हनुमान तरुण मंडळ यंदा करणार केळींचा गणपती !

कोल्हापूर : ग्रामीण कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी गावात गेली अनेक वर्षे एक गाव एक गणपती असून यंदाचा गणपती पूजनाचा मान गावातील हनुमान तरुण मंडळाला आहे. पंचक्रोशीतच न्हवे तर जिल्ह्यात चर्चा होणारी गणेश मूर्ती हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असते. यावर्षीचे प्रमुख आकर्षण असणार आहे केळांपासून बनवलेली मूर्ती. 
याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे. 
 हनुमान मंडळाचा गणेशोस्तव या चालू वर्षी 25 वा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेली 2 वर्ष संपूर्ण जगावर कोरोनाचे आस्मानी संकट होते त्यामुळे गणेशोस्तवच काय कोणताच सण साजरा करता आला नाही. सध्या हे संकट टळले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. 
     आतापर्यंत हनुमान मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यासह गणेशोत्सवात  गणपती ची विविध रूपे म्हणजे नारळ,दोरी,मोती,शेती अवजारे, वारकरी मंडळीच साहित्य, ऊस, नाणी (रुपये)अश्या सर्व प्रकारचे गणपती तयार करून नाविन्यपूर्ण आविष्कार केला आहे. 
या परंपरेला अनुसरून यावर्षी देखील केळी पासून बनवलेला गणपती तयार करण्यात येणार आहे. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल देखील असणार आहे. या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी गणेश भक्तांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.   

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income