Posts

Showing posts from August, 2017

कोल्ही कोपर गावचा शेवटचा एक गाव एक गणपती

Image
पनवेल:-  बाबुराव खेडेकर                पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर गाव येथील स्वयंभू गणपतीमुळे नावारूपास आलेले आहे .या गावात घराघरात गणपती बसत नसून गावाचे  ग्रामदैवत असलेल्या चिंतामणीची सेवा हाच उत्सव येथे जल्लोषात साजरा केला जातो. गावातील एकोपा व परोपकारी वृत्ती वाढीसाठी गणेशोत्सव महत्वाची भूमिका पार पाडत आहे.  हे गाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित होत असून कोल्ही कोपर गावचा हा शेवटचा एक गाव एक गणपती असेल असे भाविक सांगत आहेत. असे असले तरी जेथे जाऊ तेथे  चिंतामणीची सेवा करू असा निर्धारही गावातील कांही बुजुर्ग नागरिकांनी व्यक्त केला आहे.            कोकण आणि गणेशोत्सव हे नाते अतूट आहे. घरातील गणेशमूर्ती सामाजिक एकोप्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सव बनवून पूजन सुरु केले. त्यातूनच गणेश मंडळांचे पेव फुटले.मंडळांमध्ये स्पर्धा वाढली त्यामुळे गावात गटातटात कटुता निर्माण व्हायला लागली. त्यामुळेच सुजाण नागरिकांनी एक गाव एक गणपती हि संकल्पना राबविण्याचे ठरवले. त्यानुसार एका गावातील अनेक मंडळांना गावचा एकमेव गणपती बसविण्याची जबाबदारी देण्यात येऊ ला

बजाव !

Image

ढोल-ताशे ! पनवेलच्या ब्रम्हा पथकाचा ताल (Documentary on Dhol Tashe )

Image
Image

परवडणाऱ्या घरांचा दुसरा अर्थ २ लाख ५० हजार रुपयांची मदत !

नेमका कसा होणार पनवेल झोपडपट्टीमुक्त ?  पनवेल  :-( बाबुराव खेडेकर )             कोणत्याही शहरातील अनधिकृत झोपड्पट्टीकडे सहानुभूतीने पाहून झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा कल असतो. त्याचवेळी प्रामाणिक करदाता नागरिक शहराच्या बकालीकरणासाठी झोपडयांना कारणीभूत ठरवून नाराज असतो. त्यातच केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने परवडणाऱ्या घरांचे स्वप्न दाखवले आहे. मात्र  झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या  हक्काच्या घरांसाठी  आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या परवडणाऱ्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नेमकी कशी कार्यवाही होणार याबाबत बरेच अज्ञान आहे. त्यामुळे नेमका कसा होणार पनवेल झोपडपट्टीमुक्त याबाबतचा मागोवा घेतल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.              प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पनवेल महानगरपालिकेकड़े जुलै अखेरीस ४४ हजार ५८ अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आले असून त्यानंतर विहित कागदपत्रांसह ४० हजार अर्ज सादर करण्यात आले आहेत. सध्या स्थितीला शहरातील २३ झोपड्यांपैकी तीनच झोपड्यांचा डीपीआर तयार असून त्याची मान्यता प्रलंबित आहे.  प्रधानमंत्री आवा

श्रावणातील भक्तिरंग - खांदेश्वर महिमा

Image

मराठा मोर्चा पाहून पोटशूळ उठलेल्या गल्लीबोळातल्या तमाम विचारवंतांना .....

