सत्यमेव जयते चा बामणे येथे शेतकरी मेळावा

कोल्हापूर:  सत्यमेव जयते फाऊंडेशन ने विठ्ठल रखुमाई मंदिर बामणे ता. भुदरगड येथे भव्य शेतकरी मेळावा सोमवार दि.16 मे 2022 रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्यमेव जयते फाऊंडेशन अंतर्गत निवृत्त मेजर तुकाराम परसू खवरे यांनी पामोसा ऍग्री सायन्स कंपनी पूणे येथील डायमंड कृषी तज्ञ सोलापूरे , चंद्रकांत लष्करे व सुरेश सावंत यांना बोलावले होते. कृषी तज्ञ सोलापूरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेती कशी करावी, कोणती बी बियाणे वापरावीत, तणनाशक औषधे कोणती व कशी वापरावीत , माती परीक्षण, रासायनिक खतांचे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती दिली. बहुसंख्य लोकांनी आपल्या शंका विचारून शंका निरसन करून घेतले. या संपूर्ण शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी निवृत्त मेजर तुकाराम परसु खवरे, त्यांचा मुलगा जय खवरे, फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप मेंगाणे यांनी पार पाडली. किरण खवरे सरांनी आलेल्या तज्ञांचे आणि पाहुण्यांचे स्वागत आणि आभार मानले. कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्याला उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले व पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व शेतकरी, प्रतिष्ठित आणि मान्यवर व्यक्ती, व्यापारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप मेंगाणे , फाऊंडेशन चे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income