डोंबिवलीतील शिधावाटप दुकानात मंत्रीमहोदयांच्या हस्ते संचाचे वाटप


       ठाणे, - सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हायला हवी, आनंदात जावी, यासाठी राज्य शासनामार्फत दिवाळीच्या फराळासाठी लागणारे चार जिन्नसाचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब व अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सुमारे एक कोटी 62 लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.

            श्री. चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवली येथील कोपर चौकातील शिधावाटप दुकानात नागरिकांना आनंदाचा शिधा संचाचे वाटप आज सकाळी करण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.

            श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सामान्य कुटुंबांतील नागरिकांना दिवाळी सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून मदत करण्यासाठी अल्पदरात दिवाळी फराळासाठी लागणारे जिन्नस देण्याचा निर्णय घेतला.यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखऱ आणि तेल ही चार जिन्नस शंभर रुपयात देण्यात येत आहेत. या संचाचे वाटप करण्यात येत आहे.

            शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागातील शिधावाटप दुकानांतून या संचाचे वाटप सुरू आहे. कल्याण पूर्व विभागातील दुकानात आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते, बेलापूरमधील आगरोळी गाव येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते, वाशीतील पावणे गावात आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते, अंबरनाथ येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आले.

            जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनेही जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण व अंबरनाथ तालुक्यांमधील शिधा वाटप दुकानांमधून दिवाळी संचाचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील 71505 संचाचे वाटप दुकानांमध्ये करण्यात आले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income