शुद्ध हवेचे ध्येय गाठणे ही सामूहिक जबाबदारी : आ. प्रशांत ठाकूर


  पनवेलच्या शुद्ध हवेसाठी स्थानिक नागरिक व सर्व पक्ष एकवटले !
पनवेल: शुद्ध हवेचे धेय्य गाठणे हि  स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांची सामुहिक जबाबदारी आहे. वायू प्रदूषण हा विषय आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. भावी पिढ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छ हवा गरजेची आहे.  पनवेलमधील वाढत्या वायू प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी सामुहिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतेच मांडले.  हवेची गुणवत्ता सुधारणे हि केवळ प्रशासनाची किंवा कोण्या एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून त्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले. क्लीन एअर फॉर पनवेल या परिसंवादात ते बोलत होते.
पनवेल परीसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे पनवेलकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल आणि लगतच्या परिसरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवार दिनांक २० मे २०२२ रोजी जेष्ठ नागरिक संघ, पनवेल येथे क्लीन_एअर_फॉर_पनवेल या  उपक्रमांतर्गत स्थानिक नागरिक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन  वातावरण फाउंडेशन द्वारा करण्यात आले होते. 
*आमदार प्रशांत ठाकूर* यांनी सोप्या भाषेतील साहित्य आणि सोप्या भाषेतील व्हिडीओज तयार करून जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करतायेने शक्य असल्याचे सांगत  हि मोहीम आपण सर्वांनी मिळून हाती घेतली पाहिजे असे से मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जनजागृतीसाठी उद्या नव्हे तर आजचा सुरुवात करायला हवी असे म्हणत  किल एअर अक्शन हब  या व्हाट्सअँप ग्रुपची स्थापना यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. 
*वाढत्या हवा प्रदूषणामुळे पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात, पनवेल वासियांनी शुद्ध हवेसाठी एकत्र यावे* -  डॉ. संजीव मेहता, चेस्ट स्पेशालीस्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई 
 
 
हि पृथ्वी वाचवू शकणारी आपण शेवटची पिढी आहोत. वेळीच हव प्रदुषणासारख्या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी सर्व स्तरावर सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.* - भगवान केसभट, संस्थापक आणि सिईओ वातावरण फाउंडेशन 
 
*घनकचरा व्यवस्थापन म्हणजे शुद्ध हवेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल* - गणेश कडू, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका 
 

*वातावरण संस्थेचे संस्थापक आणि सिईओ - भगवान केसभट* म्हणाले कि पनवेल आणि परिसरातील नागरिक दिवसातील १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत.  आपली पिढी हि वातावरणीय बदल रोखण्याचा प्रयत्न करु शकणारी, स्वच्छ हवेचे धेय्य पाहू शकणारी व ते साकार करू शकणारी हि शेवटीची पिढी आहे. त्यामुळे आपल्याला सर्व ताकदीनिशी स्वच्छ हवेसाठी जमेल तेवढ्या लवकर एकवटले पाहिजे. 
पुढे ते म्हणाले कि वाढते वायू प्रदूषण हि गंभीर बाब असून वाढत्य वायू प्रदूषणाकडे काना डोळा करून चालणार नाही. याउलट आज या समस्येचा सामना सार्वत्रिक रित्या केला नाही तर,  येत्या आगामी काळात आपल्यावर पश्चातापाची वेळ येईल आणि आपण काहीही सुधार करण्याची संधीही गमावलेली असेल. 

*राष्ट्र सेवा दलाचे सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख* यांनी या कार्यक्रमात मत मांडताना सांगितले कि आजची वाढती लोक संख्या आणि वाढत्या लोक संखे बरोबरच वाढती शहरे हि हवा प्रदूषणाचे प्रमुख कारणे आहेत. वाढत्या लोक संख्येच्या गरजा भागवण्यासाठी आपण निसर्गाचा कोणताही विचार करत नाही. मग या गरजा भागवण्यासाठी आपल्याला कारखान्यांची, उद्योगांची गरज भासू लागते. वाढत्य लोक संख्येमुळे आपण जंगले कापून आपण तिथे मोठ मोठाल्या बिल्डिंगा उभ्या करत आहोत. पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जंगलांची आम्हाला आवशकता असताना आम्ही तेच नष्ट करत चाललो आहोत. त्यामुळे दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. 
पुढे ते म्हणाले कि, व्यवसाय आणि उद्योगांची गरज आम्हाला आहे पण आजचे वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता प्रदूषणरहित उद्योग व्य्वस्यांची गरज आम्हाला असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. 

 *लीलावती हॉस्पिटलचे चेस्ट स्पेशालीस्ट डॉ. संजीव मेहता* पुढे म्हणाले कि, आम्ही २५ ते ३० वयोगटातील नर्सेस यांच्या फुफुसे कसे काम करतात याबाबत आम्ही संशोधन केले असता या संशोधनांती २५ ते ३० वयोगटातील नर्सेस यांचे फुफुसे  ही  २५ टक्के निकामी झाली असल्याचे समोर आले आहे. 

पनवेल महानगरपालिकेचे  नगरसेवक गणेश कडू यांनी वाढत्या वायू प्रदूषणाल कमी करण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन हि पहिली पायरी ठरू शकते. तसेच  जगभरातील वायू प्रदुशांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या ७० लाख लोकांपैकी १६ लाख इतके लोक भारतात मरण पावतात असे एका संशोधनातून समोर आले आहे. हि आकडेवारी नक्कीच धोकादायक आहे ती भूशानावः नाही. त्यमुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले मांडले.



*सदर परिसंवादाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे:*

मा. प्रशांत ठाकूर, (विधानसभा सदस्य), महाराष्ट्र, डॉ. संजीव मेहता (चेस्ट स्पेशालीस्ट, लीलावती हॉस्पिटल आणि संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र चॅप्टर इंडियन चेस्ट सोसायटी), मा. भगवान केसभट (पर्यावरण अभ्यासक, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - वातावरण फाउंडेशन), श्री.अल्लाउद्दीन शेख( सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रसेवा दल),  श्री.गणेश कडू, (नगरसेवक पनवेल महानगरपालिका) नरेश ठाकूर ( नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती, पनवेल महानगरपालिका), संतोषी तुपे (नगरसेविका, पनवेल महानगरपलिका), राजश्री वावेकर (नगरसेविका, पनवेल महानगरपलिका), रुचिता लोंढे  (नगरसेविका, पनवेल महानगरपलिका), अजय बहिरा (नगरसेवक पनवेल महानगरपालिका), चारुशीला घरत (नगरसेवक पनवेल महानगरपालिका), अनिता पाटील (नगरसेवक पनवेल महानगरपालिका), विक्रांत पाटील (नगरसेवक पनवेल महानगरपालिका), अजित बहिरा (नगरसेवक पनवेल महानगरपालिका), योगेश चिले (पनवेल शहराध्यक्ष आणि प्रवक्ता महाराष्ट्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मारुती शेरकर (सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्र सेवा दल आणि माणुसकीची शाळा) इत्यादी जन उपस्थित होते. 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

रसिका नाचणकर - 99237 80472 
सुप्रिया कोळी - +91 97690 97944
राहुल सावंत - 9930749875

*वातावरण फाउंडेशन बद्दल-*

वातावरण संस्था हि हवामान बदल आणि त्याचा असुरक्षित समुदायांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काम करते. सध्या महाराष्ट्र राज्याला त्रस्त करणाऱ्या वायू प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वातावरण फाउंडेशन लोक वाकालात,  संशोधन आणि जनजागृतीपर सक्रियपणे काम पाहत आहोत.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income