Posts

Showing posts from February, 2023

पाईकाचे अभंग वाचकांच्या भेटीला

Image
गाथा परिवाराचे संस्थापक ह. भ. प. उल्हासदादा पाटील यांच्या   सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या एकूण 4500 अभंगांपैकी 11 अभंगांचे रसाळ विश्लेषण असलेले 'पाईकाचे अभंग' हा वैचारिक ग्रंथ आज घरी आला. कालच शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली आणि आज हे विचारधन घरी आले आहे. तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मावळ्यांची वैचारिक मशागत ज्या अभंगांचा रचनेतून केली ते हे  पाईकाचे अभंग ! याच विचाराचा धागा न्यायमूर्ती रानडे यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील 'मराठी सत्तेचा उदय' या ग्रंथात सापडतो. आज सर्वत्र भक्ती आणि शक्तीचे जे स्मारक आपण पाहतो त्यावेळी या अभंगांची आठवण हरी हर भक्तांना यावी हीच अपेक्षा ! राम कृष्ण हरी !

सत्यासाठी सत्यासह आग्रह ,''सत्याग्रह'

नमस्कार मंडळी ,                      माहितीच्या विस्फोटात सत्य हरवतेय.... आभासी दुनियेत वास्तवाचा विसर पडतोय... एकतर्फी प्रचारामुळे द्वेषाचे विष पेरले जातेय... बुद्धिभेदाचे बळी दिवसेंदिवस जात आहेत...       यातही चांगल्या माणसांची फळी सृजनशील समाजसाठी झटत आहे ! माध्यमांमध्ये मात्र ते दिसत नाहीत! तुम्ही त्यातीलच एक आहात ? तुम्हालाही व्यक्त व्हायचेय ?       संत ज्ञानोबा, तुकारामांच्या भागवत धर्माची; समर्थ रामदासांच्या महाराष्ट्र धर्माची; छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामीत्वाची सेवा आपल्या हातून व्हावी अशी आपली इच्छा आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठेशाही स्वराज्य , महात्मा ज्योतिबा फुल्यांचे सत्यशोधक शिक्षण, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे न्यायिक प्रजासत्ताक याचे स्वप्न साकार करायचेय ? मग आपल्यासाठी आपले हे व्यासपीठ ! या व्यासपीठाचे आश्रयदाते आपल्या माध्यमातून तयार व्हावेत हीच अपेक्षा... *बाबुराव खेडेकर* मुक्त पत्रकार/राजकीय सल्लागार आणि *एलआयसी एजंट* 9702442024 https://www.facebook.com/yzpost?mibextid=ZbWKwL

चला जाणूया शासकीय कार्यालयाचे कामकाज

राज्य शासनाचे विविध विभाग ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कोणकोणती कामे चालतात, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कोणाशी संपर्क साधावा, तक्रारींसाठी कुठे संपर्क साधावा आदी माहिती नागरिकांना हवी असते. ती माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध विभागांची माहिती देण्यात येत आहे. आज आपण जाणूया अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत असलेल्या औषध प्रशासन विभागाची माहिती...   अन्न व औषध प्रशासन , ( औषधे) ठाणे जिल्हा                औषध प्रशासन काय काम करते  ? :- अन्न व औषध प्रशासन ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ,  मंत्रालय ,  मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा  १९४०  व त्याखालील नियमाअंतर्गत फुटकळ विक्री ,  घाऊक विक्री यासाठी अनुज्ञप्ती (परवाने) देणे तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने मेडिकल डिव्हाइसेस क्लास ए, क्लास बी करीता उत्पादन अनुज्ञप्ती देणे तसेच कायद्याअंतर्गत धारण केलेल्या परवानाधारकाची नियमितपणे तपासणी करणे.             औषध है विशिष्ट दर्जाचे गुणवत्तेचे अ