'एकाकी संघर्ष'....

                आजचे  हे लिखाण करण्यासाठी प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसुन चव ना रव असलेले खाणावळीचे जेवण आहे. जेवणाशी निगडित खुप आठवणि आज उफाळुन आल्या आहेत. माझी वहिणी खुप चांगले जेवण करते तिला वेळोवेळी मी आइच्या जेवणाची आठवण करूण देत असतो. पुर्वी गावी मळणी काढली की ज्याची मळणी त्याच्या घरी जेवण होणारच. आमच्या भाताची मळणी असतानाचे  ते जेवण आई अप्रतिम बनवायची. जोंधळण्याची भाकरी आणि बांगडयाची चटणी आठवली कि बस्स ..... !  आता माझ्या जिभेला पाणी येणार नाही कारण मी माळ घातली ना !  तो किस्साही पुढे येईलच. वटाण्याची आमटी तर मला आजपर्यंत कुणी आई करायची तशी  केलेली आढळली नाही. तिच गत सांडग्याच्या आमटीची.. 
            माझा मधला भाऊ विक्रम कुक आहे त्याच्या हाताला येणारी चव हि आईच्या हाताचीच असणार असे मला वाटते! आमचा दादा दहावीत पास व्हावा म्हणुन आईने गणपतीकडे नवस केले होते. त्यानुसार  तिने सत्यनारायनाची पुजा घालुन जेवणाचा कार्यक्रमही ठेवला होता. ते ही जेवण उत्तम होते पण् माझा मित्र श्रीकांत पावले उशिरा आला तेव्हा जेवण संपले म्हणुन मी आईवर केवढाचा रागवलो होतो. त्याचे तिने आठवडाभर दु:ख मानले होते. पुढे हालाखीच्या दिवसात टोमॅटोचे बने नावाची काहीतरी आमटी आईणे बनविली ती विक्रम खायला मागेना पण् तिच्या समाधानासाठी मी मस्त आहे ग ;  म्हणत खालेली आठवते. 'आज आमटी काय?'  हा जेवायला बसताना
आम्ही करत असलेला प्रश्‍न तिला त्यावेळी कसा वाटत असेल हे आता विचार करवत नाही. 
  आमच्या गावाजवळच असलेल्या मावश्या न चुकता काहि ना काही पाठवुन देत असत. विशेषकरून बेलेवाडीची शाकरू मावशी म्हणजे दुसरी आईच (माय मरो मावशी उरो या म्हणीला साजेशी) ती दिसते ही आईसारखीच! 
              मी भूईमूगाच्या  शेंगा काढायला दुस-यांच्या शेतात जायचो तेव्हा काढलेल्या शेंगांपैकी पाव भाग मला  मिळायचा.एकदा तोडकरच्या मामीकडे शेंगा काढायला गेलो असता दुपारच्या जेवणाच्या वेळी माझी आमटी पाहुना मामीने चांगलाच समाचार घेतला.मुळात हिच भेंडीची आमटी चांगली व माझी आवडती होती. पण् मामी तिच्या स्वभावगुण धर्मानुसार म्हणाली,''त्या मुंबई वरून आलेल्या मोठया भावाला हिच आमटी करून वाढली काय रे आईने?''. असेच एकदा कधी नाहि ते एक रूपये मिळवुन मी दुकानासमोर मारी बिस्कीट खात होतो (छोटी पाकिटे उपलब्ध होती) तेवढयात कुण्या मुंबईकराने हि छोटी पाकिटे  कुत्रांना  घालाण्यासाठीच कंपनीने काढली असल्याची पुष्टी दिली होती. दुकानावरून आणखी एक गोष्ट आठवली ; पुर्वी बुवाच्या दुकानासमोर आम्ही मुले
लहान असताना लाईट जाण्याच्या वेळेलाच (लोड शेडिंगच्यावेळी ) बरोबर जावुन उभे रहायचो आणि लाईट गेली कि मेणबत्ती, दिवा लागेपर्यंत हात साफ करायचो.नजर गुल तर सामान गुल'चा हा प्रत्ययकारी प्रकार !पण् एकदा अशिच माझी चोरी पंढरीअ न्नाच्या दुकानात ताईना सापडली. खरे तर मी पंढरीअन्ना ज्यांना आम्ही पंढऱयांना म्हणत असु त्यांची मी बरीच कामे करत असल्याने लागल ते सरळ घ्यायचे असा त्यांचा आदेश होता. मी तितकाच काटेकोर आज्ञाधारक असल्याने गोळया कि चॉकलेट घेताना ताईनी बघितले. पड्यांना काहीच बोलला नसता पण अचानक ताईसमोर काय बोलणार मी पळालो ते महिणाभर गल्लीला तोंड दाखविले नाही. 
