‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देखावा सजावट स्पर्धेची घोषणा


स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे - महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव माझा मताधिकारया विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल फॉर्ममध्ये माहिती भरून आपले देखावा सजावटीचे छायाचित्रे व ध्वनिचित्रफित पाठवावे व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


            दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव माझा मताधिकारया विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणेशाची स्थापना करण्यात येतात. यावेळी करण्यात येणाऱ्या सजावटीमध्ये मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणेमतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणेहे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातूनतर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावटगणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबविता येतील. तसेच मताधिकार बजावतानाजातधर्मपंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणेपैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणेयासारख्या विषयावर आपल्या देखाव्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते.


या देखाव्याची छायाचित्रे, ध्वनिचित्रफित हे माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार या स्पर्धेसाठी पाठविता येतील. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल फॉर्मद्वारे माहिती भरावी.

            या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणीमतदार नोंदणीनाव वगळणीतपशिलातील दुरुस्त्यानवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा या विषयासंबंधी प्रसार-प्रचार रावे. तसेच अधिकाधिक मंडळांनी व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income