Posts

Showing posts from 2015

भूमिका

Image
          ग्रामीण भागातील तरुण हुशार,सामर्थ्यशाली,मेहनती आणि प्रामाणिक असतो मात्र गरिबीमुळे तसेच संधी न  मिळाल्यामुळे तो काम धंद्यासाठी शहरात विस्थापित होतो तेंव्हा एकाकी पडतो व घाबरतो… नेमके काय करावे याचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वेळ आणि पैसा वाया घालवण्याचीही वेळ त्याच्यावर येते असा बहुतेकांचा अनुभव आहे. पुढे याच विद्यार्थ्यांची परिस्थिती 'ना घरका ना घाट का' अशीच होते ! खरी भारतीय संस्कृतीखेड्यात आहे असे महात्म्यांनी सांगून ठेवले आहे मात्र महाराष्ट्रात खेडी ओस पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील नागरिकांना आपापल्या गावाचा शाश्वत विकास व्हावा व शहरातील सुखसोयी आणि संधी ग्रामीण भागात निर्माण व्हाव्यात असे वाटत असते. त्यानुसार यथाशक्ती आपल्या जडण-घडणीस कारणीभूत असणाऱ्या ग्रामीण भागातील  शिक्षण संस्था,सामाजिक संस्था यांचे उतराई होण्याचा प्रत्येकजन प्रयत्न करत असतो. या विचारसरणीच्या लोकांचा हा समूह असून चांगल्या समाजासाठी  आदर्श विध्यार्थी पुरस्काराच्या निमित्याने सुरु झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील  आजरा-भुदरगड तालुक्यातील नवा आणि प्रथम अविष्कार आहे. वैभवशाली राष्ट्राच्या निर्मि

संविधान दिनाच्या शुभेच्छा !

Image

माजी विद्यार्थी मेळावा

Image
लक्ष्मी माध्यमिक विद्यालय बेगवडे व माजी विद्यार्थी संघटना झुलपेवाडी- बेगवडे यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक १३ नोव्हेंबर २०१५  रोजी  आजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. यावेळी शाळेच्या व  उत्तूर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. मटाधिपति श्रीपाद बुवा; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक फारूक नाईकवडि; दै. सांजवातचे संपादक प्रफुल्ल फडके,गाव विकास समितीचे सुहास खंडागळे व भाग्यश्री प्रधान आणि दोन्ही गावातील मान्यवरमंडळी  उपस्थित राहणार आहेत.सदर मेळाव्यास जास्तीत जास्त विध्यार्थी व नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव खेडेकर यांनी केले आहे. प्रशालेच्या गेल्या १० ब्याचेसचे माजी विध्यार्थी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी सरू असून दोन्ही गावात व उत्तूर परिसरात या कार्यक्रमाचीच चर्चा सुरु आहे.

गाव विकास

Image

दै. विश्वरूप'चे चैतन्य !

माझ्या पत्रकारितेचे गुरु म्हणून मी ज्यांचा उल्लेख करत आहे ते  दै. विश्वरूप या रायगड जिल्ह्याच्या वृत्तपत्राचे संपादक श्री. सतीश धारप ! तुम्ही वेगवेगळ्या विचारसरणी असणारे,दिग्गज,ज्ञानी संपादक पाहिले असतील पण प्रतिथयश दैनिकाचा आंधळा संपादक बहुदा पाहिला नसेल ! डायबिटीजमुळे किडन्या आणि डोळे गमावलेले धारप साहेब आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस घेतात.कुटुंबप्रमुख म्हणून आजही या अवस्थेत ते कुणावर  विसंबून न राहता स्वतः पत्रकारितेच्या माध्यमातून पैसे मिळवतात आणि स्वतः आनंदात राहत इतरांनाही आनंद देतात. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांपासून तीर्थरूप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी परीवारापर्यंत त्यांना आदराचे स्थान आहे. त्यांची सकाळ पहाटे ४ वाजता होते आणि बरोबर ६ वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच प्रशासकीय सेवेतील महत्वाच्या व्यक्ती यांना 'नेते नमस्कार' म्हणून त्यांचा  फोन जातो. केवळ एकदाच एखादा फोन नंबर त्यांना सांगितला कि तो त्यांना पाठ झालाच म्हणून समजा मग तो नंबर त्यांना एक वर्षानंतर विचारा…         मी त्यांच्यासोबत रायगड,रत्नागिरी,मुंबई,ठाणे,पुणे आणि नागपूर इत्य

