Posts

Showing posts from March, 2017

पनवेल महापालिकेची तिजोरी भरणार !

Image
पनवेल महापालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प   आरंभीची शिल्लक ९८ कोटी ४२ लाख ९३ हजार ४७६ सण २०१७-१८ मधील अपेक्षित जमा :- १२१२ कोटी ८२ लाख ८३ हजार ४७६ अपेक्षित खर्च : - १०३५ कोटी ७७ लाख ६१ हजार  अखेरची शिल्लक :- १७७ कोटी ५ लाख २२ हजार ४७६ पनवेल :- बाबुराव खेडेकर              पनवेल महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी (दिनांक ३१ मार्च) आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मांडला.  नागरी सुविधांवर आणि महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या भूभागाच्या  नियोजनावर भर देणारा हा शिलकीचा असा हा अर्थसंकल्प आहे.आयुक्तांच्या अधिकारात नियोजन केलेल्या या अर्थसंकल्पात  मालमत्ताकराबाबत तसेच पाणीपट्टीबाबत दरनिश्चितीचे  को णतेही खात्रीशीर  धोरण जाहीर केलेले नसून हा ढोबळ अर्थसंकल्प  महापालिकेच्या पहिल्या महासभेसमोर सादर करून मंजुरी घेण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.              रायगड जिल्ह्यतील पहिली महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला.पत्रकारांसमोर अर्थसंकल्पाबाबत चर्चा करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे घटकनिहाय बारकावे न पाहता तरतुदीसाठी प्राधान्यक्रम देत

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना -

योजनेचा हेतू - विमा उतरविण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी विमा उतरविला, तर या विमा रकमेचा हप्ता आर्थिक अडचणीमुळे अथवा विमा कंपनीने निश्‍चित केलेल्या तारखेच्या आत शेतकऱ्यांकडून भरला जात नाही. अशा स्थितीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच अशा स्थितीत शेतकऱ्याला अथवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा शासनाचा मुख्य हेतू आहे.  - शासन भरते विम्याची रक्कम - जमिनीचे क्षेत्र नावावर असणाऱ्या अर्थात शेतीच्या सात-बाऱ्यावर नाव असलेल्या राज्यातील १० ते ७५ या वयोगटातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रतिवर्षी शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविली जाते. यासाठी शासन प्रतिवर्षी विमा कंपन्यांशी करार करते. राज्यातील शेतीचे क्षेत्र नावे असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या वर्षभर कालावधीच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन स्वतः प्रतिवर्षी नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे भरते.  - लाभार्थी शेतकऱ्यांना होणारा योजनेचा फायदा - या योजन

ध्वजोत्सव !

Image
लिया हाथमे ध्वज कभी ना झुकेगा । कदम बढ रहा है कभी ना रुकेगा ।  गोषवारा !....                 विजय रणांगणातील असो वा अन्य क्षेत्रातील; ध्वज हा पाहिजेच ! विजयाचे व विजयाकांक्षेचे प्रतिक असलेले ध्वज संघर्षमय मानवी जीवनात मान्यता पावलेले आहेत. विजयी, स्वतंत्र व ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रांना त्यांचा ध्वज वैभवशाली जीवनांचे रक्षण करण्यास व विकसनशील राष्ट्रांना ध्वज मागील पिढ्यांच्या रोमहर्षक पराक्रमांची व अतुलनीय स्वार्थत्यागाची आठवण करून देत असतो. अनेक राष्ट्रांच्या ध्वजाचा इतिहास रोमहर्षक आहे. ऑसट्रेलीयाच्या ध्वजाचा उदय युद्धातच झाला आहे. पुरातन ध्वज हे बहुतेक शुद्ध धार्मिकच होते असे अमेरिकेच्या ज्ञानकोशात निसंधीग्ध शब्दात सांगितले आहे. युद्धक्षेत्रात उतरण्यापूर्वी परमेश्वरी दैवी शक्तीचा वरदहस्त घेण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक ओढा असतो. अर्जुनाने आपल्या रथावरील मारुतीचे चिन्ह ध्यान करून आणून लावले असे वर्णन आढळते. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने तर सेंट जॉनचे चित्र असलेला मंदिरावरील ध्वज एका मोहिमेत सैन्यासोबत आदरपूर्वक न्हेला होता. आणि त्यावेळी ध्वज घेवून आलेल्या पाद्र्याला दिवसाला सा
Image

देखिये जब Yogi Adityanath ने ओवैसी की बोलती बंद की ! योगी की दहाड़ Archive

Image

ना. रामदास आठवले यांनी जागवल्या पँथरच्या आठवणी

ना. रामदास आठवले यांनी जागवल्या पँथरच्या आठवणी  ऐक्यासाठी मंत्रिपदसुद्धा सोडेन पनवेलचा महापौर रिपाईचाच  गोल्डन टेंम्पलप्रमाणे चवदार तळ्याचा विकास करणार ! महाड  :- बाबुराव खेडेकर              भाजप हि बहुजनांची पार्टी आहे.भाजप मुस्लिमविरोधीसुद्धा नाही. मंत्रिपदासाठी मी कुठेही जात नाही तर मी जेथे जातो त्यांचा विजय होतो. त्यामुळे त्यांना सत्ता मिळते मग आम्हाला का नको अशी भूमिका रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या ९० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना स्पष्ट केली. देशाला बलवान करायचे असेल तर बाबासाहेबांच्या अनुयायांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे एकत्र या अशी हाकही त्यांनी यावेळी समाजबांधवांना दिली.महाड नगरपरिषदेने चवदार तळ्याच्या विकासासाठी २० कोटींची मागणी केली असून गोल्डन टेंम्पलच्या धर्तीवर चवदार तळे विकसित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.               क्रांतिभूमी महाड येथे  चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त भीमअनुयायांनी डॉ बाबा

बँकांच्या जाचक अटी-- खातेदारांची डोकेदुखी

Image

एक भारत श्रेष्ठ भारत

Image