रिक्षाचा प्रवास महागला !

कल्याणमध्ये ऑटोरिक्षा  टॅक्सीचे नवीन दर लागू

 

ठाणे : मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत प्रवाशी वाहतुकीच्या ऑटोरिक्षा ,काळी पिवळी टॅक्सी  कुल कॅब यांचे  नवीन दर निश्चित केले असून कल्याण शहरात  ऑक्टोबर २०२२ पासून हे दर लागू झाले असल्याची माहिती कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) विनोद साळवी यांनी कळविली आहे.

            या पूर्वीचे दर  दि.01 मार्च 2021 रोजी  लागू करण्यात आले होतेपरंतु गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सी.एन.जीइंधनाच्या दरात वाढ झालेली सू सीएनजी इंधनाचे दर रुपये ४९.४० वरुन रुपये ८०.०० झालेले आहेतखटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक  वाढलेले इंधनाचे दर तसेच वाहनाची सरासरी किंमत इतर संबधित बाबी विचारत घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा  टॅक्सी चालक मालक  प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देवून मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाने दि.26 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारित केलेला आहे.

 

            ऑटोरिक्षा नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 23 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 15.33 रुपये इतके असेल. काळी पिवळी टॅक्सी नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 28 रुपये इतके असेल तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 18.66 रुपये इतके असेल. कुल कॅब (एसी)साठी नवीन दर पहिल्या टप्प्यातील 1.5 किमीसाठी 40 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी साठी 26.71 रुपये  इतके असेल.

 

            ऑटोरिक्षा टॅक्सी परवानाधारकांनी भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन दि३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. भाडेमीटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारित अधिकृत टॅरिफकार्ड दि३० नोव्हेंबर २०२२ पर्यंतच अनुज्ञेय राहील. मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये पेट्रोल रिक्षांना सुध्दा सीएनजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांचेच दर लागू राहतील, असे श्री. साळवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income