अग्निपथ’ योजनेद्वारे लष्करात तरुणांना संधी मिळणार



भाजप प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन 
 
मुंबई :- मोदी सरकारने मंजुरी दिलेल्या अग्निपथ योजनेमुळे तरुणांना लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. प्रसिद्धी पत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, सशस्त्र दलात इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी अशी त्यांची रँक असेल. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर, संघटनात्मक आवश्यकता आणि सशस्त्र दलांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, अग्निवीरांना सशस्त्र दलात कायमस्वरूपी नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरांच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीच्या २५ टक्क्यांपर्यंत सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल.सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजनेद्वारे देशसेवेची संधी मिळेल. या योजनेमुळे भारतीय सशस्त्र दलांचे सरासरी वय अंदाजे ४ ते ५ वर्षांनी कमी होईल.  बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित  मनुष्यबळाची उपलब्धता या योजनेद्वारे साध्य होईल.या योजनेत भरती केल्या जाणाऱ्या युवकांना अग्नीवीर असे संबोधले जाईल. अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या भत्त्यांसह आकर्षक  मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा  कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे ‘सेवानिधी’ पॅकेज दिले जाईल. ‘सेवानिधी’ला प्राप्तिकरातून सूट मिळेल. अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या व्यस्त कालावधीसाठी ४८ लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल, असेही श्री . पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
(अधिक माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी
https://www.mygov.in/campaigns/agniveer/)

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income