Posts

Showing posts from July, 2017

*मीडियावर सामान्य माणसाचा बहिष्कार*

Image
*मीडियावर सामान्य माणसाचा बहिष्कार* कारण.... सामान्य माणसाला भेडसावणारी प्रचंड महागाई हे दाखवत नाहीत... रोज लोकल ट्रेनच्या अपघातात मरणाऱ्या सामान्य माणसाच्या व्यथा हे दाखवत नाहीत... सरकारच्या चुकीच्या धोरणाचा नागरिकांना बसलेला फटका हे दाखवत नाहीत.... पण ....निवडणूक व्हायच्या आधी सत्ता कुणाची येणार...हे एक महिना आधी सर्व्हे करून यांना माहित पडत...जनता खुश कि नाखूष हे यांना सर्व्हे करून कळत.... अरे मग सामान्य माणूस महागाईने बेजार  झाला आहे हे सर्व्ह करून कळत नाही का? नागरिकांना विनंती आहे की अशा  चॅनल पासून सावधान,मी कोणत्याही पक्षाचा नाही मात्र अशा पद्धतीने मीडिया काम करायला लागला तर आपल्या डोक्यात खोट्या गोष्टी पेरल्या जातील,एका दिवसात लालू मुले नितीश ने राजीनामा दिल्याचा यांचा सर्व्हे कसा झाला?सर्व्ह करणारे शहाणे आणि देशातील जनता मूर्ख आहे असे यांना म्हणायचे आहे का?लोकांची मने सर्व्हे च्या माध्यमातून तयार केली जात आहेत.जे बड्या लोकांना हवं आहे तेच आपल्यावर लादलं जात आहे...हे फार भयानक आहे.आपल्याला ते दाखवलं जात आहे जे मुळात अस्तित्वात नाही.आपण आभासी आणि कल्पनेतील जगात जगत

पनवेलचे पानवाले !

Image

MUMBAIKAR VS PUNEKAR ( MUMBAI CHA VADA PAV VS PUNERI MISAL PAV)

Image
Image
Daily RamPrahar @  19 jully 2017             प्रबोधनकार ठाकरे यांची जीवनगाथा आणि  गाथा पनवेलची हि दोन पुस्तके पानवेल अर्थात पनवेलची जुनी ओळख सांगतात.पनवेलकरांनी एकदातरी  वाचलीच पाहिजेत अशी हि पुस्तके आहेत.  मर्यादित लोकसंख्येचे गाव,श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचे द्वंद्व,पायाभूत सुविधांचा अभाव हि पनवेलची जुनी ओळख असली तरी खास संस्कृती,व्यापारी केंद्र आणि भाताचे कोठार,तलावांचे शहर अशी ओळखही पनवेलची होती. त्याच्या खुणा आजही जिवंत आहेत. धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचे येथील लोक आपले वेगळेपण जपत विकासाचा रस्ता धरून चालत राहिले आणि स्वतःची संस्कृती टिकवून  राहिले आहेत. कोकणाचे प्रवेशद्वार आणि पुणे मुंबईच्या मध्ये असलेल्या पनवेल शहरामध्ये राहण्यास आलेल्या नागरिकांनी पनवेलला पुन्हा सोडण्याचा विचारच केला नाही. त्यामुळे मूळचे पनवेलकर हा कांही दिवसांनी शोधाचा विषय बनेल यात शंकाच नाही. टपालनाका हि घाऊक  व्यापारपेठ कात टाकत नवा अवतार घेताना आढळत आहे. 'जुने जाऊद्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका' असाच कांहीसा परिवर्तनवाद येथे अनुभवायला मिळत आहे. बालाजी मंदिर येथील जगतगुरु तुकारा

दुनिया का सबसे खतरनाक किला | World's Most Dangerous Fort

Image

आदई धबधबा

Image
पर्यावरणप्रेमींना खुणावतोय पनवेलच्या  सर्वाधिक जवळचा ''आदई धबधबा''  अतिउत्साही पर्यटकांकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज  पनवेल { बाबुराव खेडेकर }            निसर्गाच्या सानिध्यात सर्वानाच राहायला आवडते. सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शहरी नागरिकांना डोंगरदऱ्याचे आणि समुद्र किनाऱ्याचे आकर्षण असते. त्यातुनच शहरा लगतच्या पर्यटनस्थळांचा  पर्यावरणप्रेमी शोध घेतात. पनवेलपासून अवघ्या २ किलोमीटरवर असलेला आदई धबधबा सध्या पर्यावरणप्रेमींना खुणावतोय. वनविभागाचे याठिकाणी दुर्लक्ष असल्यामुळे पूर्णतः स्वातंत्र्य असलेला हा डोंगराळ भाग आणि त्यात पडणारा धबधबा मनशांती देऊन जातो.              ज्यावेळी रस्ते न्हवते तेंव्हा माणूस डोंगरदऱ्यातूनच पायवाट काढत प्रवास करायचा. त्यामुळे संपूर्ण भौगोलिक परिसराशी त्याची नाळ जुळलेली होती. प्रत्येक ठिकाणचे धोक्याचे इशारे त्याला पटकन कळायचे. कालांतराने रस्ते आले आणि कांही डोंगरांवर माणसांनी जाणेच बंद केले. मात्र अतिउत्साही मनोरंजनवादी पर्यटकांनी हि भटकंती सुरूच ठेवून डोंगरांवर उन्माद करायला सुरवात केली. त्यातूनच अपघात,अनुचित प्रकार आणि निसर्गाची

