Posts

Showing posts from July, 2014

SUPORT TO SURAJ !

Image
सुरज जाधव आगे बढो ! आमचे परममित्र झुलपेवाडीचे सुपुत्र सुरज जाधव यांनी कोल्हापूरच्या लढाऊ बाण्याचे उदाहरण दाखवून दिले असुन चिकोत्रेचे पाणी मुंबई भायखळा येथील शाबु सिद्धिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाला दाखवून दिले आहे. ईंटेरिअर डिझायनर ला प्रवेश घेतलेल्या ६० विध्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रथम दिवशी शासन निर्णय दाखवून सदर कोर्स बंद झाल्याने आपली प्रवेश फी घेवून जा असे सांगण्यात येत होते. अश्यावेळी उशीर झाल्याने आपल्याला इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही त्यामुळे वर्ष वाया जाणार  म्हणून विध्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण सुरज जाधव एकटाच या विरोधात उभा असून इतर विध्यार्थाची जमवाजमव करत आहे. लोकशाहीमध्ये शिक्षण म्हणजे व्यापार नसून संस्कार आहे याचा विसर शिक्षणसम्राटांना व व्यवस्थापनाला पडला असेल तर विध्यार्थी कर्तव्याने त्याची जाणीव करून देण्याच्यासुरजच्या लढ्याला प्रतिसाद म्हणून मी स्थानिक सर्वपक्षीय युवा आणि विध्यार्थी संघटनेची मदत मागितली पण विधानसभेच्या समोर कांही प्रतिसाद मिळत नसल्याने शाबु सिद्धिकी चे ट्रस्टी असलेल्या मुश्ताक अंतुले (माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे चिरंज