मुख्यमंत्री मासिकाचे कार्यकारी संपादक या नात्याने मी मे महिन्याच्या अंकासाठी लिहिलेले विचार…

'अवघाची संसार सुखाचा करीन ' या प्रतिज्ञेने हि लेखणी हाती धरली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शास्त्रीय ज्ञानाची सोप्या भाषेत रुपांतरे करून पाठविण्याचा; भारतीय इतिहासातील थोरांची रसरशीत चरित्रे आणि जगातील इतिहासाचे थोडक्यात सार लिहून पाठवायचे आहे. संघटनेची सूत्रे,शिक्षणाचे महत्व आणि विशाल भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याचा मानस आहे. हा अंक ज्याचे हाती पडेल ते प्रयत्नशील पुरुषार्थासाठी उठून मृतप्राय पडलेल्या समाजास संजीवनी देतील व समाज खडबडून उठेल असे चैतन्य प्रसार करण्याचे ध्येय ठेवून भूतलावरच स्वर्ग निर्माण करण्याची उत्कटता प्रसवायची आहे. जन्मभूमीचे सुपुत्र दारू पिऊन बरबाद होत असताना,सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला असताना,सुशिक्षित तरुण शहराकडे विस्थापित होत असताना,महागाईने जनता त्रस्त झाली असता,परिवहन आणि आरोग्य व्यवस्था निपचित पडली असताना कोणा सॠदय व्यक्तीस सुखाची लालसा,विलासांची आसक्ती आणि भोगाची रुची सुचेल? ज्या राष्ट्रात योग्य स्वाभिमान नाही,स्वधर्म,स्वभाष आणि स्व:इतिहास याबद्धल भक्ती व पुज्यभाव दिसत नाही ते राष्ट्र स्वातंत्र सुखाच्या स्वर्गीय फळांचा आस्व

झुलपेवाडी आणि साने गुरुजी वाचनालय

ज्ञान,मनोरंजन आणि विकास हि आवश्यक त्रिसूत्री अजेंड्यावर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील झुलपेवाडी या गावच्या साने गुरुजी वाचनालयाची रौप्य महोत्सवी वाटचाल सुरु आहे.आज या गावाची ओळख सांगताना  दिल्ली वारी करून आलेले येथील भजनी मंडळ व तरुण भारत लेझीम पथक यांची जागा समर्थपणे साने गुरुजी वाचनालयाने घेतली आहे असेच म्हणावे लागेल. भुदरगड या घाट प्रांताला व कोकणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पायवाटेवरील हे गाव. येथील चिकोत्रा  नदीमध्ये पांडवांचे पाय लागून डोह तयार झाल्याच्या कथा आम्हाला लहानपणी सांगितल्या जायच्या. आज येथे चिकोत्रा मध्यम प्रकल्प हे धरण व धरणावरील गणेश मंदिर आणि वीजप्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गावच्या वरच्या बाजूस बेगवडे गावामध्ये पांडवांनीच एका रात्रीत बांधलेले देऊळ पाहायला मिळेल. पानझडी वृक्षामुळे आजरा तालुका असला तरी भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्याशीच जवळीक साधणारे हे गाव आहे. पूर्वी चंदगड हा विधानसभा मतदार संघ होता आज त्याचा संबंध कागल मतदार संघाशी जोडला गेला आहे. पारंपारिक शेतीची जागा आता बागायती शेतीने घेतली असून ऊस,भात,गहू,भुईमुग,ज्वारी ई. पिके प्रामुख्याने येथ

सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी अभ्यास गटाची आवश्यकता

Image
  दिनांक ११ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत जाहीर केले की पुढील ३ महिन्यात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यात येईल.आपल्याकडे अनेक कायदे आहेत पण त्याची कार्यवाही सदोष असल्याने पळवाटा शोधून गुन्हेगार मोकाट सुटतो हा अनुभव जुनाच आहे. दारूबंदी,डान्सबार बंदी,गुटखा बंदी अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी समाजात फिरून स्वतः माहिती संकलन करत नसतात  तर ते समोर कुणीतरी तयार दिलेल्या  लेखी   माहितीवर शेरे मारत काम करत असतात .  जात पंचायती,गावक्या यांनी  वाळीत टाकल्याची उदाहरणे  फक्त  रायगड  जिल्ह्यात   नसून रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथेही आढळतील. पश्चिम महाराष्ट्रात भावक्या आपला हेकेखोरपणा खरा करत गावाच्या मालकीच्या  जमिनी परस्पर विकताना दिसतात. (अश्या गावकीच्या जमिनींचा ताबा आता सरकार घेत असल्याने कायद्याचे राज्य आहे अशी धारणा होण्यास थोडा वाव आहे.)गाव करील ते राव काय करील अशी मराठीत प्रचलित म्हण आहे. सरकारने सत्ताविकेंद्रीकरणाच्या सूत्रानुसार ग्रामपंचायतींना स्वायत्त अधिकार दिले आहेत. असे असताना गावक्या "हम करे सो कायदा" अश्या
Image

वाळीत प्रथेविरुद्ध कायदा करा !:-गाव विकास समितीची मागणी....

Image

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र !

प्रति मा. अध्यक्ष  साहित्य अकादमी, नवी दिल्ली  विषय-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र ! मा. महोदय  सप्रेम नमस्कार !लोकाभिमुख शासन आणि गतिमान प्रशासनाकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत.सामाजिक भावनिक प्रश्न जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा असल्याने मराठी आय पाकृतअतिप्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या भावनेने हा पत्रप्रपंच करत आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता म्हणजे महाराष्ट्राचा दैदिप्यमान संघर्षाचा इतिहास आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ! भाषावार प्रांतरचना करत असताना मराठी भाषेच्या व मराठी भाषिकांच्या हौतात्म्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याचे सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचे परकीयांपासून संरक्षण करत असताना सहिष्णुतेची भागवत बीजे याच महाराष्ट्रात रुजली आणि देशाला मार्गदर्शक बनली. प्रसंगी नाठाळाचे माथी काठी हाणण्याचे सामर्थ्य याच महाराष्ट्र धर्मातून निर्माण झाल्याने स्वराज्य आणि सुराज्याची कल्पना सत्यात उतरविणारे जहाल आणि मावळ वीरसुद्धा याच भाषेचे बाळकडू घेवून सिद्धत्वास पावले. पुरोगामित्व प्रयोगातून सिद्ध करणारा महाराष्ट्र मागून गोष्ठ मिळवत नाही हा स्वाभिमान असल्यान

ध्वजोत्सव !

ध्वजोत्सव ! लिया हाथमे ध्वज कभी ना झुकेगा । कदम बढ रहा है कभी ना रुकेगा ।                  विजय रणांगणातील असो वा अन्य क्षेत्रातील; ध्वज हा पाहिजेच ! विजयाचे व विजयाकांक्षेचे प्रतिक असलेले ध्वज संघर्षमय मानवी जीवनात मान्यता पावलेले आहेत. विजयी, स्वतंत्र व ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रांना त्यांचा ध्वज वैभवशाली जीवनांचे रक्षण करण्यास व विकसनशील राष्ट्रांना ध्वज मागील पिढ्यांच्या रोमहर्षक पराक्रमांची व अतुलनीय स्वार्थत्यागाची आठवण करून देत असतो. अनेक राष्ट्रांच्या ध्वजाचा इतिहास रोमहर्षक आहे. ऑसट्रेलीयाच्या ध्वजाचा उदय युद्धातच झाला आहे. पुरातन ध्वज हे बहुतेक शुद्ध धार्मिकच होते असे अमेरिकेच्या ज्ञानकोशात निसंधीग्ध शब्दात सांगितले आहे. युद्धक्षेत्रात उतरण्यापूर्वी परमेश्वरी दैवी शक्तीचा वरदहस्त घेण्याकडे मनुष्याचा स्वाभाविक ओढा असतो. अर्जुनाने आपल्या रथावरील मारुतीचे चिन्ह ध्यान करून आणून लावले असे वर्णन आढळते. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने तर सेंट जॉनचे चित्र असलेला मंदिरावरील ध्वज एका मोहिमेत सैन्यासोबत आदरपूर्वक न्हेला होता. आणि त्यावेळी ध्वज घेवून आलेल्या पाद्र्याला दिवसाला साडे आठ

