Posts

Showing posts from October, 2021

कल्याण सकल मराठा महासंघची स्वच्छता मोहीम

Image
कल्याण (पु) ला  लोकग्राम तिकिट खिडकीच्या बाजुला *छत्रपती शिवाजी महाराजांचे* स्मारक आहे.  त्या स्मारकाभोवतालचा परिसर कुणीही लक्ष न दिल्यामुळे दुर्गंधीत झाला होता.  भाजीवाल्यांनी टाकलेला केरकचरा, वाढलेले गवत, झालेला चिखल यामुळे स्मारक दिसेनासे झाले होते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली रयत(जनता) सुखी समाधानी रहावी यासाठी स्वराज्याची स्थापना केली,  अश्या या आपल्या शुरू पराक्रमी राजाच्या पवित्र स्मारक च्या आसपास चा परिसर खाण असताना देखील कुणीही पुढाकार न  घेतल्यामुळे गेली कित्येक वर्ष तसाच होता.... हे सकल मराठा महासंघ चे संस्थापक अध्यक्ष श्री अमर वाघ साहेब यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सकल मराठा महासंघ चे कल्याण जिल्हा व तालुका अध्यक्ष श्री. विनायक भालेराव व श्री. अनिल कोकाटे यांना स्वच्छता मोहीमेची कल्पना दिली.  मग सदर जागेची पाहणी करून श्री. विनायक भालेराव साहेबांनी व अनिल कोकाटे साहेबांनी तेथे आज दिनांक २४/१०/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता. स्वच्छता मोहीम राबवली.  या मोहिमेत अनेक शिवप्रेमीनी सहभाग घेवून सदर परिसर स्वच्छ करून घेतला व परिसर पुन्हा नव्याने  रुपास आणला.  सदर मो

भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन

              मुंबई, दि. 20 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने ,  २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत  ' दक्षता जनजागृती सप्ताहाचे '  आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.             कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच ,  भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ ,  दूरध्वनी क्रमांक 022-24921212 ,  वेबसाईट  acbmaharashtra.gov.in ,  ईमेल -  acbwebmail@mahapolice.gov.in/   addlcpacbmumbai@mahapolice. gov.in ,  फेसबुक -  www.facebook.com-maharashtra- AC