Posts

Showing posts from April, 2017

मानव सेवाव्रती विनोबा भावे यांचे विध्यार्थी गुणविकास विचार

१)विनाकारण कसलेही भय बाळगू नये !भय वाटल्यास देवाचे नाव घ्या कारण देव नामापुढे भयाचा टिकाव लागत नाही.  २)जमेल तेव्हा जमेल तितकी आणि जमेल त्या लोकांना मदत करावी.  ३)दररोज आपल्या हातून घडलेल्या चुकांचा धांडोळा घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. जुन्या चुका पुन्हा नव्याने कधीच करू नये.  ४)प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करू नये.  ५)मारामाऱ्या,भांडणे करू नयेत.कुणाचे मनसुद्धा दुखवू नये.  ६)श्रम आणि उत्पादन केल्याविना भोजन करू नये.  ७)गुरूजनांची शक्य तितकी सेवा करावी.  ८)सरळ बसा,सरळ बोला आणि सरळ विचार करा.  ९)रोज नियमितपणे कांहीतरी अभ्यास करीत जावा.  १०)रागावू नये. राग हा दुर्बलतेची लक्षण आहे.  ११)विनम्रपणे वागण्यातच खरा मोठेपणा आहे.  १२)स्वच्छता,नीटनेटकेपणा या गुणांमुळे आपलं व्यक्तिंमत्व उत्तम घडतं.  १३)उर्मटपणे वागू नये.सर्वांमध्ये मिळून मिसळून वागावे. मर्यादाशील असावं.  १४)शक्तीच्या जोरावर कुणी आपल्यावर दबाव आणत असेल तर मुळीच दबून जाऊ नये.  १५)सत्याला धरून राहावं. नेहमी खरे बोलावे.  १६)दुसऱ्यांमध्ये दोष पाहू नयेत:पण दुसऱ्यांमधले गुण मात्र अवश्य घ्यावेत.  १७)द

महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गांव !

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलारगांवामध्ये आता तब्बल १५ हजारांहून अधिक पुस्तके वाचकांची वाट पाहत असून  भिलारगांव हे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गांव ठरले आहे.   ब्रिटन, नेदरलँड्स आणि नॉर्वेप्रमाणेच महाराष्ट्रात पुस्तकांचे गांव म्हणून भिलारगांव सजले  आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असल्याने महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार असून त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यासह सातारा जिल्ह्यासाठीसुद्धा ही गौरवास्पद बाब आहे. ब्रिटनमधील हरफोर्डशायर येथे ‘ऑन वे’ या नावाचे गांव असून हे गांव पुस्तकाचे गांव म्हणून ओळखले जाते. पुस्तकांचे गांव या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने गावातील २५ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये गावातील मंदिरे, स्थानिक नागरिकांची घरे, हॉटेल, लॉज, शाळा अशा ठिकाणी प्रत्येकी ४५० ते ५०० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणांव्यतिरीक्त गावात इतरही काही ठिकाणी पुस्तके ठेवण्यात येतील. गावात आलेल्या पर्यटकांना सर्व ठिकाणी जाऊन ही पुस्तके वाचता येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून भि

सेंट जोसेफ शाळाच निकालात काढा :- पालकांचा पुन्हा आक्रोश

Image
कथित थकबाकीमुळे निकाल देण्यास शाळा प्रशासनाचा मज्जाव  जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी पनवेलला येऊन पोलीस संरक्षणात निकाल वाटला. पनवेल :-  दैनिक रामप्रहरवृत्त                  अवैध फी वाढीविरोधात गेल्या २ वर्षांपासून पालक आणि सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापन यातील वाद विकोपाला गेला आहे. शिक्षण शुल्क समितीचा निर्णय येईपर्यंत फिवसुलीचा तगादा लावू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असताना शाळा व्यवस्थापनाने  कथित थकबाकीमुळे पालकांना  निकाल देण्यास मज्जाव केल्यामुळे पालकांनी पुन्हा शुक्रवारी (दिनांक २८ एप्रिल) आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी सुनील सावंत,गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे,श्री. कापडणे यांनी घटनास्थळी पोहोचून उपसंचालकांच्या परवानगीने निकाल वाटप केले. बऱ्याच संघर्षानंतर निकाल हातात पडला असला तरी शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा अशी पालकांची ठाम भूमिका आहे.           नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळा नेहमीच वादातीत राहत आहे. गुरुवारी (दिनांक २७ एप्रिल) निकालवाटप होते. मात्र या शाळेच्या अवैध फि वसुली विरोधात आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेने निकाल दिले नाह

*शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख*

● सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या गोष्टी आपण सरसकट, विचार न करता, खातरजमा न करता, सर्रास पुढे ढकलतो... इतर राज्य आपल्या नेतृत्वाला जपतात. सोबत राहू नका, आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा; पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखल्या जातो त्या नेतृत्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून त्यावर शिंतोडे नका उडवू...! 🙏🏻🙏🏻 *काय बोलावं कळत नाही, हसावं की रडावं...* कोणीही लुंगासुंगा उठतो आणि कुणावर टीका करतो, ही आजच्या सोशल मीडियाची व्यथा... मोदींना कळतं काय शेतीतलं? बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे शक्तिशाली देशाचे नेते आहेत... कुठे काय तुलना करावी? चहावाला कितीही महान असला तरी शेतीवाल्यांच्या व्यथा त्याला कधीही उमगणार नाहीत, हे शेतकऱयांच्या पोरांना कधी कळेल नं सांगेल कोण? काय तर आपलं नेहमीचं अज्ञानमूलक ठोकून द्यायचं - बारामतीच्या पलीकडे कधी पाहिलं नाही!! या माणसाचं दुर्दैव की तो या करंट्या मातीत नं करंट्या लोकांत जन्मला... पवार दुसऱ्या राज्यात जन्माला यायला हवे होते. ● दिल्लीतील एका कार्यक्रमात गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते - *भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर

Maharashtra Desha | Maharashtra Day Song | Mithila Palkar | Gandhaar

Image

MS-CIT च का ?

पनवेल : MS-CIT च का ? जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकर व  विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम असून MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे. (महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE ). MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. जसे की. राजस्थान - RS-CIT, ओरीसा - OS-CIT, हरियाना - HS-CIT, बिहार - BS-CIT. MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही MI-CIT या नावाने अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे. अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते. शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना MS-CIT अनिवार्य आहे तसेच डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेप
Image