊक
काही केल्या गाव डोक्यातुन जाईना. झुलपेवाडी, महाराष्ट्राच्या नकाशावर गोवा, बेळगाव
प्रांतानजीकचा भाग; पानझडी वृक्षांमुळे, आजरा तालुका असला तरी भुदरगड, गडहिंग्लजशीच जास्त
जवळीक! कदाचित म्हणुनच विधानसभा मतदारसंघ पुर्वी गडहिंग्लजच होता. पण आता त्याची नाळ
कागलशी जोडलीय! मुळात भुदरगड या घाट प्रांताला कोकणशी जोडणा-या पायवाटेवरील हे गाव; आपण
कल्पनाही करणार नाही इतक्या दुरवर इथली लोकं चालत गेल्याच्या आठवणी इथले बुजुर्ग सांगतात. पूवी चिमणे
हे एकच नाव चिमणे आणि झुलपेवाडी गावांना होते. दोघांसाठी चिकोत्रा हि एकच नदी आणि
भावेश्‍वरी हे एकच ग्रामदैवत.
आहोत भाग्यवंत आम्ही,
ज्यांसी आई लाभली;
भावास भुकेली भावेश्‍वरी
सहयाद्री पर्वत पाठीशी
चरणी चिकोत्रा नदी
लक्ष तिचे सर्वांवर,
आशिर्वाद ही पाठी! 
 अशीही लोककथा प्रसिध्द् आहे कि, भुदरगडच्या तोफा डागल्यावर चिकोत्रा नदीपर्यंत पोहचत त्यामुळे
दोन्ही गावे विभागली. दोन्ही दिशांना फांगली. कालांतराने ग्रामपंचायती निर्माण झाल्या . इथल्या कित्येक
पिढया कर्मवीर विद्यालय चिमणे मध्ये घडल्या. पिंपळगाव विद्यालयाचा ही वाटा बरोबरीचा आहेच म्हणा.
गावाच्या वरच्या बाजुस बेगवडे हे भुदरगड तालुक्यातील गाव आहे, जिथे पांडवांनी एका रात्रीत अर्धे देऊळ
बांधलेले पुरावे आहेत. आणि चिकोत्रा नदीत पांडवांचे पाय लागुन डोह तयार झालेल्या कथा आहेत. मात्र
आज डोह नसुन चिकोत्रा धरण जे इथल्या पंचक्रोशीतच नव्हे तर कोल्हापुर जिल्हयात ही प्रसिध्द् आहे. कर्नाटकला 
पाणी नेण्याचा डाव इथल्या शेतक-यांनी हाणुन पाडला आहे. आजुबाजुच्या बेलेवाडी, बामणे, धामणे,
उत्तुर, दिंडेवाडी अशा गावात भावेश्‍वरी ग्रामदेवत तर शिवारात जागो जागी म्हसोबा देव आढळेल.पूवी मोसमी
पावसावर भातशेती करणारा हा प्रदेश आज ऊसासारखी नगदी पिके पिकवतोय. 
              सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिकवारसा जपणारे परोपकारी वृत्तीच्या सहयाद्रीच्या कुशीतील या गावातील लोकांना इथंच पुनंजन्म मिळावा असे वाटते. एक गोष्ट राहुनच गेली, झुलपेवाडी हे नाव कसे पडले? बरोबर...  केसांच्या आधारे वेगवेगळया गोष्टी ओढण्यापासुन अनेक प्रकार इथल्या लोकांनी केले, अशीहि कथा प्रसिदध आहे.गावशेजारी रेडया-पाडयाला डोंगर आहे. डोंगरावर जनावरांच्या झुंजी होत. गावाशेजारील आजीची कडा डोंगर आणि शिवारबा म्हणजे शिका-यांना जीव की प्राण! आजही इथले लोक शेजारच्या जोमकाईच्या
यात्रेला आणि भुदरगडच्या, सामनगडच्या यात्रेला नित्यनियमाने जातात.आता थोडे आमच्या कुळाबद्दल सांगतो, खेडे या गावचे पाटील घराणे आमचे. युध्द्काळ की मारामा-या की
आणखी काही नक्की माहित नाही. पण् हे पाटील झुलपेवाडीत रहायला आले आणि खेडेकर झाले. पावले
आणि खेडेकर यांचे कुलदैवत असणा-या वाकीच्या वाकोबालाही दरवर्षी मोठया संख्येने येथून लोक जातात.
झुलपेवाडीचे लेझीम आणि भजनी मंडळ पार दिल्लीवारी करून आलेले आहे. तरुणभारत लेझीम मंडळाकडे तीन ते चार पोती
शील्ड, ढाली आहेत याचा  मी साक्षीदार आहे. आज झुलपेवाडीची ओळख आहे ,येथील साने गुरूजी
वाचनालय. गावच्या इतिहास आणि वर्तमानाचा दुवा इतिहासातील एकच गोष्ट पंचक्रोशीत आढळेल ती
म्हणजे घुट्टयांच्या शर्यती! इथल्या गावांनी हरीनाम सप्ताहांची परंपरा जपलेली असुन, वर्षानुवर्षे कीर्तण हेच
इथले प्रबोधनाचे माध्यम आहे! क्रमशः

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income