                गावातील मामीच्या शेतात पिकांची नासाडी करत पेरू,आंबे,काजु काढताना मामीने कितीही आरडाओरडा केला तरी ती चोरी वाटायचीच नाही.दुधाचा चहा हि पुर्वी आमच्या घरी दसरा, दिवाळीच असायची.   या चहावरून आणखी एक गोष्ट आठवते. पुर्वी स्टडीरूमला ५ वाजता उठुन अभ्यासाला बसायला लागे. त्यावेळी फ्रेश होण्यासाठी मी घरातुन चहा पावडर आणि साखर घेवुन जाई व तशीच खाई. नंतर नंतर खडी साखर न्हायायला लागलो. तर सांगायचे हेच की शेजारच्या बोरणाक (शिंदे) यांच्या घरातील दुध डेअरीला घालायचे काम माझ्याकडे होते त्याचे मला काही पैसेही मिळत पण् दुध घालुन मी कुठल्यातरी धुंदित माझ्याच घरी पोहचायचो आणि उरलेले थोडे दुध ठेवुन घ्यायचो पण् हा भ्रष्टाचार आईणे खपऊन घेतला नाही त्यामुळे हे काही चालले नाही. 
             आई वारल्यानंतर मामांच्या घरी राहताना त्यांच्या म्हशी चारण्यापासुन दुधाचा व्यवहार माझ्याकडे असल्याने भरपुर दुध आणि दुग्धजन्य पदार्थावर मी ताव मारला. धवलक्रांती
शब्द उच्चारला कि हया गोष्टी माझ्यासमोर येतात. हि बोरणाकची माणसे तशी पुर्वीपासुनच आम्हाला मदत करत आलेत. त्यांनी कधीच छोटया छोटया गोष्टींवरून वादग केले नाही. त्यांच्या परडयातील लिंबु पळवणारा मी त्यांना माहित असुनही ते या गोष्टीकडे काना डोळा करत पण् आमच्या ताईला हे चौर्यकर्म न पचल्याने शेजारच्या आशाताईला एकदा  माझा तपास घेण्यासाठी लावले. सुदैवाने आशाताईने नकार दिल्याने ताई गप्पा राहिली त्या  आशाताईचे आभार कसे माणु
हेच त्यावेळी कळत नव्हते. श्रीकृष्णाच्या खोडया, चो-या माफ करणारे लोग खरच जगात आहेत त्याचे हे उदाहरण म्हणायचे . 
           गावातील लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. साने गुरूजी वाचनालयाने ८ वी ते १० वी
शिक्षणाचा खर्च उचललाच होता. शाळेतही कसलीच फी मागितली जात नव्हती. आई वारल्यावर लक्ष्मी विद्यालयाचा सगळा शिक्षक वृंद आमच्या घरी आला होता शिक्षण थांबवु नका म्हणुन आजीला सांगायला. पिंपळगाव-झुलपेवाडी हा माझा प्रवास १२ वी पर्यंत स्थानिक टॅक्सीवाल्यांतर्फे मोफत होता.अर्थात त्याला त्यावेळचे माझ्या वकृत्वाचे कर्तृत्वही जबाबदार होतेच. मी सुद्धा किणरचे काम मोफत करत असे. गावातील सर्वच कार्यक्रमात मी वाडपी असायचो व इतरही कामे करताना कमीपणा मानायचो नाही. वाचनालय तर माझे हक्काचे दुसरे घर! 
            आई-वडील नसतील तर मुले एकतर सुधरतात किंवा बिघडतात. मी बिघडलेला होतो.
एकदा शेजारच्या  संदिप पोटे सोबत मी सायकल रेस लावली आणि ब्रेक न लागल्याने (मुळात माझ्या सायकलला पुरेसे ब्रेकच नव्हतेच) खडया घसारतीने माझी सायकल सुसाट पळाली. बुवाच्या घराचे काम सुरू असल्याने दारात विटा पडल्या होत्या. कट्टीवर बरीच माणसे लहान मुले घेऊन बसली होती. माझी सायकल विटा उडवत गेल्यामुळे त्यावेळी गल्ली जमा झाली. लगतच्या मारूतीच्या(हनुमानाच्या) देवळासमोर जाताना मला बुद्धी सुचली आणि मी
सायकलवरून उडी मारून सायकलही आवरली. हि चित्तथरारक सर्कस पाहुन लोक अचाट झाले आणि पुढचा पवित्रा जनसमुदाय घेणार इतक्यात माझ्या गावातील त्या बुवाच्या लोकांनी व त्यांच्या गल्लीवाल्यांनी फक्त 'बाबु तु व्हय; हळु चालवत जा' अशा शब्दात चुक माफ केली हे मी विसरू शकणार नाही. एकदा असेच सुताराच्या दारातुन रस्त्यावरील कुत्र्यांना  चपला मारत मित्रांसोबत बसलो असता समोरच्या पावल्याच्या कट्टीवर त्यांची मुंबईची मंडळी (बायका) बसल्या होत्या. नेमके माझे चप्पल त्यांच्या अंगावर गेले होते. बोंबाबोंब झाली तरी मी जागचा हाललो न्हवतो आणि घरातुन आजोबा मामा पावले येवुन आपल्या मुंबईच्या पाहुण्यांना 'अरे, हा आमचा बाबु!' असे सांगत होते हे हि कसे विसरता येईल! तात्पर्य एवढेच कि परोपकारी वृत्ती आणि मी समाजाचे काहितरी देणे लागतोय हि भावना माझ्या गावातील याच  माणसांनी मला
शिकवली!

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income