प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी "बिकट वाट"

Image
माझी विदर्भातील अमरावतीची मैत्रीण पूजा डकरे हिचा बिकट वाट हा कविता संग्रह परवाच वाचून काढला. तेथील बोके प्रिंटर्स प्रकाशनाने मागील वर्षी या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले होते. मराठी आणि हिंदी अश्या दोन भागात विभाजन केलेले हे छोटेखानी पुस्तक ६० रुपयात उपलब्ध करून देण्यामागे प्रोत्साहानाचाच मुख्य हेतू समोर दिसतो. तीमिरातुनी तेजाकडे हा या एकूण कवितांचा सूर दिसून येतो.वि. स. खांडेकर एकदा म्हणाले होते कि, "विशी पंचविशीतील बहुतेक तरुण तरुणी प्रेमवीर,देशभक्त आणि ध्येयवेडी असतात!" हि गोष्ट कवितेतून आदर्शवाद मांडणाऱ्या पूजाला तंतोतंत लागू पडते असे माझे मत बनले आहे ! देशप्रेम,स्वार्थत्याग, भ्रष्टाचाराला विरोध,शब्दमहती, युवक, गरिबांच्या वेदना हे नवख्या कवीच्या पहिल्या कविता संग्रहात येणारे विषय येथे पाहायला मिळतील. स्त्रीत्वाचा अभिमान ठेवून तुझा वर तूच निवड असा स्त्री सबलीकरणाचा विषयही पाहायला मिळतो.त्याचबरोबर स्त्रीविना जग अस्तित्वहीन होईल कारण चंद्रालासुद्धा चांदनिचाच आधार असतो असा स्त्रीचा माहीमापण पाहायला मिळतो. आजची शिक्षणप्रणाली कारखान्याचा कच्चा माल असून त्या कारखान्याचे मालक रा

आजरा तालुक्यातील उत्तूर पंचायत समिती गटातील विविध समस्यांबाबत माजी विध्यार्थी संघटनेचे निवेदन

Image
                                                                   लोकाभिमुख सरकार आणि गतिमान प्रशासनाकडून तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत. गावाकडील सुशिक्षित युवक मोठ्याप्रमाणावर शहरांकडे विस्थापित होत असल्याने गावे ओस पडत आहेत.विकासगंगा शहराकडून गावाकडे पाझरत येत असल्याने शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात समाजाचे विभाजन होवून परावलंबत्व येताना दिसत आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेवून शहरात गेलेल्या विध्यार्थ्याला स्पर्धेत टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो; शिवाय केंद्रीय बोर्डाच्या शिक्षणाची वाढती मागणी राज्याच्या शिक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.ग्रामीण भागातील विध्यार्थी स्पर्धेत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि भावी सक्षम नागरिक बनण्यासाठी गेल्या ३ वर्षांपासून लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथील माजी विध्यार्थ्यांची संघटना कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गाव विकास समिती या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेचा सरचिटणीस म्हणूनही मी काम पाहत आहे. उत्तूर पंचायत समिती गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील विकसनशील भाग आहे. याभागातील सर्वच स्तरातील विकासाचा/बदलाचा  फायदा नव्या पिढीला होणार अ