Posts

Showing posts from March, 2021

भारतीय ख्रिश्चन मंचद्वारे राममंदिरासाठी निधी संकलन.

Image
नवी दिल्ली:- माननीय इंद्रेश कुमार जी यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी भारतीय ख्रिश्चन मंच याद्वारे निधी संकलन 25 मार्च 2021 रोजी करण्यात आले. हिंदू बांधवांप्रती बंधुत्वाची भावना जागृत करत संपूर्ण देशभरातून भारतीय ख्रिश्चन मंचाने लाखो रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमि साठी दिला आहे.  एकत्रित निधीचे समर्पण कार्यक्रम वेळी अखिल भारतीय संत समिती आणि गंगामहा समितीचे महासचिव श्री. स्वामी जितेंद्रनंदा सरस्वतीजी, भाजप केंद्रीय संपर्कप्रमुख श्री बलराजजी नुणे, भारतीय ख्रिश्चन मंच अध्यक्ष श्री वडकंनजी टॉम, भाजप राष्ट्रीय प्रवक्ते आणि भारतीय ख्रिश्चन मंच कन्व्हेनर श्री.पल्ला प्रताप नायडू,एस के मॉल, जय मॉल, श्रीमती सुवर्ण चला जी, डॉ. अजय आबेल आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

''कहींपे निगाहे कहींपे निशाणा''

Image
जागतिक कीर्तीचे उद्योजक आणि केंद्र शासनाला कोविड विरोधात लढण्यासाठी भरघोस निधी देणारे रिलायन्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन हिंदुराव वझे यांनाच राजकीय दबावामुळे आणि मनसुख हिरेन यांच्या कथित हत्याप्रकरणी एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तालयात खांदेपालट होत पोलीस आयुक्त पदी हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पायउतार होताच राज्याचे गृहमंत्री पब ,बार मधून 100 कोटी महिना वसुलीचे टार्गेट देत असल्याचा गंभीर आरोप करून चर्चेला नवीन उधाण आनले आहे. वरवर पाहता वेगेवेगळ्या भासणाऱ्या बाबी एकमेकांशी संलग्न आणि तितक्याच गुंतागुंतीच्या होत जात आहेत.  एकीकडे आम्ही म्हणतोय तेच सत्य अशी चाललेली राजकारण्यांची चळवळ आणि त्याअनुषंगाने चालत असलेले सोशल मीडिया ट्रायल यामध्ये सत्य धुसर होत चालले आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी पत्रकाराच्या मते प्रश्न किती मोठा आहे आणि त्यातून केवळ आम्हीच तुम्हाला सोडवू शकतो असे भासवणे म्हणजे राजकारण हि त्याने केलेली र