सिराजेमच्या थर्मल मसाज सेंटरची मोफत सेवा

Image
सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण  सिराजेमच्या थर्मल मसाज सेंटरची मोफत सेवा  दिवसाला 300 नागरिक घेतात लाभ  पनवेल {  बाबुराव खेडेकर  }            मणक्याचे आजार हा सार्वधिक वेगाने वाढणारा देशातील आजार आहे. व्यायामाची कमतरता आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याचे वेगवेगळे आजार पाहायला मिळतात. निरोगी लोकांना सुद्धा पाठदुखी जाणवते;त्यामुळे मसाज करून घेणे हे अपरिहार्य ठरते. याविषयात सर्वांसाठी एक खुशखबर आहे. पनवेल मधील सुरुची हॉटेल समोर गुरुकृपा इंटरनॅशनल ट्रेडर्स या कंपनीने आपले सिराजेम तंत्रज्ञानाचे थर्मल मसाज सेंटर मोफत सेवा देत आहे. मुळात येथे थर्मल मसाजच्या इलेक्ट्रॉनिक मशीनचा  डेमो  दिला जातो. हा डेमो सेवेचा लाभ  दररोज 300 पनवेलमधील नागरिक घेत आहेत. जिल्ह्यातील हे एकमेव केंद्र असून सिराजेमची राज्यात 46सेंटर कार्यरत आहेत.              माऊथ पब्लिसिटी वर भरोसा ठेवणाऱ्या कंपन्या बाजारात फार कमी आहेत . आरोग्यसेवेत हा प्रयोग तर विरळाच. पनवेलमध्ये मात्र एका थर्मल मसाज सेंटरने साऱ्यांनाच वेड लावले आहे. अगदी ग्रामीण भागातूनही नागरिक दररोज मसाज घेण्यासाठी पनवेलला येत आहेत. सिराजेम य

चीनमध्ये मिळत नसलेले ''इंडोचायनीज'' पदार्थ पनवेलमध्ये

Image
चीनमध्ये मिळत नसलेले ''इंडोचायनीज'' पदार्थ पनवेलमध्ये  पनवेल :- ( बाबुराव खेडेकर )               चीनमध्ये उपलब्ध असलेल्या चायनीज पदार्थांची माहिती मिळवीत असताना चीनमध्ये मिळत नसलेल्या मात्र पनवेलमध्ये चायनीज नावाने विकल्या जाणाऱ्या पदार्थांची भलीमोठी यादी समोर येते. चायनीज वडा,चायनीज समोसा, चायनीज डोसा,चायनीज भेळ,मोमोज असे अनेक पदार्थ चायनीज नसून भारतीयांनीच फेमस केले आहेत. कोणत्याही गोष्टीचे भारतीयीकरण करून आत्मसात करण्याच्या भारतीयांच्या वृत्तीचाच परिपाक त्यामुळे समोर येतो. त्यामुळे भारत चीन या दोन्ही देशांमध्ये कितीही वातावरण तापले तरी हे चटपटीत ''इंडो चायनीज'' पदार्थ एतद्देशीयांच्या जिभेचे चोचले पुरवतच राहणार असेच म्हणावे लागेल.            स्ट्रीटफूडमध्ये सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पदार्थ कोणते असतील तर त्यामध्ये चायनीज पदार्थांशिवाय हि यादी सुरु होत नाही व संपतही नाही. कांही वर्षांपूर्वी चायनीज भेळ नामक चटपटीत पदार्थाने सायंकाळच्या चहाच्या आधी स्थान मिळविले आहे. तर संध्याकाळचे जेवण सुपशिवाय सुरु होत नाही. या चायनीज नामक भारतीय पदार्थानी वाट्

शिवाजी महाराज आणि मुस्लिम सहकारी

Image

khasbaat - Dr.Kavita Chotmol

Image

panvellive-GST

Image

#Respect - After watching this you will never tease any Sikh about '12 b...

Image

शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत - साफ चुकीची गोष्ट आहे | ������

Image

Bharatvarsh: Episode 10: Chhatrapati Shivaji- The bravest Maratha ever

Image