कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात पर्यटनास बंदी


31 जुलै 2022 पर्यंत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू

अंबरनाथ : पर्यटनस्थळेनदी किनाराधबधबा येथे पावसाळ्यात होणारे दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यतील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत दि. 4 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 या काळात धबधबा परिसरात मद्यपान करणेधोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणेखोल/वाहत्या पाण्यात उतरणे व पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रसांती माने यांनी दिले आहेत.

अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचे मंदिर व धबधबे आहेत. त्याचबरोबर चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळयाच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खोल व वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडीतारवाडीभोजवऱ्हाडेदहिवलीमळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदीपिंपळोलीआस्नोलीसागाव ते बारवी धरण गेट नं.3 येथील या परिसराच्या 3 किमी क्षेत्रात खालील कृत्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार, पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्य सेवन करून प्रवेश करणेमद्य बाळगणेमद्य वाहतूक करणेअनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक ठिकाणे धबधबेदऱ्याचे बंदरेधोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसाळ्यामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्याच्यावरील बाजुस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोता खाली बसणे, धोकादायक स्थिती व जिवीत हानी होईल अशा धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे, रहदारिच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहणे थांबवणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे, वाहनाने ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक  स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थकचराकाचेच्या व प्लॅस्टिकच्या बादल्याथर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणेटिंगलटवाळी करणेमहिलांशी असभ्य वर्तन करणेअसभ्य व अश्लील हावभाव करणेशेरेबाजी अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणेडि.जे. सिस्टीम वाजवणेगाडीमधील स्पिकर/ ऊफर वाजवणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनीवायु व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे, धरण/तलाव/धबधब्याचे 3 कि.मी परिसरात दुचाकी / चारचाकी/ सहाचाकी वाहनांने प्रवेश करणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले असल्याचे श्रीमती माने यांनी कळविले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income