मराठा क्रांती मूकमोर्चानें सामाजिक वातावरण ढवळून निघाले ! अनेक आरोपांचा समाचार घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली ती अशी ! आपल्या अकलेचे तारे तोडून मराठा मोर्चावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष टीका करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्या!विषयाची जाण नसताना देखील श्वानाला लाजवेल असे भुंकने प्रथम बंद करा! मराठा समाजाने आजपर्यंत जे कमावले ते स्वतःच्या हिमतीवर अन कर्तृत्वावर!तुमच्या सल्ल्याची गरज आम्हाला भूतकाळात पण नव्हती अन भविष्यकाळातही ती असणार नाही!त्यामुळे सोशियल मीडियावरून फुकटचे सल्ले देऊन आपला अन आमचा,दोघांचा वेळ कृपया वाया घालवू नका!  त्यामुळे फेसबुक,व्हाट्सअप अन तत्सम मीडियावर पोस्ट अथवा कोंमेंट टाकून आपली उर्जा,आपला बहुमूल्य वेळ खर्च करण्यापेक्षा  तोच वेळ अन तीच ऊर्जा आपल्या समाजाच्या अथवा कुटुंबाच्या उत्कर्षासाठी अथवा उन्नतीसाठी खर्च केली तर फार बरे होईल! 1) शिक्षणाअभावी मराठा समाज मागे पडला आहे असा जावईशोध काही बुद्धिवंतांनी लावला आहे!ह्या महापुरुषांनी MPSC, UPSC अन तत्सम परिक्षांमधील मराठा उमेदवारांचा टक्का पहावा अन मगच अकलेचे तारे तोडावेत ही नम्र विनंती!दुसरे असे जर यदाकद

आरक्षण :- आर्थिक की जातीनिहाय ?

प्रा.हरी नरके सरांचा लेख गेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे. आपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.          २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते घटनाविरोधी ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय? पुन्हा असे आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीही केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही. सर्वच समाजातील गरिबांना न्याय मिळायला हवा त्यासाठी मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं, अनुदाने (subsidies) असतात.आर्थिकदृष्ट्या मागासांना सरकारकडुन EBC सवलत मिळते.  संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. "बीपीएल" अर्थात दारिद्र्य रेषेखालील स

'ती आहे पाठीशी' लघुपट टीमची मल्हार टीव्हीला भेट

Image

ध्येयवेड्या शास्त्रज्ञाचे 'स्पर्धेला' प्रोत्साहन

Image

हा मोर्चा व्हावा हि तो सरकारची इच्छा !

Image
मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेच्या प्रत्येक गाडीला जादा डबे .. संभाजीराजे यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कडून तातडीने मंजूर .. रेल्वेमंत्र्याचे अतिरिक्त डब्याची व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश .  नवी दिल्ली: येत्या ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात येणार असून, त्यासाठी कोल्हापूर सह महाराष्ट्रातून ९ ऑगस्ट रोजी होणा-‌या मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेला जादा डबे जोडण्यात यावी ही खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने मंजूर केली. संभाजीराजे यांच्या या प्रयत्नाला यश मिळल्याने हजारो मराठा मोर्चेकरांना मुंबईत जाणे शक्य होणार आहे. दिल्ली येथे  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजे  यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणा-‌या मराठा क्रांती मोर्चा संदर्भात भेट घेतली या प्रसंगी खा. संभाजीराजे  यांनी मराठा क्रांती मोर्चाची सर्व माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सांगितली तसेच महाराष्ट्रातून लाखो लोक मोर्चास येणार अस

अशोक चक्र

Image
अशोक चक्र हे मुळात सुदर्शनचक्र आहे.अशोक स्तंभावर जे चार सिंह आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसुन ब्रह्मदेव आहेत. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाला चार डोके असुनही तीनच दिसतात, अगदी तसेच अशोकस्तंभावरील चार सिंहापैकी फक्त तिनच सिंह दिसतात. ब्रह्मदेव हा स्रुष्टीचा पालनकर्ता असुन त्याची नजर चार दिशेला आहे. अगदी तंतोतत अशोकस्तंभावरील सिंहाची नजरही चहुदिशेला आहे. अशोकस्तंभाच्या खालील बाजुला सत्यमेव जयते लिहलेले आहे. हे वाक्य कुठल्याही बौध्द धर्मग्रंथातील नसुन ते महाभारतातील मुंडकोपनिषेदातील आहे.