Posts

Showing posts from May, 2023

कल्याण लोकसभेचा राजकीय, सामाजिक प्रवास

*वास्तव*  :-  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या  कल्याण   लोकसभा  क्षेत्रात झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडून ठाणे,  कल्याण  डोंबिवली, उल्हासनगर सारख्या महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद  यांच्यासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्मार्ट शहराचं समस्यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेली आहे. डोंबिवली आणि अंबरनाथ  या दोन्ही एमआयडीसी नागरी वस्तीत निर्माण झाल्या का ? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारती, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांनी नागरिकांची पाठ सोडलेली नाही. अनधिकृत बांधकामे हे  कल्याण  डोंबिवली महापालिकेसमोरील सर्वात मोठे संकट आहे.  कल्याण  मध्ये मेट्रो येऊ घातली असली तरी  कल्याण  आरटीओ मीटरवर रिक्षा चालवायला असमर्थ ठरत आहे असेच म्हणावे लागेल. अमृत योजनेकडे येथील नागरिक डोळे लावून बसले असून पाणी टंचाई हाही येथील कळीचा मुद्दा आहे. वाढीव घरपट्टी हा प्रत्येक महानगरपालिकेत सध्या वादाचा विषय बनत चालला आहे तो इथेही आहे. दिवा, कल्याण , उल्हासनगर आणि अंबरनाथ  डम्पिंग ग्राउंडवर ठोस उत्तर तेथील स्थानिक स्

दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी

                    दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. महाराष्ट्रात दिव्यांगांची संख्या तीन लाखाहून अधिक आहे.  राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के दिव्यांग आहेत. दिव्यांगांची संख्या कमी करण्यासाठी देशभरामध्ये विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. शासन सेवेत तसेच खाजगी क्षेत्रात दिव्यांगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिव्यांगांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना समान संधी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग यासाठी अधिनियम 1995 मध्ये कलम 60 अन्वसये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय विभागात करण्यात आली आहे. आतापर्यंत या सर्व योजनांसाठी दिव्यांग व्यक्तींना त्या- त्या कार्यालयात जावे लागत होते. त्यांचा येण्या-जाण्याचा त्रास कमी व्हावा, तसेच त्यांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घर बसल्या मिळावा, यासाठी शासनाने "शासन आपल्या दारी" या महत्त्वकांशी उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्या दरात उपलब्ध करून दिल

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा ठाणे ,  दि. १९  -   राज्य शासनाने  ‘ शासन आपल्या दारी ’  हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत असून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे सादर करावीत ,  असे आवाहन महामंडळाने केले आहे.          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार ,  मोची ,  ढोर व होलार इ.) नागरिकांचे जीवनमान उंचावणे ,  समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविसाठी तसेच त्यांचे शैक्षणिक ,  आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावाचाही यामध्य

शामराव पेजे महामंडळाच्या योजनांचा घ्या लाभ

              शासकीय योजनांची माहिती देणे, त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासन आता थेट नागरिकांच्या दारी जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठीच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शामराव पेजे कोकण तर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.             राज्यात सुशिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे. व्यक्ति, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने महामंडळाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीपर्यंत राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होता येईल. महामंडळाच्या योजना खालील प्रमाणे. 20% बीज भांडवल योजना :-              ही योजना राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते. महामंडळाचा स

सारथी कार्यालय खारघर नवीमुंबईत सुरु

Image
             नवी मुंबई ,  दि .12: महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्हयांचे कार्यक्षेत्र आहे. मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर-21,खारघर ता.पनवेल जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.             तरी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजबांधवांनी मुंबई विभागीय कार्यालयात भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा असे आवाहन सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.