Posts

Showing posts from September, 2023

सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घ्या !

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात. SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता ९ वी, १० वी व

*चला तर...मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया... अवयवदान करूया!*

    भारतीय संस्कृतीत "दान" या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यापैकी रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी "अवयवदान" हा सुध्दा राष्ट्रीय उपक्रम देशात राबविण्यात येतो. आजपावेतो वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत आणि अजूनही काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.       सन १९५४ साली पहिल्यांदा "अवयवदान" करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून स्वतःच्या भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनीही पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण केले. या मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.    दरवर्षी दि.१३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी "जागतिक अवयवदान दिवस" जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. तसेच हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मूत